पुणे- कोरोनाच्या तिसऱ्या लाटे नंतर झालेल्या प्रचंड महागाईच्या आगडोंबात महाराष्ट्र होरपळून निघत असताना बेरोजगार होत असताना आणि कित्येल व्यवसाय बंद पडत असताना आता चीन आणि युरोपियन देशातील कोरोन रुग्णांची वाढ पाहून केंद्र सरकारने राज्य सरकारला सावधतेचा इशारा दिल्याने आणखी चिंतेत आणि लोक संतापात देखील भर पडते आहे.
युरोपियन देश, दक्षिण कोरिया आणि चीनमध्ये कोविड प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याने आम्हाला सतर्क राहण्यासाठी केंद्र सरकारकडून एक पत्र प्राप्त झाले आहे. त्यानुसार आमच्या आरोग्य विभागाने प्रत्येक जिल्हाधिकारी यांना सावध राहण्यासाठी आणि आवश्यक पावले उचलण्याचे पत्र दिलेआहे असे स्पष्टपणे महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांना सांगितल्याचे वृत्त आहे.

