Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

Local Pune

कथक नृत्यांगना श्रद्धा मुखडे हिला नृत्यगुरू पंडित बिरजू महाराज युवा पुरस्कार

देशपातळीवर घेण्यात आलेल्या स्पर्धेत बहुमान पुणे : दिल्लीतील पंडित बिरजू महाराजजी कलाश्रमतर्फे देशपातळीवर घेण्यात आलेल्या नृत्य स्पर्धेत नृत्यगुरू शभा भाटे यांची शिष्या आणि पुण्यातील युवा कथक नृत्यांगना श्रद्धा मुखडे हिला पहिल्या नृत्यगुरू पंडित बिरजू महाराज युवा पुरस्काराने गौरविण्यात आले. लखनऊ घराण्याचे प्रसिद्ध कथक नर्तक, पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांनी कलाश्रम ही संस्था स्थापन केली. पंडित बिरजू महाराज यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृती चिरंतन रहाव्यात यासाठी संस्थेतर्फे पंडित बिरजू महाराज कलाश्रमतर्फे साधना महोत्सवात १८ ते २५ वयोगटातील कथक नृत्य कलाकारांसाठी देशपातळीवर कथक नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संस्थेतर्फे अर्ज मागविण्यात आले होते. देशाच्या विविध भागातून या स्पर्धेत सहभागी झालेल्या कलाकारांमधून २० कलाकारांची अंतिम फेरीसाठी निवड झाली. अंतिम फेरी दिल्ली येथील त्रिवेणी कलासंगम ऑडिटोरिअम येथे घेण्यात आली. महाराष्ट्रातील केवळ तीन स्पर्धक अंतिम फेरीत पोहोचले होते. नृत्यगुरू शभा भाटे यांच्याकडे गेल्या १० वर्षांपासून श्रद्धा मुखडे नृत्याचे प्रशिक्षण घेत असून त्यांच्या समवेत विविध नृत्य महोत्सवांमध्ये सहभागी होत आहे. कथक गुरू मंजुश्री चॅटर्जी आणि कथक गुरू डॉ. पद्मश्री शोभना नारायण यांच्या हस्ते श्रद्धा मुखडे हिला पंडित बिरजू महाराज युवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. गुरू मंजुश्री चॅटर्जी, गुरू गीतांजली लाल, संगीता सिन्हा, कल्पना वर्मा, अनिता कुलकर्णी यांनी स्पर्धेचे परिक्षण केले.

डिझेल भरण्यासाठी थांबलेला कंटेनर पेटला-कंटेनरमधील 40 न्यू ब्रँड ई-स्कुटर जळून खाक

पुणे - चाकण परिसरात पहाटेच्या सुमारास एक मोठी दुर्घटना टळली आहे. तळेगाव-चाकण रस्त्यावरील खराबवाडी गावात असलेल्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळ डिझेल भरण्यासाठी आलेल्या एका...

शिक्षण हेच परिवर्तनाचे मोठे साधन : डॉ. गजानन एकबोटे

दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीतर्फे डॉ. अ. ल. देशमुख यांना ‌‘आबासाहेब अत्रे पुरस्कार‌’ तरविनया देसाई, संजय भैलुमे यांचा ‌‘इंदिरा आबासाहेब अत्रे पुरस्कार‌’ पुणे : शिक्षण हे परिवर्तनाचे मोठे साधन आहे. शिक्षणामुळे केवळ स्वतःमध्ये नाही तर समाज आणि देशामध्येही बदल घडून येण्यास मदत होते. त्यामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले तर समाज परिवर्तन होणार नाही. त्यामुळे शिक्षणाला कायमच विशेष महत्त्व असायला हवे, असे मत सर्जनशील शिक्षणतज्ज्ञ व प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे यांनी व्यक्त केले. दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीतर्फे किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे पुरस्कृत ‌‘आबासाहेब अत्रे पुरस्कार‌’ ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अ. ल. देशमुख यांना तर ‌‘इंदिरा आबासाहेब अत्रे पुरस्कार‌’ क्रीडा क्षेत्रातील निवृत्त शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते संजय भैलुमे तसेच कर्णबधिर मुलांच्या शिक्षिका, निवेदक, लेखिका विनया देसाई यांना डॉ. एकबोटे यांच्या हस्ते आज (दि. २९) प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. संस्थेच्या खुल्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुरस्काराचे हे १४ वे वर्ष आहे. डॉ. देशमुख यांना दिल्या गेलेल्या पुरस्काराचे स्वरूप पंधरा हजार रुपये व मानचिन्ह तर संजय भैलुमे व विनया देसाई यांना दिल्या गेलेल्या पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी दहा हजार रुपये व मानचिन्ह असे आहे. दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष संजीव महाजन, सचिव प्रफुल्ल निकम, डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनचे मानद अध्यक्ष अशोक वळसंगकर मंचावर होते. पुरस्कार संयोजन समिती प्रमुख प्रसाद भडसावळे, डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनच्या सचिव डॉ. भारती एम. डी. यांची उपस्थिती होती. डॉ. एकबोटे म्हणाले, आबासाहेब अत्रे हे माझ्या वडिलांचे जवळचे मित्र होते, त्यामुळे त्या काळात प्रतिकूल परिस्थितीत आबासाहेबांनी ही शाळा उभी करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी काय कष्ट घेतलेत ते मी जवळून पाहिले आहेत. अशा व्यक्तींमुळेच शिक्षणाचे महत्त्व टिकून आहे. आपला देश हा राजकारण्यांमुळे चालत नाही, तर समाजात विविध क्षेत्रात मनापासून काम करणाऱ्या व्यक्तींमुळे हा देश चालत आहे. अशा व्यक्ती समाजातील आदर्श आणि हिरे असतात. शिक्षणावर विश्वास ठेवायलाच हवा.. शिक्षणतज्ज्ञ डॉ. अ. ल. देशमुख म्हणाले, सध्या शिक्षणाची मोठ्या प्रमाणात ससेहोलपट झाली आहे. पूर्वीच्या काळातील शिक्षण आणि आताचे शिक्षण यामध्ये खूप मोठी दरी निर्माण झाली आहे. शिक्षणाशिवाय देश, समाज मोठा होऊ शकत नाही, त्यामुळे शिक्षणावर विश्वास ठेवायलाच हवा. विनया देसाई आणि संजय भैलुमे यांनीही मनोगत व्यक्त केले. उदय जगताप यांनी संजय भैलुमे यांचा, सुप्रिया गोडबोले यांनी विनया देसाई यांचा आणि स्नेहल दामले यांनी डॉ. अ. ल. देशमुख यांचा परिचय करून दिला. अपर्णा डोळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. जगाला भारताने शिक्षणाची परंपरा दिली असून आजही भारतीय शिक्षण पद्धतीमुळे देश अनेक क्षेत्रात उंचीवर आहे. शिक्षणाच्या माध्यमातून प्रेरणा आणि प्रोत्साहन द्यायला हवे, हे सांगत असताना लाडकी बहिण योजनेसोबतच सरकारने लाडका शिक्षक योजना राबवायला हवी. राजकारण्यांनी शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा. -        डॉ. अ. ल. देशमुख

मराठी साहित्य आणि प्रकाशन व्यवसायात उत्थानाची गरज : भारत सासणे

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे अशोक मुळे यांचा जीवनगौरव तर ल. म. कडू यांचा साहित्यसेवा कृतज्ञता  पुरस्काराने गौरव पुणे : नव्या काळाची आव्हाने स्वीकारत मराठी भाषा, साहित्य आणि प्रकाशन व्यवसायाला उत्थानाची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक,  अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी भारत सासणे यांनी केले. अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ आयोजित उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती, दिवाळी अंक निर्मिती पुरस्कार, जीवनगौरव आणि साहित्यसेवा पुरस्कार वितरण सोहळ्यात सासणे अध्यक्षपदावरून बोलत होते. टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स येथील सभागृहात  या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  ज्येष्ठ बालसाहित्यकार ल. म. कडू, डिंपल प्रकाशनाचे अशोक मुळे, प्रसिद्ध लेखक, नाटककार,  दिग्दर्शक, अभिनेते योगेश सोमण, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे, पराग लोणकर व्यासपीठावर उपस्थित होते. या समारंभात डिंपल पब्लिकेशनचे संचालक अशोक मुळे यांना जीवनगौरव पुरस्काराने तर बालसाहित्यकार ल. म. कडू यांना साहित्यसेवा कृतज्ञता  पुरस्काराने गौरविण्यात आले. सुप्रसिद्ध अभिनेते, लेखक, दिग्दर्शक योगेश सोमण यांची प्रमुख उपस्थिती होती. सासणे पुढे म्हणाले, आपली प्राचीन ज्ञानपरंपरा पोहोचणारे ऋषी, हे प्रकाशन व साहित्याचे आद्य रूप म्हटले पाहिजे. लेखकाचे शब्द रसिकांसमोर, वाचकांसमोर आणणारा दुवा, प्रकाशक असतो. नव्या काळात वाचक कमी होणे, मराठी वाचन घटणे अशी आव्हाने आहेत.  त्यासाठी मराठीमधील अभिजात साहित्य पुन्हा प्रकाशित करण्याची आवश्यकता आहे. मराठी साहित्य आणि प्रकाशन व्यवसायाने कात टाकून उभे राहिले पाहिजे, असे ते म्हणाले. योगेश सोमण यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम या वेळी आयोजित करण्यात आला होता. त्यांच्याशी...

कथित पत्रकाराकडून वृंदावन लॉज येथे विवाहितेवर अत्याचार; लोणी काळभोर पोलिसांकडून गुन्हा दाखल!

पुणे -हात उसने देऊन अडकलेले पैसे काढून देतो असे सांगत कथित पत्रकाराने महिलेला शीतपेयातून गुंगीची औषध पाजून लॉजवर नेत जबरदस्तीने शारीरिक संभोग केल्याची...

Popular