‘चपराक प्रकाशन’ तर्फे ‘विचारांच्या धुंदीत’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन महाराष्ट्र साहित्य परिषदेत करण्यात आले. यावेळी डावीकडून कवयित्री प्रज्ञा करंदीकर, सुप्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ, अंजली कुलकर्णी, निशिकांत देशपांडे, ख्यातनाम साहित्यिक आणि संशोधक संजय सोनवणी आणि घनशाम पाटील
————–
पुणे- ‘चपराक प्रकाशन’तर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय दिवाळी विशेषांक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आणि बंगळुरू येथील कवयित्री सौ. प्रज्ञा करंदीकर यांच्या ‘विचारांच्या धुंदीत’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन साहित्य परिषदेच्या पटवर्धन सभागृहात संपन्न झाले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. अंजली कुलकर्णी (सुप्रसिद्ध कवयित्री)तर प्रमुख पाहुणे म्हणून संजय सोनवणी (साहित्यिक आणि संशोधक) आणि
निशिकांत देशपांडे (गझलकार) उपस्थित होते * ‘थिंक पॉझिटिव्ह’* ‘उद्याचा मराठवाडा’
* ‘उत्तम अनुवाद’ या दिवाळी अंकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर लक्षवेधी दिवाळी अंक म्हणून * ‘संचार’ , * ‘जलोपासना’* ‘साहित्यविश्व’ यांचा गौरव करण्यात आला .* ‘स्पर्शज्ञान’ या दिवाळी अंकाला ‘चपराक विशेष साहित्य गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.