अकाउंट बंद करण्याचे सरकारचे निर्देश कायदेशीर आहेत काय हे तपासावे लागेल-: ट्विटर

Date:

नवी दिल्ली-भारत सरकारने एकूण १४३५ अकाउंट्स बंद करण्यास सांगितले होते यावर  ट्विटरने केंद्र सरकारचे हे निर्देश कायद्याला धरून आहेत काय ? हे तपासावे लागेल असे स्पष्ट करून निर्देशाला उत्तर दिले आहे. ट्विटरने आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले, ‘कंपनीने ५०० पेक्षा जास्त ट्विटर अकाउंट्स कायमस्वरूपी बंद निलंबित केले आहेत, ते स्पॅमच्या श्रेणीत येत होते आणि आमच्या प्लॅटफॉर्मचा गैरवापर करत होते. त्याशिवाय वादग्रस्त हॅशटॅग्जही हटवण्यात आले आहेत.’ट्विटरने सरकारच्या आदेशाकडे दुर्लक्ष केले आहे, त्यावर कुठलेही पाऊल उचलण्यात आले नाही, असे आरोप झाले होते. त्यानंतर ट्विटरने हे वक्तव्य दिले आहे.

ट्विटरने म्हटले आहे की, माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने तीन वेगवेगळ्या आदेशांत शेतकरी आंदोेलनाशी संबंधित एकूण १४३५ अकाउंट्स बंद करण्यास सांगितले होते. त्यापैकी काही अकाउंट्स फक्त भारतात ब्लॉक करण्यात आले आहेत. कंपनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने आहे आणि अलीकडेच केंद्र सरकारने ज्याआधारे ट्विटर अकाउंट्स बंद करण्यास सांगितले होते ते भारतीय कायद्यांस अनुरूप आहे असे आम्हाला वाटत नाही. भारत सरकारने शेतकरी आंदोलनासंदर्भात चिथावणीखोर मजकूर पसरवणारे अनेक अकाउंट्स बंद करण्याचे निर्देश दिले होते. सरकारने म्हटले होते की, हे हँडल्स पाक समर्थित, खलिस्तान समर्थकांचे असून विदेशातून ऑपरेट होत आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...