मुंबई –
राज्यात पुन्हा सत्ता आल्याने भाजपच्या वतीने आज मुंबईच्या प्रदेश कार्यालयात जल्लोषाचे कार्यक्रम ठेवण्यात आला. मात्र, या सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित नव्हते . फडणवीस संध्याकाळी सभेला जाणार असल्याने ते सोहळ्याला हजर राहिले नाही, असे सांगितले जात आहे. या क्रार्यक्रमाला इतरही काही भाजप नेते उपस्थित नव्हते.
या सोहळ्यात बोलताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, मी देवेंद्र फडणवीसांचे आभार मानतो. त्यांनी पक्षादेशाचा मान ठेवला. अंतिम रांगेत बसलेल्या माणसाच्या आयुष्यात खुशी भरणे हाच आमच्या पक्षाचा संकल्प आहे. पण, काही लोकांना मुंबई त्यांची प्रॉपर्टी वाटते, असे म्हणत त्यांनी शिवसेनेवर टीका केली. शिवाय, मुंबईत सत्ता परिवर्तन करण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश त्यांनी कार्यकर्त्याला दिले.
मुंबई भाजप कार्यालयात होणाऱ्या या सोहळ्याचे आयोजन मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार मंगल प्रभात लोढा हे हे करत आहेत. आमदार मंगल प्रभात लोढा हे फडणवीस विरोधी गटातील असल्याचे म्हटले जाते. देवेंद्र यांना मुंबई भाजप अध्यक्षपदावरून लोढा यांच्या जागी आफले आवडते खासदार मनोज कोटक यांना अध्यक्ष करण्याची इच्छा असल्याची चर्चा आहे.
राज्यात सत्तापालट झाले असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपद सोडले. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत. तर उपमुख्यमंत्रीपदाची धुरा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. फडणवीस यांना उप मुख्यमंत्री पद मिळाल्यानंतर ते नाराज असल्याचे कळते.

