प्रमुख गुंतवणूकदारांमध्ये अमेरिकेतील, ईएमईए आणि आशियातील प्रतिष्ठित गुंतवणूकदारांचा समावेश.
● बाँड्सना S&P ग्लोबलकडून ‘B’ आणि मूडीज रेटिंगकडून ‘B2’ रेटिंग दिले जाण्याची अपेक्षा.
● मूडीजने अलीकडील हालचालींच्या पार्श्वभूमीवर वेदांता रिसोर्सेस लिमिटेडच्या (VRL) कॉर्पोरेट रेटिंगला B2 वरून B1 पर्यंत सुधारले.
● सप्टेंबर 2024 पासून व्हीआरएलने 3.1 अब्ज डॉलर्सचे USD बाँड्स उभे केले.
वेदांता रिसोर्सेसने आंतरराष्ट्रीय रोखे भांडवली बाजारात नवीन दुहेरी ट्रान्च इश्यूद्वारे 1.1 अब्ज डॉलर्स उभे केले असल्याचे कंपनीने सिंगापूर एक्स्चेंज फायलिंगमध्ये सांगितले.
एक्स्चेंज फायलिंगनुसार, बाँड इश्यू दोन भागांमध्ये आहे – 5.5 वर्षांच्या कालावधीसाठी 9.475% व्याजदराने $550 दशलक्षचा भाग आणि 8.25 वर्षांच्या कालावधीसाठी 9.850% व्याजदराने $550 दशलक्षचा भाग. या दोन्ही टप्प्यांना गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी मिळाली असून, 135 हून अधिक खात्यांकडून बाँडसाठी $3.4 अब्ज अंतिम ऑर्डर्स प्राप्त झाले, ज्यामुळे 3.1 पट ओव्हरसब्स्क्रिप्शन झाले, असे कंपनीने सांगितले. या इश्यूमधून मिळणारी निव्वळ रक्कम व्हीआरएलचे बाँड्स प्रीपेमेंट करण्यासाठी आणि त्यासंबंधित व्यवहार खर्चासाठी वापरण्यात येईल.
अंतिम बाँड वाटपामध्ये 5.5 वर्षांच्या टप्प्यासाठी आशियात 61%, ईएमईएमध्ये 30% आणि अमेरिकेत 9% वाटप करण्यात आले. 8.25 वर्षांच्या टप्प्यासाठी आशियात 54%, ईएमईएमध्ये 30% आणि अमेरिकामध्ये 16% वाटप करण्यात आले.
मुख्य वित्तीय अधिकारी अजय गोयल म्हणाले, “ह्या व्यवहाराने वेदांताच्या पुनर्रचनेतून साकारलेल्या बाँड्सचे संपूर्ण पुनर्वित्तकरण पूर्ण केले आहे. या व्यवहारांच्या मालिकेत मिळालेला मजबूत गुंतवणूकदारांचा विश्वास वेदांताने मागील अनेक तिमाहीत घेतलेल्या महत्त्वपूर्ण धोरणात्मक उपाययोजनांवर आधारित आहे, जसे की, विक्रमी उत्पादन, खर्चाचे कार्यक्षम नियोजन आणि कर्ज कमी करणे.”
व्हीआरएलने सप्टेंबर 2024 पासून चार सलग आंतरराष्ट्रीय बाँड व्यवहारांद्वारे $3.1 अब्ज यूएस डॉलर बाँड्सचे पुनर्वित्तकरण केले आहे. वेदांताने उभारलेल्या एकूण यूएसडी बाँड्सची रक्कम 2022 नंतर कोणत्याही भारतीय संस्थेकडून उभारण्यात आलेली सर्वात मोठी रक्कम आहे. हा इश्यू म्हणजे व्हीआरएलसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, ज्याने मागील 3 वर्षांत आपले कर्ज $4.6 अब्जने कमी केले आहे आणि ते गेल्या दशकातील सर्वात कमी स्तरावर आणले आहे.
मूडीज आणि S&P ग्लोबल या दोन प्रमुख संस्थांनी अलीकडील घडामोडींना लक्षात घेऊन व्हीआरएल आणि त्यांच्या साधनांच्या रेटिंगमध्ये सुधारणा केली आहे. 13 जानेवारी रोजी मूडीजने व्हीआरएलच्या कॉर्पोरेट कौटुंबिक रेटिंगला B2 वरून B1 पर्यंत सुधारले असल्याचे सांगितले, तसेच व्हीआरएलद्वारे हमी दिलेल्या प्राधान्यकृत असुरक्षित बाँड्सच्या रेटिंगला B3 वरून B2 पर्यंत, म्हणजेच एक स्तर सुधारणा केली आहे, तसेच स्थिर दृष्टिकोन राखला आहे. मूडीजने व्हीआरएलच्या प्रस्तावित वरिष्ठ असुरक्षित बाँड इश्यूसाठी B2 रेटिंग दिले आहे.
S&P ग्लोबलने 13 जानेवारी रोजी व्हीआरएलच्या वरिष्ठ असुरक्षित नोट्ससाठी 'B' चे प्राथमिक रेटिंग दिले. हे सध्याच्या रेटिंगपेक्षा एक स्तर सुधारलेले आहे. त्यांनी रेटिंगला क्रेडिट वॉच पॉझिटिव्हवर ठेवले आहे.
एअर इंडिया महा कुंभ २०२५ साठी येणाऱ्या भाविकांसाठी प्रयागराजसाठी दररोज विमानसेवा देणार
२५ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत दिल्ली-प्रयागराज विमानसेवादिल्ली, भारतातील इतर शहरे आणि जगातील इतर भागांमधून प्रयागराजसाठी सुविधाजनक विमानसेवा
गुरुग्राम १४ जानेवारी २०२५: एअर इंडियाने आज घोषणा केली आहे की, जगातील सर्वात मोठा आध्यात्मिक मिळावा महा कुंभ मेळा २०२५ साठी दिल्ली आणि प्रयागराज दरम्यान दररोज विमानसेवा चालवली जाणार आहे. ही दैनंदिन विमानसेवा महा कुंभ मेळा २०२५ साठी तात्पुरत्या स्वरूपाची असणार आहे.
महा कुंभ मेळा २०२५ साठी प्रवास करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे, ही मोठ्या प्रमाणावर वाढलेली मागणी सक्षमपणे पूर्ण करता यावी यासाठी एअर इंडिया २५ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत प्रयागराजसाठी विशेष विमानसेवा चालवणार आहे. त्यामुळे आता एअर इंडिया ही दिल्ली ते प्रयागराज सर्व सेवांसहित विमान प्रवास सुविधा देणारी एकमेव कंपनी बनली आहे, एअर इंडियाने आपल्या प्रवाशांना इकॉनॉमी क्लासबरोबरीने प्रीमियम केबिनचा देखील पर्याय उपलब्ध करवून दिला आहे.
दोन्ही बाजूंनी दिवसाच्या सुविधाजनक वेळी सुटणार असलेल्या या विमानसेवांमुळे भारतातील विविध शहरे तसेच उत्तर अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण-पूर्व आशियातील विविध देशांमधून तसेच या देशांमध्ये प्रवास करू इच्छिणाऱ्यांसाठी ही खूप मोठी सोय आहे.
दिल्ली आणि प्रयागराज दरम्यान विमानसेवेचे वेळापत्रककालावधीविमान#फ्रिक्वेन्सीक्षेत्रप्रस्थानआगमन२५ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२५एआय२८४३दररोजदिल्ली-प्रयागराज१४:१०१५:२०एआय२८४४दररोजप्रयागराज-दिल्ली१६:००१७:१०१ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२५एआय८४३दररोजदिल्ली-प्रयागराज१३:००१४:१०एआय८४४दररोजप्रयागराज-दिल्ली१४:५०१६:००
या विमानसेवांची बुकिंग्स सर्व चॅनेल्सवर खुली करवून देण्यात येत आहेत,
पुणे, – वर्टिव्ह (NYSE: VRT) , गंभीर डिजिटल पायाभूत सुविधा आणि सातत्य सोल्यूशन्समधील जागतिक अग्रणी, अलीकडेच भारतातील पुणे येथे एकात्मिक व्यवसाय सेवा केंद्राच्या विस्ताराची घोषणा केली....
मुंबई: भारतातील अग्रगण्य घर आणि कार्यालय फर्निचर ब्रँड आणि गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुप मधील गोदरेज अँड बॉयस कंपनीचा भाग गोदरेज इंटेरियो यांनी स्केचर्स नॅशनल डिस्ट्रीब्युशन सेंटर...
· BE 6 पॅक तीन: 26.9 लाख रु.; ईएमआय 39,224 रु. पासून (पॅक वनसारखाच)
· XEV 9e पॅक तीन: 30.5 लाख रु; ईएमआय 45,450 रु पासून (पॅक वनसारखाच)
· आपली पसंती 7 जानेवारी 2025 पासून नोंदवा
· चाचणी ड्राइव्ह 14 जानेवारी 2025 पासून टप्प्याटप्प्याने सुरू होणार
· BE 6 आणि XEV 9e साठी नोंदणी 14 फेब्रुवारी 2025 रोजी एकाच वेळी...