कृतीशील कार्याने मराठा सेवा संघाचा ३० वा वर्धापन दिवस साजरा

Date:

क्षणात संपणारा स्फोट नको आता,
मनात घोळणारी ताण हवी !!
निमिषात निमणारी आग नको आता,
तानाम तेवणारी ज्योत हवी !!एक पाऊल कृतिशीलते कडे

आज मराठा सेवा संघाचा 30 वा वर्धापन दिवस. मराठा सेवा संघाच्या वैचारिक प्रेरणेतून राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशनची स्थापना झाली. मराठा सेवा संघाच्या वर्धापनदिना निमित्ताने आज ज्यांनी सेवा संघाच्या विचारांना वाहून घेतले अशा मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्या जेष्ठ पदाधिकारिकाऱ्यांना राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून सन्मानित करण्यात आले. आमचे मार्गदर्शक.विकास आण्णा पासलकर, मारुतीराव सातपुते,रमेश गुजर, संतोष शिंदे यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी ऋतुजा गुजर या विद्यार्थिनीला शिष्यवृत्ती योजनेचा धनादेश देण्यात आला. ऋतुजाच्या वडिलांची रिक्षा लॉक डाऊन मध्ये हप्ते थकल्याने फायनान्स कंपनीने ओढून नेली. ऋतुजा स्वतः पुण्यातील विश्रांतवाडी भागात चहाच्या टपरीवर आपल्या आईसोबत काम करून बारावी सायन्स परीक्षा 84% मार्कांनी उत्तीर्ण झाली. मेरिटच्या बेसवर फर्ग्युसन महाविद्यालयात BSC साठी प्रवेश मिळाला, परंतु ऍडमिशन साठी पैसे नसल्याने प्रवेश रखडला. या विद्यार्थिनीला आज राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही शिष्यवृत्ती योजनेचा धनादेश सुपूर्त केला. या विद्यार्थिनीचा संघर्ष व शिक्षणाची जिद्द बघून आमचे मार्गदर्शक संभाजी ब्रिगेडचे प्रदेश निरीक्षक मा.विकास आण्णा पासलकर यांनी तिचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारून तिच्या संपूर्ण शिक्षणकाची जबाबदारी स्वीकारली. उद्या फर्ग्युसन महाविद्यालयात तिच्या प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण होईल. आजचा वर्धापनदिन हा मराठा सेवा संघाच्या सामाजिक कृतज्ञतेच्या भावनेतून कृतीशील उपक्रमाने साजरा करण्यात आला…

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बौद्ध धम्म हा मनःशांती ते विश्वशांती चा प्रतीक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बुद्धगया : भगवान गौतम बुद्धांनी आखिल मानवजातीच्या कल्याणासाठी...

नेपाळमध्ये बस महामार्गावरून नदीत कोसळली, 18 ठार:25 जखमी

काठमांडू:नेपाळमधील धादिंग जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एक बस महामार्गावरून...

हवामान विभागाचा 7 जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’,विदर्भात पावसाचा धुमाकूळ, तर कोकणात आंबा धोक्यात

मुंबई:रविवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या...