सुयोग मित्र मंडळाचा उपकम
पुणे -ऐलमा पैलमा गणेश देवा, एक लिंबू झेलू बाई, कारल्याचा वेल लाव ग सुने आणि वेड्याच्या बायकोने केल्या होत्या चकल्या अशी भोंडल्याची गाणी म्हणत निवारा वृध्दाश्रमातील आजींनी आपल्या गत आठवणींना उजाळा दिला.
निमित्त होते चतुःशृंगी देवस्थान ट्रस्ट आणि गोखलेनगरमधील सुयोग मित्र मंडळाने आयोजित केलेल्या आजीाबाईंच्या भोंडल्याचे. वृध्दाश्रमातील पन्नासहून अधिक महिलांनी या उपक‘मात सहभाग घेतला. महिलांनी भोंडल्याबरोबर फुगड्याही घातल्या. या महिलांसाठी देवीच्या दर्शनाची विशेष व्यवस्था करण्यात आली होती.
वृध्दाश्रमात जीवन जगत असलेल्या महिलांच्या स्मृतींना उजाळा मिळावा, त्यांच्या नेहमीच्या चाकोरीबध्द आयुष्यात आनंद निर्माण व्हावा या उद्देशाने कार्यक‘माचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती देवस्थानचे कार्यकारी विश्वस्त रवींद्र अनगळ यांनी व्यक्त केले
सुयोग मित्र मंडळाचे अध्यक्ष मुकेश खामकर, नंदकुमार कदम, मंगेश तडके, पराग कानिटकर, अभिषेक पवार, अक्षय माने, शुभम वाईकर यांनी कार्यक‘माचे संयोजन केले. श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड समुहाचे विशेष सहकार्य मिळाले.