जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा ” भव्य मोर्चा “

Date:

पुणे-

बाबूजगजीवनराम यांच्या नावाने चर्मकार आयोग स्थापन व्हावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप यांच्या नेतृत्वाखाली ”  भव्य मोर्चा  ” काढण्यात आला .  मोर्चाची सुरुवात गणेश पेठयेथील संत देवजीबाबा हराळे वैष्णव संस्थायेथून  झाली पुढे दारूवाला पूल , पंधरा ऑगस्ट चौक , साधू वासवानी चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला .

चर्मकार समाज  देशातील २० टक्के लोकसंख्येत असून सुध्दा आर्थिक , सामाजिक व शैक्षणिक दृष्टया मागासलेला आहे व शासनाच्या योजना व सवलतीपासून वंचित आहे यासाठी चर्मकार समाजासाठी भारताचे माजी उपप्रतप्रधान स्व. बाबूजगजीवनराम यांच्या नावाने आयोग स्थापन व्हावा  मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली , यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय सचिव ज्ञानेश्वर कांबळे कांबळे , राज्य कार्याध्यक्ष सूर्यकांत गवळी ,मोर्चाचे संयोजक राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पुणे शहराध्यक्ष राजाभाऊ पोटे ,जगदीश पोटे ,  राज्य सचिव सुदाम लोखंडे , राज्य उपाध्यक्ष  ऍड. आनंद गवळी , जिल्हाध्यक्ष दत्तात्रय शिंदे , सुखदेव आबनावें , महिला जिल्हाध्यक्ष मनीषा तिखे , जिल्हा उपाध्यक्ष लहू वाघमारे , राजू पवार , श्रीरंग आबनावें , वसंत कोरेगावकर , लक्ष्मीकांत लक्ष्मीकांत पाचारणे , श्रीकुमार काळे , सुखदेव सूर्यवंशी , कैलास डोईफोडे , राजेंद्र सोनवणे , अनिल सातपुते , राजाभाऊ तिखे , सतीश वाघमारे , संजय लोकापुरे , तुळशीराम साळुंखे, दशरथ कांबळे , बाबा हंकारे , संचल कदम , विकास सोनवणे , प्रकाश ननावरे , कैलास आबनावें , जयदेव इसवे , सुरेश पोटे , उत्तरेश्वर कांबळे , वसंत कांबळे , पंढरीनाथ आबनावें , बजरंग राजगुरू , प्रशांत कदम , राकेश तोरे , राजाभाऊ लांडगे , मोठ्या प्रमाणावर चर्मकार समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .

   आयोगाबद्दल माहिती व मार्गदर्शन ज्ञानेश्वर कांबळे यांनी केले . आभार चर्मकार संघ पुणे शहर कार्याध्यक्ष  रविंद्र खैरे यांनी मानले. यावेळी देशात चर्मकार समाजाला रविदासीया समाज म्हणून मान्यता मिळावी , प्रत्येक राज्यात संत रोहिदास ( रविदास ) चर्मोद्योग आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी , स्व. बाबूजगजीवनराम , मा.  उपप्रतप्रधान यांना भारतरत्न देयूनं सन्मानित करावे , संत रोहिदास ( रविदास ) जयंती दिन शासकीय सुट्टी करावी या मागण्यांचे निवेदन देण्यात आले .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुंबईत राष्ट्रवादी शरद पवार गटाचा महायुतीला पाठिंबा, 11 फेब्रुवारीला नव्या महापौरांची निवडणूक

मुंबई- महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे....

शहराचं बदलणार रूप … शहर परिवर्तन कक्षाची बैठक संपन्न.

पुणे- वाढता शहरच्या वाढत्या समस्यांना फक्त तोंड द्यायचे नाही...

कर्नाटक पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने पुण्यात देशांतर्गत पर्यटन बी 2 बी रोड शोचे आयोजन

पुणे, 5 फेब्रुवारी 2026 केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने, त्यांचे प्रादेशिक...