भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन संपन्न
पुणे-भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या १३६ व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काल सायंकाळी काँग्रेस भवन येथे ‘‘स्नेह मेळावा’’ आयोजित करण्यात आला. वर्धापन दिनाचे औचित्य साधून काँग्रेस भवनला आकर्षक विद्युत रोशनाई करण्यात आली होती. काँग्रेस भवन येथे अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे कटआउटही लावण्यात आले होते. त्याच बरोबर महात्मा गांधी, पं. नेहरू, लाल बहाद्दूर शास्त्री, इंदिरा गांधी, लोकमान्य टिळक आदींसह इतर महामानवांचे कटआउट लावण्यात आले होते. या स्नेह मेळाव्यास सर्व पक्षाचे आजी – माजी पदाधिकारी, विद्यमान नगरसेवक, व कार्यकर्ते उपस्थित होते. पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनिता वाडेकर, राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रशांत जगताप, अंकुश काकडे, RPI चे अध्यक्ष शैलेश चव्हाण, नगरसेवक डॉ. सिध्दार्थ धेंड, बाळासाहेब जानराव, विशाल धनवडे, राहुल डंबाळे, पुणे व्यापरी संघटनेचे अध्यक्ष पोपटशेठ ओसवाल, राजेंद्र भाटिया, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष व पदाधिकारी, दलित चळवळीचे नेते मधुकर चांदणे, ॲड.सुगावकर, भिमराव पाटोळे, मातंग आघाडी नेते हणुमंत साठे, मुस्लिम समाजाचे नेते इकबाल अन्सारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे,मोहन जोशी, माजी आमदार उल्हास पवार, गटनेते आबा बागुल,बाळासाहेब शिवरकर, दिप्ती चवधरी, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, रोहित टिळक, संजय बालगुडे, वीरेंद्र किराड, कमल व्यवहारे, गोपाळ तिवारी यांनी आलेल्या पाहुण्याचे स्वागत केले. या स्नेह मेळाव्यास काँग्रेस पक्षाचे सर्व आजी – माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी सर्व पक्षीय नेत्यांनी राजकीय मतभेद विसरून स्नेह मेळाव्यास उपस्थित राहून काँग्रेस पक्षाच्या १३६ वर्षाच्या वाटचालीबद्दल शुभेच्छा दिल्या.