पुणे : आंब्याची पाने, तांब्याचा गडवा आणि नारळाच्या सजावटीने साकारलेला शुभकलश, रंगीबेरंगी दिवे, आकर्षक झुंबरे आणि विविधरंगी फुलांनी सजलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात...
दिवाळी आली ...
‘उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली’...मोती साबणाची ही जाहिरात टीव्हीवर यायला लागली की दिवाळी जवळ आल्याचे प्रकर्षाने जाणवते. मोती साबण आणि दिवाळीचं नातं आहेच मुळी तसं. अगदी लहानपणापासून या दोघांचं समीकरण अगदी पक्कं डोक्यात बसलं आहे. कारणही तसंच आहे म्हणा. हमाम, लाईफ बॉय आंघोळीसाठी दररोज वापरणार्या मध्यमवर्गीयांच्या घरी दिवाळीसाठी खास मोती साबणाची खरेदी ठरलेली असायचीच. केवळ मोती साबणच नाही तर दिवाळी बरोबर बर्याच काही गोष्टी जोडलेल्या आहेत. घराची साफसफाई, कंदील, रांगोळी, फराळ, नवीन कपडे...किती आठवणी त्या दिवाळीच्या...दिवाळी जवळ आली की 15 दिवस आधीपासून आजीची धावपळ सुरू व्हायची. खोलीची साफसफाई, आवराआवर आणि मग दिवाळीच्या फराळाला सुरुवात. चकली, चिवडा, शंकरपाळ्या, तिखट शेव, बेसनाचे लाडू, ओल्या नारळाच्या करंज्या...सगळे दिवाळीचे पदार्थ आजी अगदी आवडीने बनवायची. आईची मदतही व्हायची. आजोबांना आवडतात म्हणून अनारसे माटुंग्याची लीला आत्या खास आठवणीने आणून द्यायची.
बाबांबरोबर नवीन कपड्यांची खरेदी व्हायची तर काकाबरोबर फटाके आणायला कधी जायचं याची आतुरतेने वाट पाहायचो. काका मला आणि निलेशला खुप फटाके घेऊन द्यायचा. पण आईला नाही आवडायचं फटाके फोडलेले. ती लहानपणी ह्या फटाक्यांमुळे भाजली होती, म्हणूनच तिला खुप भीती वाटायची. पण मी, निलेश आणि काका खुप फटाके फोडायचो. त्यात लवंगीची माळ न लावता ती एक एक सुटी करुन फोडण्यात भन्नाट मजा यायची. दिवाळीच्या पहिल्या दिवशी सकाळी लवकर उठून तेल व सुगंधी उटण्याने आंघोळ करुन सगळे घरातले फराळ करायला बसायचो. त्यानंंतर आई-बाबांबरोबर देवळातही जाऊन यायचो. बिल्डिंगमध्ये गुजराथी बांधव जास्त असल्याने त्यांच्या नववर्षाच्या दिवशी खुपच धमाल यायची. सगळे घरी साल-मुबारक करायला यायचे. लहान मुलांचा वेगळा ग्रुप, मग सगळ्या मुली, तर काही सगळे सहकुटुंब, सहपरिवार घरी यायचे. तो दिवस कसा निघून जायचा तेच कळायचंही नाही. हल्ली सारखे त्याकाळी मोबाईल फोन तर सोडाच पण साधा फोनही घरोघरी नव्हता. साऱ्या नातेवाईंकाना आणि खास ओळखींच्या माणसांना ग्रीटिंग्ज पाठवण्याची मजा काही औरच होती. पोस्टमनची रोज वाट बघत बसायचो, आपल्याला कुणा कुणाचे ग्रीटिंग्ज येतात ते पाहण्यासाठी. आम्ही शाळेतील मैत्रिणीसुद्धा एकमेकांना आठवणीने ग्रीटिंग्ज पाठवायचो. आजही ती ग्रीटिंग्ज मी जपून ठेवली आहेत. आता ती ग्रीटिंग्जही नाहीत आणि आतुरतेने पोस्टमन काकांची वाट बघणंही नाही. आता फेसबुकचा आणि व्हॉटसऍप चा जमाना आहे. फेसबुकच्या वॉलवर 'हॅप्पी दिवाली' लिहून टाकलं की सगळं 1 सेकंदात फटाफट अपलोड होतं. त्याहून व्हॉटसऍप वर तर एका ग्रुपवरुन आलेला मेसेज दुसर्या ग्रुपवर फॉरवर्ड करायचा. ना त्यात आतुरता वा आनंद...असतो तो फक्त कोरडेपणा. आनंदाच्या व्याख्याही बदललेल्या आहेत आजच्या काळात. असो...
भाऊबीजेला तर पूर्ण दिवस धावपळीत जायचा. सकाळी आम्ही पनवेलला कुंदा आत्याकडे भाऊबीजेसाठी जायचो तर संध्याकाळी मामांकडे भाऊबीज. आईचं कुटुंब मोठं. आई धरुन पाच बहिणी आणि दोन भाऊ. आम्ही कुणाकडेतरी सगळे एकत्र जमायचो. खुप मजा यायची.
सगळ्या आठवणी डोळ्यांपुढे सरकत होत्या...ॐकारचा फोन आला आणि त्या आठवणींतून जागी झाले... ‘आई कंदील आणायला जायचं आहे ना ?’ मनात म्हटलं कंदीलच काय पण परंपरा कायम ठेवणारा मोती साबणसुद्धा आठवणीने आणायचाय...!
पूर्णिमा नार्वेकर
पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,
भिकाजी लाड मार्ग,
दहिसर फाटक जवळ,
दहिसर (प.),
मुंबई - 400068
कार्वी प्रायव्हेट वेल्थने जाहीर केली इंडिया वेल्थ रिपोर्ट 2019 ची 10वी आवृत्ती
वैयक्तिक गुंतवणूकदारांचा कल भौतिक मालमत्तांकडून वित्तीय मालमत्तांकडे वळत असून, गेल्या 5 वर्षांत...
पुणे- जितेंद्र जगताप यांस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले माजी उपमहापौर व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांच्यासह दोघांची मुंबई हायकोर्टाने एक...
सातारा - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रचारसभांच्या झंझावाताची चर्चा राज्यभर चांगली रंगली. तसेच, पायाला जखमा असतानाही वयाच्या 80 व्या वर्षी शरद पवार...