चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष:आशिष शेलारांना मुंबई अध्यक्षपद

Date:

मुंबई: भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागल्यामुळे पक्षाचं प्रदेशाध्यक्ष पद रिकामं झालं होतं. त्यांच्याजागी आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवड करण्यात आली आहे. मंत्रिमंडळ विस्तारात चंद्रशेखर बावनकुळे यांना स्थान मिळालं नाही. मात्र, पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद देण्यात आलं आहे. ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जातात. तसेच, ते भाजपचे आक्रमक नेतृत्व म्हणूनही त्यांची ओळख आहे.

कोण आहेत बावनकुळे?

चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे 13 व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. 26 डिसेंबर 2014 रोजी नागपूरचे पालकमंत्री म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. भाजपकडून त्यांनी कामठी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. 2004, 2009 आणि 2014 पासून विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा हा तिसरा कार्यकाळ होता. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे बावनकुळे यांना भाजपने विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तिकीट नाकारले होते. त्यांच्या पत्नी ज्योती यांनाही तिकीट देण्यात आले नाही. आणि त्यांच्या मतदारसंघ असलेल्या कामठीत त्यांच्याऐवजी भाजपचे जुने कार्यकर्ते टेकचंद सावरकर यांना उमेदवारी दिली गेली. यानंतर बावनकुळे यांना पक्षाच्या कार्यापासून दूर ठेवण्यात आले होते. मात्र विधान परिषदेवर संधी देत त्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. तर आता त्यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देत त्यांना मोठी संधी देण्यात आली आहे. तर जातीय समीकरणच्या दृष्टीने मराठा मुख्यमंत्री, ब्राह्मण उपमुख्यमंत्री, आणि ओबीसी प्रदेशाध्यक्ष देत सामाजीक समतोल जपण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला आहे.

बावनकुळेंचा थोडक्यात परिचय

व्यवसाय : शेती. पक्ष : भारतीय जनता पक्ष. मतदारसंघ : नागपूर स्थानिक प्राधिकारी संस्था. इतर माहिती : अध्यक्ष, श्रीक्षेत्र महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी, कोराडी पर्यटनक्षेत्र म्हणून विकसित करण्यासाठी विशेष योगदान अनेक सामाजिक मेळाव्यात सहभाग कोरोनाच्या काळात आरोग्य शिबिरांचे आयोजन अध्यक्ष, जगदंबा लोकसेवा प्रतिष्ठान, कोराडी अध्यक्ष, महालक्ष्मी जगदंबा बिगर शेती सहकारी संस्था नांदाकोराडी

1995 – 99 : उपाध्यक्ष, नागपूर जिल्हा युवा भारतीय जनता पक्ष 1999 – 2001 जिल्हा सचिव, भारतीय जनता पक्ष, नागपूर, 2009 – 2004 संघटन प्रमुख, कामठी भारतीय जनता पक्ष; 2010 – 2011 नागपूर जिल्हा अध्यक्ष, भाजप; 2014 महाराष्ट्र प्रदेश सचिव, भारतीय जनता पक्ष; 1997 – 2002 व2002 – 2004 सदस्य, जिल्हा परिषद, 1997 – 2002 सदस्य, आरोग्य व बांधकाम समिती; 2002 – 2004 गटनेता भाजप व सेना, जिल्हा परिषद, नागपूर, 2004 – 2009, 2009 – 2014 व 2014-2019 सदस्य, महाराष्ट्र विधानसभा, विधिमंडळाच्या पंचायत राज, सार्वजनिक उपक्रम व ग्रंथालय समितीचे सदस्य डिसेंबर, 2014 ते 2019 पर्यंत ऊर्जा, नवीन व नवीकरण ऊर्जा खात्याचे मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालक मंत्री. जानेवारी 2022मध्ये महाराष्ट्र विधानपरिषदेवर निवड.

आशिष शेलार कोण?

भाजपमध्ये अगदी तळागाळातून येऊन ज्यांनी आपली मुद्रा उमटविली, अशांमध्ये शेलार एक आहेत. मूळ गिरणगावच्या चाळ संस्कृतीतले. नंतर वांद्र्यासारख्या कॉस्मो परिसरात वाढले-रुजलेले शेलार हे आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नंतर अभाविप, त्यानंतर भाजयुमो आणि मग भाजप असा रीतसर प्रवास आशिष शेलार यांनी केला आहे. त्यानंतर काही काळ ते मंत्रिमंडळातही पोहचले होते, शिवसेनेशी उघड संघर्षाची भूमिका घेणारे जे मोजके भाजपनेते झाले, त्यात शेलार अग्रभागी राहिले. सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघातून 26 हजार 911 मताधिक्याने विजयी तर सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांंदा 26,550 मताधिक्य राखून विजयी झाले आहेत.

या पदावर होते कार्यरत‌

• मुख्य प्रतोद, विधानसभा,

• माजी मंत्री, शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण

• दोन टर्म अध्यक्ष, मुंबई भाजपा

• आमदार वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघ

• माजी अध्यक्ष, मुंबई क्रिकेट असोसिएशन

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जर्मनीतील शिक्षणा करीता मार्गदर्शन

पुणे, १३ मार्च २५ - सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल...

एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या योजनांचा जागर

पुणे दि. १३: समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती...

बंदिशींद्वारे भारतीय स्त्री शक्तीचा सन्मान

भक्तिसुधा फाऊंडेशनच्या वतीने उर्जा' : सन्मान भारतीय स्त्री आदर्शांचा...