Industrialist
फिनोलेक्स इंडस्ट्रीजने नवीन लोगोचे अनावरण केले,जे ब्रँडचा वारसा चिन्हांकित करते
पुणे, 29 जानेवारी 2024: चार दशकांपासून दर्जेदार पाईप्स आणि फिटिंग्जसाठी फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड समानार्थी बनलेले आहे. बॅकवर्ड आणि फॉरवर्ड इंटिग्रेशनमध्ये प्रतिबद्ध गुंतवणुकीसह सातत्याने वाढ होते आहे. शहरी...
स्ट्रॅटाने पुण्यात फ्रॅक्शनल ओनरशिपसाठी ऑफिस मालमत्ता केली सादर,७८ कोटी रु. उभारण्याचे उद्दिष्ट
· मालमत्ता 9.1% p.a चे एकूण एंट्री उत्पन्न देईल आणि आपल्या गुंतवणूकदारांना 13.1% p.a. IRR चे लक्ष्य
· पहिल्या ४८ तासांत ३८ कोटी रु.हून अधिक रक्कम जमा झाली
· ही प्रॉपर्टी ५३,००० चौरस...
महिंद्रा लॉजिस्टिक्स महाराष्ट्रातील फलटण येथे तयार करणार६.५. लाख चौरस फूट मल्टीक्लायंट वेअरहाऊसिंग सुविधा
~ प्रदेशातील ऑटो आणि इंजिनिअरिंग ग्राहकांना सेवा देण्यासाठी या सुविधेचा पहिला टप्पा २०२४ च्या अखेरीस कार्यान्वित होईल; ~
पुणे, 29 जानेवारी, 2024 : महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेड (MLL) ही भारतातील सर्वात मोठ्या एकात्मिक लॉजिस्टिक सोल्युशन्स पुरवठादारांपैकी एक कंपनी असून, कंपनीने पुण्याजवळील फलटण येथे त्यांच्या अत्याधुनिक वेअरहाउसिंग सुविधेचे सुरुवात करणार असल्याची घोषणा केली. ६.५ लाख चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या या सुविधा दोन टप्प्यांत विकसित केल्या जातील. ३.५ लाख चौरस फुटांचा पहिला टप्पा २०२४ च्या अखेरीस कार्यान्वित होणार आहे.
फलटण येथे २५ एकर परिसरात पसरलेला हा वेअरहाऊसिंग प्रकल्प महिंद्रा लॉजिस्टिक लि.च्या देशव्यापी मल्टी-क्लायंट सुविधांच्या नेटवर्कचा एक महत्त्वाचा भाग असेल. ऑटो OEM आणि घटकांमधील प्रमुख ग्राहकांच्या जवळ असलेले फलटण हे एक मोक्याचे ठिकाण आहे. या भागातील ऑटोमोटिव्ह आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील विविध क्लायंटचे अंतर्गत लॉजिस्टिक आणि निर्मिती तथा वितरणाची व्यवस्था या वेअरहाऊसद्वारे महिंद्रा लॉजिस्टिक पाहणार आहे. महिंद्रा लॉजिस्टिक लि.च्या गोदामांचे राष्ट्रीय नेटवर्क, संपूर्ण ट्रक लोड आणि एक्सप्रेस पार्सल सेवेशी हा वेअरहाऊसिंग प्रकल्प जोडला जाईल. उत्पादन करणाऱ्या ग्राहकाशी पहिला टप्पा करारबद्ध करण्यात आला आहे आणि ते त्यांचे राष्ट्रीय लॉजिस्टिक केंद्र म्हणून काम करेल आणि २०२४-२५ च्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत प्रत्यक्षात काम सुरू होईल.
या प्रदेशातील लॉजिस्टिक सेवा प्रदात्यांच्या सर्वात मोठ्या गोदामांपैकी सर्वा मोठी सुविधा येथे असेल. महिंद्रा लॉजिस्टिक लिमिटेडच्या शाश्वतता मानकांनुसार याचे डिझाइन केली जाईल. यामध्ये डीकार्बोनायझेशन, अक्षय उर्जेचा वापर, हरित गोदाम मानकांचे पालन आणि स्थानिक समाज विकासात सक्रिय सहभाग यासारख्या उपायांचा समावेश आहे. या घोषणेचा एक भाग म्हणून, महिंद्रा लॉजिस्टिक्स लि. कौशल्य विकास उपक्रमांसाठी संसाधने समर्पित करण्याचीदेखील योजना आखत आहे. त्यामुळे प्रदेशातील ५०० हून अधिक व्यक्तींसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील. नवीन सुविधा आणि संबंधित पायाभूत सुविधांच्या अनेक टप्प्यांतील विकासासाठी कंपनी आणि तिचे भागीदार १७० कोटी भांडवल रुपये गुंतवणार आहेत.
महिंद्रा लॉजिस्टिक लिमिटेडचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रामप्रवीण स्वामीनाथन म्हणाले की, “आमची क्षमता वाढवण्यासाठी आणि वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी आम्ही संपूर्ण भारतभर आमचे मल्टी-क्लायंट वेअरहाउसिंग नेटवर्क विस्तारत आहोत. फलटणमधील आमची नवीन सुविधा या प्रदेशातील आमच्या मौल्यवान ग्राहकांसाठी एकूण व्यवसाय परिसंस्था वाढवण्यासाठी धोरणात्मकदृष्ट्या ठरवलेली आहे. ही वेअरहाऊसिंग प्रकल्प आमच्या मल्टी-क्लायंट सुविधा, एक्सप्रेस आणि संपूर्ण ट्रकलोड ऑपरेशन्सच्या आमच्या राष्ट्रीय नेटवर्कशी जोडली जाईल. त्यामुळे परिसरातील ग्राहकांची रिच वाढेल आणि त्यांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील. यामुळे जागतिक दर्जाचे, तंत्रज्ञानावर आधारित उपाय देण्याच्या आमच्या वचनबद्धतेला मूर्त रूप मिळते आणि २०२४ पर्यंत कार्बन तटस्थता प्राप्त करण्याच्या आमच्या दृष्टीकोनाशी संरेखित करते.
अटॅक लाइक नो अदर २५ जानेवारी २०२३- लेखक:गौतम अदाणी
बरोबर एका वर्षापूर्वी, २५ जानेवारी २०२३ हाच तो दिवस होता, जेव्हा बातमी आली की न्यूयॉर्कमधील एका शॉर्ट-सेलरने अदाणी समूहावर झालेल्या आरोपांचे संकलन जगासमोर ऑनलाइन खुले केले आहे.
‘संशोधन अहवाल’ म्हणून प्रसिद्ध करण्यात आलेल्या त्या तथाकथित अहवालात तेच ते जुने आरोप होते . चावून चोथा झालेले तेच जुने आरोप होते, जे माझे विरोधक त्यांच्या माध्यमातील सहकाऱ्यांना हाताशी धरून त्याला संजीवनी देण्याचा प्रयत्न करीत होते. एकंदरीत आम्ही स्वतःच जाहीर केलेल्या आणि सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेल्या माहितीमधून, निवडक अर्धसत्यांचा धूर्तपणे वापर करून हा तथाकथित संशोधन अहवाल तयार करण्यात आला होता.
आमच्यावर खोटे आणि निराधार आरोप काही नवीन नव्हते. म्हणून, सर्वसमावेशक प्रतिसाद जारी केल्यानंतर, मी याबद्दल अधिक विचार केला नाही.असे म्हणतात ज्यावेळी सत्य आपल्या बुटाच्या लेसेस बांधून बाहेर पडायच्या तयारीत असते त्यावेळी, असत्य मात्र जग पालथे घालून मोकळे झालेले असते . माझ्यासारख्या सत्याच्या ताकदीवर गाढ विश्वास असणाऱ्याला हा असत्यच्या शक्तीचा हा एक धडा होता.
शॉर्ट-सेलिंगच्या हल्ल्यांचा प्रभाव सामान्यतः वित्तीय बाजारांपुरता मर्यादित असतो. तथापि, हा एक अनोखा दुहेरी हल्ला होता - अर्थातच एक हल्ला आर्थिक क्षेत्रातून केला गेला आणि दूसरा राजकीय क्षेत्राततून करण्यात आला- हे हल्ले एकमेकांना पुरक होते. प्रसारमाध्यमांमधील काहींनी त्याला सहाय्य केले आणि त्याला हवा दिली. आमच्या विरुद्ध खोटे बोलणे आमच्या पोर्टफोलिओचे बाजारमूल्य (marketcap) लक्षणीयरीत्या कमी करण्यासाठी पुरेसे होते; कारण सामान्यत: भांडवली बाजार तर्कापेक्षा भावनेवर चालतात. हजारो लहान गुंतवणूकदारांनी आपली बचत गमावली हे माझ्यासाठी अधिक दुःखदायक होते. आमच्या विरोधकांची योजना पूर्णतः यशस्वी झाली असती तर, डोमिनो इफेक्टमुळे बंदर आणि विमानतळांपासून वीज पुरवठा साखळीपर्यंत अनेक गंभीर पायाभूत क्षेत्रातील मालमत्तांना मोठी हानी पोहोचली असती. अशी स्थिती कोणत्याही देशासाठी आपत्तीजनक परिस्थिती ठरली असती. परंतु, आमचा पाया मजबूत होता. आमच्या परिचालनची (operations) ची मजबूतता आणि आमच्या वैधानिक निवेदनांची (statutorydisclosures) ची उच्च गुणवत्ता यामुळे, कर्जदार, रेटिंग एजन्सींसह आणि अन्य वित्तीय संस्था या आरोपांमुमूळे प्रभावित झाले नाहीत. आणि आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, यासाठी मनपूर्वक धन्यवाद.
ही परिस्थिती हाताळण्यासाठी आमच्याकडे पूर्वीचा अनुभव नव्हता. अखेर, आमचा आमच्या व्यवसायांच्या मजबुतीवरील विश्वास हीच आमची मुख्यतः ढाल झाली. आमचा पहिला निर्णय आमच्या गुंतवणूकदारांचे संरक्षण करण्याचा होता, २०,००० कोटी रुपयांचा एफपीओ पूर्ण केल्यानंतर, आम्ही एफपीओ मधून उभारलेली रक्कम गुंतवणूकदारांना परत करण्याचा निर्णय घेतला. कॉर्पोरेट इतिहासातील अभूतपूर्व अशा या निर्णयाने गुंतवणूकदारांचे कल्याण आणि नैतिकतेने व्यवसाय कारण्याबद्दलची आमची बांधिलकी अधोरेखित केली.
या युद्धाच्या धुक्यात, मच्या तिजोरीत असलेला ३० हजार कोटी रुपयांचा राखीव निधी हे आमचे मुख्य शस्त्र होते आणि हा राखीव निधी वाढवून अधिकचे ४०,००० कोटी रुपये म्हणजे, पुढील दोन वर्ष कर्ज परतफेडीसाठी लागणारी रक्कम, आम्ही जागतिक स्तरावर पत असलेल्या गुंतवणूकदारांना आमच्या कंपन्यांचे समभाग विकून जसे की जीकूजी पार्टनर्स आणि कतार इन्व्हेस्टमेंट ऑथॉरिटी उभी केली . यामुळे राखीव निधीची एक ढाल तयार करणे, बाजारपेठेत आमच्या समूहाबद्दल विश्वास निर्माण करणे आणि भारतासाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करत राहणे ही उद्दिष्टे पूर्ण झाली.
मार्जिनलिंक्ड फायनान्सिंगचे १७,५०० कोटी रुपयांचे प्रीपेमेंट करून, आम्ही आमच्या पोर्टफोलिओला बाजारातील अस्थिरतेपासून रोखले. मी माझ्या लीडरशिप टीमला व्यवसायांच्या परिचालनावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. यामुळे वित्त वर्ष २४ च्या पहिल्या सहामाहीत समूहाच्या व्याज, घसारा आणि करपूर्व (इबीडीता) उत्पन्नात ४७% ची विक्रमी वाढ झाली, अदानी पोर्टफोलिओने वित्त वर्ष २४ च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक-त्रैमासिक नफा नोंदवला, आमची कामगिरी बोलत होती.
आम्ही आमच्या आर्थिक आणि गैरआर्थिक भागधारकांठी एक व्यापक प्रतिबद्धता कार्यक्रम राबविला. एकट्या फायनान्स टीमने सुरुवातीच्या १५० दिवसांत जगभरातील जवळपास ३०० बैठका घेतल्या आणि नऊ रेटिंग एजन्सींद्वारे १०४ संस्थांना रेटिंगची खात्री करून दिली. बँका, निश्चित उत्पन्न गुंतवणूकदार, सार्वभौम संपत्ती निधी, समभाग गुंतवणूकदार, जेव्ही भागीदार आणि रेटिंग एजन्सी हे नेहमीच आमचे मुख्य भागधारक राहिले आहेत, कारण त्यांनी केलेल्या परीक्षण, छाननी आणि पुनरावलोकने आमच्या व्यापक आणि पारदर्शक वैधानिक निवेदन पद्धतीवर शिक्कमोर्तबत केले.
ज्यांनी आमच्यावर हल्ला केला त्यांच्या हेतूंचा पर्दाफाश करण्यासाठी आम्ही वस्तुस्थिती पारदर्शकपणे मांडण्यावर आणि आमची बाजू कथन करण्यावर लक्ष केंद्रित केले. यामुळे आमच्या समूहाविरुद्धच्या नकारात्मक मोहिमांचा प्रभाव कमी होत गेला. एफपीओ चे प्राथमिक लक्ष्य हे आमच्या समूहाची समभाग धारक संख्या वाढवणे हा होता आणि आमच्या प्रयत्नांमुळे समभागधारकांचा पाया ४३% ने वाढला आणि जवळपास ७० लाखांपर्यंत पोहोचला.
याव्यतिरिक्त, आम्ही आमच्या वाढीचा वेग राखण्यासाठी वचनबद्ध राहिलो. समूहाने आपली गुंतवणूक चालू ठेवली, ज्याचा पुरावा म्हणजे आमच्या मालमत्तांचे मूल्य ४.५ लाख कोटी रुपये झाले आहे. या कालावधीत खवदा येथील जगातील सर्वात मोठी अक्षय ऊर्जा निर्मिती प्रकल्प, नवीन कॉपर स्मेल्टर, ग्रीन हायड्रोजन इकोसिस्टम आणि धारावीचा बहुप्रतिक्षित पुनर्विकास यासह अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची सुरुवात झाली आहे.
या संकटाने आमच्या समूहातील एक मूलभूत कमकुवत दुवा उघड केला, ज्याच्याकडे मी दुर्लक्ष केले होते, - आम्ही आमच्या लोकांपर्यंत पोहचण्याचा यंत्रणेकडे पुरेसे लक्ष दिले नव्हते. अदाणी समूहाने काय केले किंवा करत आहे त्याचा आकार, प्रमाण आणि दर्जा याची माहिती पायाभूत सुविधा उद्दोगाना अर्थ साहाय्य पुरवणारी वर्गाच्या बाहेरील मोजक्या लोकांना माहीत होता. आम्हाला असे उगाचच वाटत होते की सर्व गैरआर्थिक भागधारक देखील आमच्याबद्दलचे सत्य जाणून आहेत - त्यांना हे माहिती आहे कीजे आमची आर्थिक स्थिती मजबूत आहे, आमचा प्रशासकीय प्रणाली निर्दोष आहे, आमचा विकासाचा रोडमॅप योग्य आहे आणि भारतातील महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आम्ही महत्त्वाची भूमिका बजावतो, यावर आमचा पूर्णपणे विश्वास होता.
या अनुभवाने आमच्या गैरआर्थिक भागधारकांशी प्रभावीपणे सोबत घेण्याची गरज अधोरेखित केली. आम्ही आमच्या कर्जाच्या कथित धोकादायक पातळीच्या कथांचा आणि निराधार राजकीय आरोपांचा प्रतिकार करण्यात अयशस्वी झालो, परिणामी गैरसमज जास्त पसरला. वस्तुस्थिती अशी आहे की, आमच्या परिवहन आणि उपयोगिता (utility) कंपन्यांचे उत्पन्नाशी असलेले कर्जाशी असलेले गुणोत्तर सर्वात कमी आहे. (सप्टेंबर २०२३ ला संपलेल्या अर्ध्या वर्षासाठी, हे २.५x होते.) तसेच, विविध राजकीय पक्षांद्वारे शासित २३ राज्यांमध्ये आमचा पायाभूत सुविधांचा व्यवसाय पसरलेला असून, तेथील राजकारणाशी आमचा काहीही संबंध नाही.
गेल्या वर्षभरातील कसोटीच्या प्रसंगांनी आणि संकटांनी आम्हाला मौल्यवान धडे दिले आहेत, त्यांनी आम्हाला मजबूत केले आहे आणि भारतीय संस्थांवरील आमचा विश्वास पुन्हा दृढ केला आहे. आमच्यावरचा हा कुटिल हल्ला - आणि आमचा जोरदार प्रतिकार - हे निःसंशयपणे केस स्टडी बनतील, तरीही मी काय शिकलो हे सर्वांसमोर मांडणे भाग पडले कारण, आज आम्ही लक्ष्य होतो, उद्या कोणी इतर असू शकते. अशा हल्ल्यांचा हा शेवट आहे या भ्रमात मी नाही. मला विश्वास आहे की आम्ही या अनुभवातून आणखी मजबूत झालो आहोत आणि भारताच्या विकासाच्या कथेत आमचे योगदान चालू ठेवण्याच्या आमचा संकल्प अधिक दृढ झाला आहे .
गौतम अदाणी
(लेखक अदाणी समूहाचे अध्यक्ष आहेत.)
An Attack Like No Other
Gautam Adani25 January 2024It was on 25 Jan 2023, exactly a year ago, when news arrived atbreakfast that...
माधुरी दीक्षित देणार वाढणार्या मुलांसाठी प्रथिनांच्या गरजांवर भर
नवी दिल्ली, २४ जानेवारी २०२४ : कॉम्प्लॅन हे झायडस वेलनेस लि.चे एक अग्रगण्य हेल्थ फूड ड्रिंक असून, त्यासाठी नवीन “I am Complan Boy Girl” ची घोषणा करण्यात आली आहे. या मोहीमेत बॉलीवूड सुपरस्टार माधुरी दीक्षित असेल. नवीन जाहिरातीमध्ये माधुरी दीक्षित वाढत्या मुलांसाठी प्रथिनांची गंभीरता अधोरेखित करत आहे आणि सर्वोत्तम उपाय म्हणून मुलांसाठी ६३% अधिक प्रथिने असलेल्या कॉम्प्लॅनची शिफारस करत आहे. माधुरी हिंदी भाषिक बाजारपेठेतील प्रचाराचा चेहरा असेल.
नवीन जाहिरातीमध्ये, माधुरीला शाळेच्या वार्षिक दिवसाच्या कार्यक्रमात माता आणि त्यांच्या मुलांशी बोलताना दाखवले आहे. ते श्रोत्यांसह सामायिक करतात की डॉक्टरांनी त्यांच्या मुलाच्या वाढत्या वर्षांमध्ये प्रथिनांवर गंभीरपणे भर दिला आहे आणि दररोजचे रोजचे अन्न मुलांच्या दैनंदिन प्रथिनांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नेहमीच पुरेसे नसते. त्यासाठी ते कॉम्प्लॅनची शिफारस करतात कारण ती वैज्ञानिकदृष्ट्या विकसित केलेली रचना आहे ज्यामध्ये ३४ महत्वाच्या पोषक घटकांसह मुलांच्या आरोग्याच्या खाद्य पेयापेक्षा ६३% जास्त प्रथिने आहेत. त्यामुळे Complan 2X जलद वाढ आणि स्मृती आणि एकाग्रतेला समर्थन देते. जाहिरातीचा शेवट ब्रँडच्या सर्वात आठवल्या जाणार्या आयकॉनिक टॅगलाइनसह होतो “I am Complan Boy-Girl”
कॉम्प्लॅनच्या नव्याने सुरू झालेल्या कॅम्पेनबद्दल बोलताना झायडस वेलनेसचे सीईओ तरुण अरोरा म्हणाले, “कॉम्प्लॅन हा मुलांच्या आरोग्य खाद्य पेय श्रेणीतील एक प्रतिष्ठित ब्रँड आहे आणि त्यात १००% दूध प्रथिने आहेत. मुलांच्या पूर्ण वाढीसाठी योग्य प्रमाणात चांगल्या दर्जाची प्रथिने पुरवण्याची गरज आम्ही गेल्या काही वर्षांत मातांना अधोरेखित केली आहे. माधुरी केवळ एक सुपरस्टार आणि प्रशंसित अभिनेत्री म्हणून ओळखली जात नाही तर एक काळजी घेणारी आई म्हणून देखील ओळखली जाते, जी तिच्या मुलांच्या वाढ आणि विकासात पूर्णपणे गुंतलेली असते. या विश्वासार्हतेमुळे, आम्ही मातांना त्यांच्या मुलांच्या वाढत्या वर्षांमध्ये प्रथिनांच्या गंभीरतेबद्दल शिक्षित करण्यात मदत करण्यासाठी आणि योग्य पौष्टिक निवड करण्यासाठी आणि म्हणूनच ही गरज पूर्ण करण्यासाठी कॉम्प्लॅन हा सर्वोत्तम उपाय कसा आहे, हे अधोरेखित करण्यासाठी तिच्यासोबत भागीदारी करण्याचे ठरवले.