Local Pune

अगर तुम ना होते कार्यक्रमातून किशोर कुमार यांना स्वरांजली

पुणे : यॉडलिंगचा बादशहा आणि बहुगुणी कलाकार किशोर कुमार यांच्या ३८व्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या अनेक गीतांची जादू पुन्हा एकदा रसिकांना अनुभवायला मिळाली. निमित्त होते पूना गेस्ट हाऊस स्नेह मंच आयोजित सुप्रसिद्ध गायक किशोर कुमार यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांना वाहिलेल्या सांगीतिक स्वरांजलीचे.  अगर तुम ना होते या कार्यक्रमाचे आयोजन आज (दि. १३) पूना गेस्ट हाऊस येथे करण्यात आले होते. या कायर्क्रमात अजय राव व ॲड. रुचिरा गुरव यांनी किशोर कुमार यांची सदाबहार गीते सादर केली. अनेक दशके आपल्या सुरांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या किशोर कुमार यांनी हिंदी चित्रपट सृष्टीवर आपल्या सुरांची मोहिनी पसरवली होती. अगर तुम ना होते, रिमझिम गिरे सावन, हाल कैसा है जनाब का, ओ हंसिनी, नखरेवाली, जिंदगी के सफर में, कोरा कागज था ये मन मेरा, पन्नाकी तमन्ना, ओ मेरे दिल के चैन, आपकी आखों मे यांसह अनेक सुप्रसिद्‌ध गीते या प्रसंगी सादर करण्यात आली. हृदयाला स्पर्श करणारे शब्द, आणि जादूई आवाज याने रसिकांना मोहित केले. अनेक गाण्यांना वन्स मोअर देत तर अनेकदा गायकांच्या सुरात सूर मिसळत, टाळ्या आणि शिट्ट्यांनी दाद देत हा अनोखा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. रत्ना दहीवेलकर यांनी कार्यक्रमाचे खुमासदार शैलीत निवेदन केले. कर्नल वसंत बल्लेवार, शरयू जोशी, व्हाईस ऑफ किशोर कुमार म्हणून ओळखले जाणारे गायक विजय केळकर व अनिल घाटगे, मेलडी मेकर्सचे अशोककुमार सराफ  यांच्यासह पिंपरी-चिंचवड नाट्य परिषद शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, मंदार जोशी, डॉ. प्रसाद पिंपळखरे, प्रा. सविता केळकर, आनंद सराफ अशा अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावत कलाकारांना प्रोत्साहित केले. कलाकरांचे स्वागत पूना गेस्ट हाऊसचे संचालक डॉ. किशोर सरपोतदार यांनी केले. तर संयोजन अजित कुमठेकर यांचे होते.

शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

पुणे, दि. १४ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २८ डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (एनएमएमएस) परीक्षेचे अर्ज...

राष्ट्रीय पोषण माहनिमित्त भोरमध्ये बहुमाध्यम प्रदर्शनाचे आयोजन

पुणे, दि. 14 :- केंद्रीय संचार ब्युरो, भारत सरकार तर्फे राष्ट्रीय पोषण माह 2025 अंतर्गत बहुमाध्यम माहिती व चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे....

सणासुदीच्या काळात सुरक्षित डिजिटल पेमेंटसाठी एनपीसीआयकडून सुरक्षेसाठी 5 प्रमुख टिप्स

पुणे-सणासुदीचे दिवस म्हणजे उत्सव, भेटवस्तू आणि वाढत्या खरेदी विक्रीचा काळ. ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही ठिकाणी आकर्षक सवलती, मर्यादित काळासाठी विक्री आणि कॅशबॅक जाहिराती दिल्या जातात, जे...

महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम, २०२५साठी 17 ऑक्टोबर पर्यंत सूचना, हरकती करण्याचे आवाहन

पुणे, दि. 13: अॅप बेसच्या वाहनांसाठीच्या महाराष्ट्र मोटर व्हेईकल ॲग्रीगेटरर्स नियम 2025 धोरणाबाबत प्रारुप नियमावली प्रसिद्ध झाली आहे. या सदर प्रारुप नियमांच्या अधिसूचनेच्या अनुषंगाने...

Popular