Industrialist
भारतात ४०,००० फोक्सवॅगन वाहनांची विक्री करणारी देशातील पहिली मल्टी- स्टेट डीलर पीपीएस मोटर्स
हैद्राबाद, – पीपीएस मोटर्स – मोठ्या वाहन समूहाचा भाग – देशातील सर्वात मोठ्या वाहन समूहांपैकी एक असलेल्या कंपनीने ४०,००० फोक्सवॅगन वाहनांच्या विक्रीचा टप्पा साध्य केल्याचे जाहीर केले असून, हा विक्रम करणारी ती भारतातील पहिलीच मल्टी- स्टेट डीलर ठरली आहे. पीपीएस मोटर्सकडे फोक्सवॅगनचे सर्वाधिक टचपॉइंट्स आहेत. तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि आसाम या पाच राज्यांत मिळून एकूण ३३ टचपॉइंट्स कार्यरत आहेत.
कोविड महामारीनंतर वाहन उद्योगात मंदी येऊनही पीपीएस मोटर्सने ३३ टच पॉइंट्सपर्यंत विस्तार करत, कंपनी फोक्सवॅगनसाठी सर्वात मोठे नेटवर्क भागीदार बनली आहे. सध्या भारतात प्रत्येक दहावे फोक्सवॅगन वाहन पीपीएस मोटर्सच्या माध्यमातून विकले जाते. यावरून कंपनीचे बाजारपेठेतील आघाडीचे स्थान आणि ग्राहक समाधानाप्रति असामान्य बांधिलकी दिसून येते. पीपीएस मोटर्स - फोक्सवॅगन टचपॉइंट्सना गुगलवर असलेले ४.८ रेटिंग दर्जेदार सेवा आणि ग्राहकांना मिळणारे समाधान दर्शविणारे आहे.
पीपीएस मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राजीव संघवी याप्रसंगी म्हणाले, ‘गेल्या दीड दशकांच्या या प्रवासात फोक्सवॅगनसह भागीदारी केल्याचा आम्हाला आनंद होत असून, हा काळ आमच्यासाठी फलदायी होता. ग्राहकांनी दाखविलेला विश्वास आणि पाठिंब्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत. त्यांच्याप्रमुळे पीपीएस मोटर्सला ४०,००० कार विक्रीचा टप्पा ओलांडणे शक्य झाले. फोक्सवॅगनची सर्वात मोठी भागीदार असल्याचा आणि भारतातील प्रत्येक दहावी फोक्सवॅग पीपीएस मोटर्सतर्फे विकली जात असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो.’
याप्रसंगी फोक्सवॅगन पॅसेंजर कार्स इंडियाचे ब्रँड संचालक श्री. आशिष गुप्ता म्हणाले, ‘या असामान्य कामगिरीसाठी आम्ही पीपीएस मोटर्सचे अभिनंदन करतो. ते बऱ्याच काळापासून आमचे भागीदार आहेत आणि प्रमुख बाजारपेठांत फोक्सवॅगनच्या विकासाला चालना देत आहेत. आम्हाला विश्वास वाटतो की, पीपीएस मोटर्स आमच्या विस्तारित फोक्सवॅगन कुटुंबाला दर्जेदार ग्राहकसेवा पुरवत सातत्याने नवे मापदंड प्रस्थापित करेल.’
४०,००० वी फोक्सवॅगन कार, रिफ्लेक्स सिल्व्हर कलर्ड व्हर्च्युस कम्फर्टलाइन हैद्राबादमधील कुकटपल्ली सिटी शोरूममध्ये आयोजित करण्यात आलेल्या खास कार्यक्रमात प्रदान करण्यात आली.
गेल्या पंधरा वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या भागीदारीत पीपीएस मोटर्सने १५ पुरस्कार व मानसन्मान मिळविले आहेत. पीपीएस मोटर्स संपूर्ण भारतातील विक्रीमध्ये पहिल्या क्रमांकावर असून फोक्सवॅगनने २०१९, २०२०, २०२१, २०२३ मध्ये सर्वोच्च विक्री योगदान पुरस्कार, फोकस सेगमेंट २०२३ मधील सर्वोत्तम कामगिरीचा पुरस्कार, बेस्ट एक्सचेंज सेल्स पेनट्रेशनचा पुरस्कार सलग तीन वर्ष (२०२१, २०२२, २०२३), सर्वोच्च विक्री पुरस्कार तैगुन आणि तिगुन, तसेच पीपीएस मोटर्सकडून इतर सन्मानांसह सादर केला आहे.
एसबीआयतर्फे ‘एमएसएमई सहज’ – संपूर्ण डिजिटल इनव्हॉइस फायनान्सिंग सुविधेचे अनावरण
एमएसएमई कर्जाचा टीएटी केवळ १५ मिनिटांत
मुंबई – स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) या देशातील सर्वात मोठ्या बँकेने ‘एमएसएमई सहज’ ही वेब- आधारित डिजिटल व्यवसाय कर्ज सुविधा एमएसएमईच्या इनव्हॉइस फायनान्सिंगसाठी खास उपलब्ध केली आहे. ही सुविधा डेटा- ड्रिव्हन इनव्हॉस फायनान्सिंग क्रेडिट असेसमेंट इंजिन म्हणून विकसित करण्यात आली असून ती कर्जासाठी अर्ज करण्यापासून, कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे आणि मंजूर झालेल्या कर्जाचे १५ मिनिटांत वितरण करण्यापर्यंत सर्व सेवा कोणत्याही मानवी हस्तक्षेपासह देते. ड्यु डेट रोजी कर्ज बंद करण्याची प्रक्रियाही स्वयंचलित असून ती सीस्टिमद्वारे पूर्ण केली जाते. ‘एमएसएमई सहज’ वापरून बँकेच्या ग्राहकांना त्यांच्या जीएसटी नोंदणीकृत १ लाख रुपयांपर्यंतच्या विक्री इनव्हॉइसवर १५ मिनिटांपेक्षा कमी वेळेत अर्थसाहाय्य मिळविता येते.
हे उत्पादन मशिन लर्निंग मॉडेलवर आधारित असून जीएसटीआयएनवरील अधिकृत डेटा, ग्राहकाचे बँक स्टेटमेंट्स आणि सीआयसी डेटा बेस इत्यादी वापरते.
जीएसटी यंत्रणेचा भाग असलेल्या लघू एसएमई युनिट्सच्या खेळत्या भांडवलाच्या लघुकालीन गरजा पूर्ण करण्यासाठी ‘ऑन टॅप’ कर्ज मिळवून देणे हा या उत्पादनाचा हेतू आहे. हे उत्पादन योनोवरील डिजिटल मोडद्वारे एसबीआयच्या सध्याच्या ग्राहकांना उपलब्ध करून दिले जाईल आणि एमएसएमईजना तातडीने रोख रक्कम पुरवत त्यांची रोखीची समस्या सोडवेल.
एमएसएमई सहज लाँच करत एसबीआयने परत एकदा एमएसएमई कर्ज क्षेत्रात नवा मापदंड प्रस्थापित केला आहे. एमएसएमई क्षेत्रावर पुढील पाच वर्षे बँकेतर्फे जास्त भर दिला जाणार असून हे नावीन्यपूर्ण डिजिटल उत्पादन डिजिटल कर्ज क्षेत्रात बँकेने टाकलेले लक्षणीय पाऊल आहे.
हे उत्पादन स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सोल प्रोप्रायटरशिप नॉन- क्रेडिट आणि बँकेसह समाधानकारक करंट खाते असणाऱ्या ग्राहकांसाठी खास तयार करण्यात आले आहे. हे नावीन्यपूर्ण उत्पादन बँकेच्या इंटरनेट बँकिंग अँपपद्वारे सहजपणे उपलब्ध असेल.
एसबीआयचे अध्यक्ष श्री. दिनेश खारा म्हणाले, ‘एसएमई व्यावसायिक कर्जांसाठी डिजिटल सुविधा उपलब्ध करत या क्षेत्रात नवा मापदंड तयार करण्यासाठी एसबीआय बांधील आहे. त्यासाठी एमएसएमई कर्ज क्षेत्रात सातत्याने नावीन्यपूर्ण उत्पादने उपलब्ध करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. हेच प्रयत्न आणखी बळकट करण्यासाठी एमएसएमई सहज तयार करण्यात आले असून, त्याद्वारे एमएसएमईजना डिजिटल साधनांच्या मदतीने जास्त जलद आणि सहजपणे वित्त सुविधा उपलब्ध करून देण्याचे ध्येय आहे. विशेषतः ही संपूर्ण प्रक्रिया स्वयंचलित पद्धतीसह तयार करण्यात आली आहे. एमएसएमई सहज हे एमएसएमई कर्ज क्षेत्रात नावीन्य आणि ग्राहकाभिमुखता आणण्याच्या आणि व्यवसाय करण्यातील सुलभपणा वाढविण्याच्या आमच्या प्रयत्नांचे फलित आहे. एमएसएमई सहजद्वारे वेगवान आणि इंट्युटिव्ह कर्ज सुविधा पुरवून देशात आघाडीची एमएसएमई कर्जपुरवठादार म्हणून आमचे स्थान आणखी बळकट करण्याचे ध्येय आहे.’
या भावनेला दुजोरा देत एसबीआय रिटेल बँकिंग आणि ऑपरेशन्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री. विनय तोन्से म्हणाले, ‘एमएसएमई क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी बँकेतर्फे अर्थव्यवस्थेतील एमएसएमई क्षेत्राची क्षमता आणि नावीन्यपूर्ण डिजिटल सुविधांची सांगड घातली जात आहे. एमएसएमई सहज- डिजिटल बिझनेस लोन्स फॉर इनव्हॉइस फायनान्सिंग ही सुविधा जीएसटी यंत्रणेचा भाग असलेल्या लघू एमएसई युनिट्सना एसबीआयच्या योनो बी वर डिजिटल मोडमध्ये ‘ऑन टॅप’ या लघुकालीन कर्ज सुविधेच्या मदतीने खेळत्या भांडवलाची गरज पूर्ण करेल.’
एअर इंडिया अमरावती येथे दक्षिण आशियातील सर्वात मोठी उड्डाण प्रशिक्षण संस्था स्थापन करणार,दरवर्षी 180 व्यावसायिक पायलट पदवीधर तयार करणार
● महाराष्ट्रातील अमरावती येथे पायलट प्रशिक्षण सुविधा Q1 FY26 मध्ये कार्यान्वित होईल
● प्रशिक्षणासाठी असतील 31 सिंगल-इंजिन आणि तीन ट्विन-इंजिन विमाने
गुरुग्राम, 1 जुलै, 2024 : एअर इंडिया ही भारतातील आघाडीची जागतिक विमान कंपनी असून, ही कंपनी आता महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) च्या पुढाकाराचा एक भाग म्हणून महाराष्ट्रातील अमरावती...
नवीन सहज-सुलभ उपयुक्त ट्रॅक्टर – अल्पभूधारक आणि लहान शेतकऱ्यांच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक
मुंबई--अल्पभूधारक आणि लहान शेतकऱ्यांची कृषी उत्पादकता वाढवण्यात अलीकडेच नव्यानं तयार करण्यात आलेले आटोपशीर, परवडण्याजोगे आणि सहज हाताळण्याजोगे ट्रॅक्टर कमी खर्चात लाभदायक ठरत आहेत. हे ट्रॅक्टर...
स्पेक्ट्रम लिलाव 2023-24 यशस्वीरित्या संपन्न
दूरसंवाद सेवा प्रदात्यांच्या नवीन स्पेक्ट्रम गरजा पूर्ण करण्यासाठी आणि मोबाइल सेवांचे सातत्य तसेच वाढ याकरिता कालबाह्य होणाऱ्या परवान्यांच्या नूतनीकरणासाठी लिलावाचे आयोजनएकूण 141.4 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रमच्या...
