News

वेदांत,शुभंकर व फर्नांडिस यांच्याकडून सुवर्णपदकांची ‘अपेक्षा’ पूर्ती

जलतरणात पदकांचा चौकार भोपाळ-महाराष्ट्राच्या वेदांत माधवन, शुभंकर पत्की, अपेक्षा फर्नांडिस यांनी सुवर्णपदकांची 'अपेक्षा' पूर्ण करताना सोनेरी हॅट्ट्रिकही नोंदविली. अर्जुनवीर गुप्ता या महाराष्ट्राच्या खेळाडूला मात्र कांस्यपदकावर...

मध्य प्रदेशात ग्वाल्हेर येथे जी-20 संकल्पनेवर आधारित “महिला सक्षमीकरण आणि महिला पोषण” यावर जागरूकता तसेच प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

भारताच्या जी20 अध्यक्षपदाची संकल्पना 'वसुधैव कुटुंबकम'  पुणे- येथील वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेने जी20 संकल्पनेअंतर्गत 10 फेब्रुवारी 2023 रोजी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे लक्ष्मीबाई महिला नागरी सहकारी बँकेच्या सहकार्याने "महिला सक्षमीकरण आणि महिला पोषण" या विषयावर जागरूकता आणि प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे. महिलांना बचत गटांच्या सक्रिय सदस्य होण्यासाठी आणि नवे नवोन्मेषी आर्थिक उपक्रम सुरू करण्यासाठी प्रेरित करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. पौष्टिक आहार आणि त्याचे महत्त्व याबद्दल जागरुकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा दुसरा उद्देश होय. यात महिलांना पोषक आहाराची संकल्पना समजावून सांगितली जाणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना उपलब्ध असलेल्या विविध योजनांची माहिती मिळणार आहे. महिला बचत गट सदस्य, महिला शेतकरी, महिला कृषी-उद्योजक, महिला बँक प्रतिनिधी आणि लक्ष्मीबाई महिला नागरी सहकारी बँकेच्या विविध विभागातील महिला अधिकारी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. ग्वाल्हेर येथे होणाऱ्या या कार्यक्रमात सुमारे 100 ते 150 प्रशिक्षणार्थी सहभागी होणार आहेत. उद्घाटन समारंभानंतर डॉ.  वीणा प्रधान महिलांच्या आरोग्याविषयी माहिती देणार आहेत.  डॉ. प्रियदर्शिनी श्रीवास्तव महिलांसाठी पौष्टिक आहार आणि पोषणाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करतील आणि अंजली बत्रा महिला सक्षमीकरण आणि महिलांसाठी व्यवसाय संधी याविषयी उदाहरणांसह माहीती देतील.  प्रत्येक सत्रानंतर प्रश्नोत्तरे होतील. कार्यक्रमाची संकल्पना वॅम्निकॉमच्या डॉ. पल्लवी इंगळे (सहयोगी प्राध्यापक) आणि भोपाळ आयसीएमचे डॉ. अमित मुदगल (प्रभारी संचालक) यांची आहे. लक्ष्मीबाई महिला बँकेच्या संस्थापक अध्यक्षा अलका श्रीवास्तव तांत्रिक सत्रासाठी कार्यक्रमास सहकार्य करतील.

जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालय कक्षात प्राप्त अर्जांवर तत्काळ कार्यवाही करण्याच्या मुख्य सचिवांच्या सूचना

मुंबई : स्थानिक पातळीवर नागरिकांच्या अर्जांवर तत्पर कार्यवाही होण्याच्या उद्देशाने जिल्हास्तरावर सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सचिवालय कक्षात प्राप्त अर्ज तातडीने निकाली काढण्याच्या सूचना मुख्य सचिव मनुकुमार...

…पुन्हा पुढं ढकलली,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भातील सुनावणी

नवी दिल्ली : आज सर्वोच्च न्यायालयात महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सुनावणी होणार होती. सुप्रीम कोर्टाच्या कामकाजात हे चौथ्या क्रमांकावर प्रकरण...

‘आरे’ वसाहतीचा कायापालट करण्यासंदर्भात कार्यवाही करावी – पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई, दि. 7 : ‘आरे’ दुग्धवसाहतीतील पडीक जमिनीचा वापरात आणून शासनाला उत्पन्न मिळण्यासंदर्भात उपाययोजना कराव्यात. तसेच आरे वसाहतीचा कायापालट करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश महसूल,...

Popular