पुणे : गोवा ने नवीन आंतरराष्ट्रीय मार्गाचे स्वागत केले: उझबेकिस्तान एअरवेजने ताश्कंद-मोपा फ्लाइट्सची सुरुवात केली – उझबेकिस्तान एअरवेजने अधिकृतपणे ताश्कंदहून गोव्याला थेट उड्डाणांची घोषणा...
विशेष आवरण आणि माय स्टँप प्रकाशनाद्वारे या मैलाच्या टप्प्याचा सोहोळा
मुंबई: एसएमएफजी इंडिया क्रेडिट कं. लि., भारताची गैर-बँकींग वित्तीय कंपनी (एनबीएफसी) क्षेत्रातील एक प्रमुख कंपनी असून, त्यांनी वाशी, नवी मुंबई इथे आपल्या 1000व्या शाखेच्या आरंभाची घोषणा केली आहे. या लक्षणीय प्रसंगामुळे देशभरातील आपला विस्तार करण्यामागील आणि अद्याप शिरकाव न झालेल्या बाजारपेठांपर्यंत वित्तीय सेवा पोहोचवण्यातील कंपनीची अढळ निष्ठा दृग्गोचर झाली आहे. या लक्षणीय मैलाच्या टप्प्याच्या निमित्त, एमएमएफजी इंडिया क्रेडिटनं इंडिया पोस्टसोबत सहयोग करुन एक विशेष आवरण आणि माय स्टँप प्रकाशित केले. या अधिकृत अनावरण प्रसंगी श्री. योगी कोजी, कॉन्सुल-जनरल, जपानचे मुंबईतील कॉन्सुलेट-जनरल, श्री. अभिजीत बनसोडे, संचालक – टपाल सेवा (मुख्यालय) महाराष्ट परिमंडळ, सोबत श्री. शांतनु मित्रा, सीईओ आणि एमडी, एसएमएफजी इंडिया क्रेडिट हे मान्यवर उपस्थित होते.
1000व्या शाखेचा आरंभ म्हणजे भव्य आणि वैविध्यपूर्ण भारतीय बाजारपेठेच्या अंतर्गत आपली उपस्थिती आणखी खोलवर नेण्याच्या एसएमएफजी इंडिया क्रेडिटच्या धोरणात्मक दृष्टिकोनाची ही पावती आहे. 2007 मध्ये स्थापना झाल्यापासून, कंपनीने निरंतर वृद्धिचा पाठपुरावा करत, एक अखिल-भारतीय संस्थेत रुपांतर केले आहे जी आता 670 हून अधिक शहरं आणि 70,000 गावांमध्ये कार्यरत असून, 23,000 हून अधिक कर्मचाऱ्यांचं पाठबळ तिला लाभलं आहे.
मागील दोन वर्षांमध्ये, एमएमएफजी इंडिया क्रेडिटने अंदाजे 300 नवीन शाखांची भर घातली असून, यापैकी लक्षणीय 95% शाखा स्तर-2+ शहरं आणि अर्ध-ग्रामीण भागांमध्ये स्थापन केलेल्या आहेत. हा विस्तार संपूर्ण भारतातील वैविध्यपूर्ण लोकसंख्येला औपचारिक पत पुरवठा देण्यासाठी कंपनीच्या मोहिमेशी सुसंगत आहे, त्याद्वारे त्यांना वित्तीय स्वातंत्र्य साध्य करण्याची शक्ती मिळाली आहे.
श्री. शांतनु मित्रा, सीईओ आणि एमडी, एसएमएफजी इंडिया क्रेडिट, यांनी या भव्य प्रसंगाबाबत बोलताना सांगितलं, "आमच्या 1000व्या शाखेचं उद्घाटन एक लक्षणीय टप्पा आहे जो संपूर्ण भारतातील लोकांना औपचारिक पत पुरवठा करण्यातील आणि त्यांना वित्तीय स्वातंत्र्य साध्य करण्यात मदत करण्यामधील आमची सखोल वचनबद्धता दर्शवतो. आम्ही ही कामगिरी साजरी करत असताना, टपाल विभागाच्या सहयोगाने एक विशेष आवरण आणि माय स्टँप प्रकाशित करताना आम्हाला अभिमान वाटत आहे, ही घटना कंपनीने आजवर साध्य केलेल्या वृद्धिची आणि भारताच्या वित्तीय सेवा क्षेत्रातील योगदानाची द्योतक आहे. आमचा प्रवास निरंतर बदलत राहण्याचा, ग्राहकांच्या बदलत्या गरजांशी जुळवून घेण्याचा त्याचबरोबर सर्वांसाठी वित्तीय सेवा उपलब्ध करणे आणि समाधानी वृद्धी गाठण्यासाठी सक्षम करण्याच्या आमच्या मोहिमेशी जुळणारा आहे.”
हा मैलाचा टप्पा न केवळ कंपनीच्या वृद्धि धोरणाचे यश ठळकपणे मांडत नाही तर भारताच्या वित्तीय सेवा क्षेत्रातील एक अत्यावश्यक योगदानकर्ता म्हणून आपल्या भूमिकेची पुन्हा पुष्टि देखील करतो. 1000व्या शाखेच्या उद्घाटनाद्वारे, एसएमएफजी इंडिया क्रेडिटने प्रत्येक भारतियासाठी पसंतीची वित्तीय भागीदार बनण्याच्या आपल्या ध्येयामध्ये आणखी यश गाठण्यासाठी मंच निर्माण झाला आहे.
मुंबई, 9th सप्टेंबर, 2024: 2024 मध्ये सोन्याचा पसंतीचा मालमत्ता वर्ग म्हणून चमकत राहील असे एंजेल वन लि.चे संशोधनात आढळले असून, त्यामुळे गुंतवणूकदारांना पोर्टफोलिओमध्ये 10% गुंतवणूक सोन्यात वाढवण्याचा सल्ला देण्यात येत...
रोजगार आणि युवकांच्या कौशल्याला चालना देण्यासाठी 1500+ नोकरीच्या संधी निर्माण करण्याचे उद्दिष्ट
कोची, 09 सप्टेंबर, 2024: रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या प्रयत्नात, मुथूट मायक्रोफिन (NSE: MUTHOOTMF BSE: 544055) ने 13 राज्यांमध्ये 29 ठिकाणी एक विशेष रोजगार मेळावा सुरू केला...
एनटीपीसीची नूतनीकरणीय ऊर्जा कंपनी एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेडकडून ऑर्डर मिळाल्याची घोषणा
पुणे,: नूतनीकरणीय ऊर्जा सुविधा पुरवणारी भारतातील सर्वात मोठी कंपनी, सुझलॉन ग्रुपने आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या तिमाहीमध्ये दमदार कामगिरी बजावल्यानंतर, आता भारतातील सर्वात मोठी पवन ऊर्जा ऑर्डर मिळाली असल्याची घोषणा केली आहे. ११६६ मेगावॅटची ही ऑर्डर एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेडकडून (भारतातील सर्वात मोठा ऊर्जा उद्योग समूह एनटीपीसी लिमिटेडची नूतनीकरणीय ऊर्जा कंपनी) मिळाली असल्याची घोषणा सुझलॉनने केली आहे. या ऑर्डरनुसार सुझलॉन एस१४४ चे एकूण ३७० विंड टर्बाईन जनरेटर्स (डब्ल्यूटीजी) इन्स्टॉल करेल. त्यासोबत एक हायब्रिड लॅटिस टुब्यूलर (एचएलटी) असेल. गुजरात राज्यामध्ये एनटीपीसी रिन्यूएबल्स एनर्जी लिमिटेडच्या (एनजीईएलची संपूर्ण मालकीची उपकंपनी) दोन प्रकल्पांमध्ये प्रत्येकी आणि इंडियन ऑइल एनटीपीसी ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचा एक प्रकल्प (एनजीईएलची समूह कंपनी) यांची ३.१५ मेगावॅट क्षमता असणार आहे. या ऑर्डरमुळे आता सुझलॉनचे सर्वात मोठे ऑर्डर बुक ३ सप्टेंबर २०२४ रोजी ५ गिगावॅटवर जाऊन पोहोचले आहे.
सुझलॉन ग्रुपचे उपाध्यक्ष श्री गिरीश तंती म्हणाले, "देशातील सर्वात मोठी पवन ऊर्जा ओईएम या नात्याने आम्हाला भारतातील सर्वात मोठी ऊर्जा कंपनी एनटीपीसी लिमिटेडची नूतनीकरणीय ऊर्जा कंपनी, एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेडसोबत सहयोग करताना अतिशय आनंद होत आहे. हा सहयोग एक महत्त्वाचा टप्पा असून भारतात घडून येत असलेल्या नूतनीकरणीय ऊर्जा परिवर्तनाचा वेग वाढवण्याप्रती आमची बांधिलकी त्यामुळे अधिक दृढ झाली आहे. एनजीईएलकडून आम्हाला मिळालेली ही पहिली थेट पवन ऊर्जा ऑर्डर आहे, ज्यामुळे सुझलॉनने पीएसयू ग्राहक विभागात विजयी पुनरागमन केले आहे.
हा प्रकल्प गुजरात राज्यात एक पीएसयूमार्फत उभारला जात असलेला सर्वात मोठा पवन ऊर्जा उपक्रम ठरणार आहे. त्यामुळे नूतनीकरणीय ऊर्जा क्षेत्रात गुजरात राज्याची आघाडी अधिक मजबूत होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर भविष्यातील प्रकल्पांसाठी एक नवा मापदंड ठरेल, भारताच्या ऊर्जा आत्मनिर्भरतेमध्ये लक्षणीय योगदान देईल, आर्थिक सुबत्ता आणेल. २०३२ सालापर्यंत ६० गिगावॅट नूतनीकरणीय ऊर्जा क्षमता वाढवण्याचे एनजीईएलचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट पूर्ण करण्यात या प्रकल्पाची भूमिका खूप मोलाची असणार आहे."