पुणे-राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षाचा इयत्ता 12 वी परीक्षेच्या च्या निकालात आज चाटे शिक्षण समूहाच्या विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले असून चाटे शिक्षण समुहाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा विराजमान झाला आहे.चाटे ज्यु. काॅलेज सायन्स (Resi./Daycare) गाऊडदरा सातारा रोड पुणे चा १२ वी २०१८ बोर्ड परिक्षेमध्ये १००% निकाल लागला .
अमेय झरकर याला 95.38 % गुण मिळवले आहेत. तर रिद्धी ताकवले 94.46%, मेघना चाटे 93.08 %, अनामिका दीक्षित 91.23 %, दक्ष शेट्टी 91.08 %, अथर्व चासकर 91.08 % सिद्धार्थ मिश्रा 90.92 %, गपत सुदर्शन 90.77 %, वैष्णवी काळे 90.15 % आकांक्षा मोरे 90.15 % यांनी अशा प्रकारे यश सपादन केले आहे,
तर बी एच चाटे स्कुल मध्ये एकूण 477 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, यातून 90 टक्क्यांच्या वर 8 विद्यार्थी, 80 ते 90 % 237 विद्यार्थी व 76 ते 80 टक्के गुण असलेले विद्यार्थी 181 विद्यार्थ्यांनी गुण संपादन करून चाटे शिक्षण समूहाने शैक्षणिक क्षेत्रातील दबदबा कायम ठेवला आहे,
सण 2017-18 या वर्षीच्या दहावी- सी बी एस सी बोर्ड परीक्षेत देखील विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश मिळवले आहे, त्यामध्ये सुशेंन वनमाने 97 % , शिंदे मानसी 96%,आदीश्री पाटील 95.80 वनशीता बागल 95 % गुण मिळाले आहेत. व इतर विद्यार्थ्यांनी देखील उत्तुंग यश संपादन केले आहे.
याबाबत चाटे शिक्षण संस्थेचे पुणे संचालक प्रा.फुलचंद चाटे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या पालकांना धन्यवाद दिले त्याचबरोबर विद्यार्थ्यानी करीयर ध्येय समोर ठेऊन अभ्यास केल्यास नक्कीच कोणत्याही परीक्षेत यश मिळत असते. नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्पर्धा परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन करून देशातील विद्यार्थ्यां सोबत आपले स्थान अबाधित राखले आहे.

