पुणे – दारूचे अड्डे ,गैर धंदे ,दादागिरी ,तोतयेगिरी ने ग्रस्त झालेल्या कात्रज परिसरात गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विराेधी पथक दाेन यांनी छापा टाकून अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या इसमाकडून दहा लाख 21 हजार रुपये किंमतीचे एक किलाे 21 ग्रॅम चरस हा अंमली पदार्थ जप्त केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी येथे दिली .सर्फराज मुजफ्फर खान (वय ३५, रा. मांगडेवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
त्यांनी सांगितले कि,’ अंमली पदार्थ विराेधी पथकाचे पोलिस अधिकारी व अंमलदार यांचे पथक 23 ऑक्टाेबर राेजी परिमंडळ पाच मधील पोलिस ठाण्याच्या परिसरात पेट्राेलिंग करत हाेते. त्यावेळी पोलिस अंमलदार यांना मिळालेल्या माहितीनुसार एक इसम मांगडेवाडी-कात्रज, पुणे येथे चरस हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचला असता, जाधवनगर, मांगडवेडी, कात्रज,पुणे येथे सार्वजनिक रस्त्यावर एक इसम संशयितरित्या थांबलेला दिसला. त्याच्या पाठीवर एक राखाडी व लाल रंगाची सॅक बॅग हाेती. त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय आल्याने त्यांनी आराेपी सर्फराज खान यास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती व सॅकबॅगची झडती घेतली. त्यावेळी त्याच्या ताब्यात दहा लाख 21 हजार रुपये किंमतीचा एक किलाे 21 ग्रॅम चरस हा अंमली पदार्थ, दहा हजार रुपये किंमतीचा एक माेबाईल असा दहा लाख 31 हजार रुपयांचा ऐवज अनाधिकाराने, बेकायदेशीरित्या विक्रीकरिता जवळ बाळगताना मिळून आला आहे. याप्रकरणी आराेपीवर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात एनडीपीसी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हयाचा पुढील तपास अंमली पदार्थ विराेधी पथक दाेनचे पोलिस उपनरीक्षक एस.नरके हे करत आहे.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलिस आयुक्त संदीप कर्णीक, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पाेकळे, पोलिस उपआयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे, सहा.पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विराेधी पथक दाेनचे पोलिस निरीक्षक सुनील थाेपटे, पीएसआय एस.नरके, पोलिस अंमलदार संताेष देशपांडे, संदीप जाधव, प्रशांत बाेमादंडी, आप्पा राेकडे, साहिल शेख, नितीन जगदाळे, याेगेश मांढरे, आझीम शेख, युवराज कांबळे व महिला पोलिस अंमलदार दिशा खेवलकर यांनी केली आहे.

