दिपोत्सव, विविध स्पर्धांचे आयोजन
पुणे, दि. २० जानेवारी: राजमाता जिजाऊजन्मोत्सव समितीतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही लाल महाल येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. चित्रकला आणि पारंपारिपारिक वेषभूषा स्पर्धांबरोबर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. “जय भवानी, जय शिवाजी” चा जयघोष करत यावेळी दिपोत्सव साजरा करण्यात आला. तसेच फ्रांस येथील थॉमस दाम्पत्यांच्या हस्ते शिवराय आणि राजमाता जिजाऊ यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी नगरसेवक गणेश बीडकर, रविंद्र धंगेकर, योगेश समेळ, नगरसेविका पल्लवी जावळे, सुधा पाटील, कल्पना बहिरट, सुरेखा पायगुडे, राजमाता जिजाऊ जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष मुकेश यादव, महिला अध्यक्ष सौ. संगीता भालेराव, मार्गदर्शक तानाजी शिरोळे, प्रशांत धुमाळ, प्रफुल्ल गुजर, संतोष शिंदे, तौर, पुजा खामकर, अॅड. संध्या देशपांडे, छाया खैरनार, विद्या खळदकर, राजश्री सातपूते, नारायण घुटे, राकेश सुतार, सुशील पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

