पूरग्रस्त भागातील ‘ चुली ‘ पुन्हा पेटणार!-महसूलमंत्री यांना विश्वास
पेट्रोलियम कंपन्यांच्या माध्यमातून उभारली मोहीम- महसुलमंत्री
पुणे-
पुरामध्ये सर्वस्व वाहून गेलेल्या हजारो कुटुंबियांच्या घरांमधील चुली आता पुन्हा भेटणार आहेत. महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. पेट्रोलियम कंपन्यांच्या सहकाऱ्याने ६० हजारांहून अधिक गॅस-शेगडी पूरग्रस्त कुटुंबीयांना वितरित केल्या जाणार आहेत. तसेच गॅस दुरुस्तीसाठी दोनशेहून अधिक कुशल मेकॅनिक पूरग्रस्त भागांमधील घराघरांमधून दुरुस्ती मोहीम हाती घेत आहेत.
पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी युद्धपातळीवर मोहीम हाती घेण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तूंचा तातडीने पुरवठा करून त्यांचे संसार पुन्हा उभारण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.असे येथे
महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी नुकतेच या संदर्भात पेट्रोलियम कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकीत सांगितले.. यावेळी पूरग्रस्त नागरिकांसाठी मदतीचे आवाहन पाटील यांनी केले.
भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल, हिंदुस्तान पेट्रोलियम, महाराष्ट्र नॅचरल ऑइल अँड गॅस आदी कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
नागरिकांच्या घरांमध्ये पुन्हा गॅस आणि शेगडी च्या माध्यमातून चूल पेटवण्यासाठी त्रिस्तरीय आराखडा यावेळी आखण्यात आला. एक म्हणजे छोटा गॅस सिलेंडर आणि शेगडी असे दोन्ही उपलब्ध करून देणे, किंवा फक्त शेगडी उपलब्ध करून देणे. तसेच पूरग्रस्त भागांमध्ये तातडीने गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत करणे, याला प्राधान्य देण्यात आले आहे.
हजारो घरांमधील गॅस आणि शेगड्या नादुरुस्त झाल्या आहेत. त्यामुळे भविष्यकाळात अपघात होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत या पेट्रोलियम कंपन्यांच्या माध्यमातून कुशल मेकॅनिक पूरग्रस्त भागांमधील प्रत्येक घरांमध्ये जाऊन गॅस आणि शेगडीच्या सुरक्षेबाबत खातरजमा करणार आहेत. तसेच नादुरुस्त शेगड्या व गॅस सिलेंडर संदर्भातील समस्या दूर करून नागरिकांचा संसार पुन्हा उभा करण्यात मोलाचा वाटा उचलणार आहेत.
एमएनजीएलचे संचालक राजेश पांडे यांनी बैठकीसाठी आणि या उपक्रमासाठी समन्वय करीत आहेत.