Industrialist

79% भारतीय सुट्टीवर असताना घराच्या सुरक्षेची करतात चिंता

मुंबई,21 फेब्रुवारी,2024: सुट्ट्या म्हणजे आराम करणे, टवटवीत करणे आणि रोजच्या धकाधकीतून विश्रांती घेणे. आपल्या घराबद्दल सतत चिंता करत राहणे ही गोष्ट सुट्टीच्या दिवशी आपल्यापैकी कोणालाही अगदीच शेवटची असते. तरीही, गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी, गोदरेज आणि बॉईसचा व्यवसाय, गोदरेज लॉक्स अँड आर्किटेक्चरल फिटिंग्ज अँड सिस्टीम्सच्या ‘Live Safe, Live Freely’ या नवीन संशोधन अभ्यासात असे आढळून आले आहे की अशी चिंता अनेकदा सुट्टीच्या प्लॅनिंगमध्ये व्यत्यय आणतात. याबाबत बोलताना गोदरेज लॉक्स आणि आर्किटेक्चरल फिटिंग्ज अँड सिस्टीम्सचे बिझनेस हेड श्याम मोटवानी म्हणाले की, ‘LiveSafe, LiveFreely’ या अभ्यासाचे निष्कर्ष हे उघड करतात की सुट्टीतील प्रवासी त्यांच्या घराच्या सुरक्षिततेच्या चिंतेत कायम असतात. दारं नीट लावली होती की नाही हे प्रश्न त्यांच्या मनात वेकेशनवर असताना रेंगाळत राहतात. हे स्पष्ट आहे की चिंतामुक्त प्रवासासाठी घराची सुरक्षितता सुनिश्चित करणे सर्वात आवश्यक आहे. घराच्या सुरक्षेत तंत्रज्ञानाची महत्त्वाची भूमिका या अभ्यासात अधोरेखित करण्यात आली आहे, ज्यामुळे व्यक्तींना त्यांच्या व्हेकेशनचा पूर्ण आनंद लुटता येतो. डिजिटल लॉकसारख्या प्रगत उपायांसह, व्यक्ती आता चिंतामुक्त प्रवास करू शकतात, कारण ते हे लॉक दूरस्थपणे मोबाईल ॲपद्वारे Wi-Fi सह जगातील कोठूनही ऑपरेट करू शकतात. गोदरेज लॉक्स आणि आर्किटेक्चरल फिटिंग्ज आणि सिस्टम्समध्ये, सुरक्षिततेशी तडजोड न करता व्यक्तींना मुक्तपणे जगण्यासाठी चिंतामुक्त करणारे अत्याधुनिक उपाय प्रदान करण्याची आमची वचनबद्धता आहे.” ‘LiveSafe,LiveFreely’ या अभ्यासाचा उद्देश भारतीयांच्या जीवनशैलीबद्दल आणि घराच्या सुरक्षिततेसाठी तंत्रज्ञानाच्या निवडीबद्दल मौल्यवान माहिती देणे, त्यांना मानसिक शांती आणि चिंता न करता जगण्याचे स्वातंत्र्य देणे हा आहे. प्रवास हा अभ्यासाचा एक महत्त्वाचा फोकस क्षेत्र म्हणून उदयास आला असून, प्रतिसादकर्त्यांपैकी 79% लोकांना सर्व दारे आणि खिडक्या व्यवस्थित लॉक केल्या आहेत की नाही याविषयी व्हेकेशनवर असताना सतत चिंता वाटत असते. शिवाय, 40 टक्के लोकांनी वृद्ध पालकांनी त्यांच्या चाव्या विसरल्याबद्दल किंवा हरवल्याबद्दल आणि लॉक आउट केल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.जर त्यांच्या घराची चिंता त्यांना नसेल तर ते लांब व्हेकेशनला वर्केशनमध्ये बदलू इच्छितात असे 48 टक्के लोकांचे म्हणणे असल्याचे या संशोधन अभ्यासात दिसून आले आहे. टेक गॅजेट वापरू इच्छितात घराची सुरक्षा दिवसातून एकदा तरी तपासू इच्छितात असे 49 टक्के लोकांचे म्हणणे आहे. 29 टक्के लोक म्हणतात की ते त्यांच्या घराची सुरक्षितता ऑफिसमध्ये बसून दर तीन तासांनी तपासतील. सुरक्षितता आणि सुविधा सुनिश्चित करण्यासाठी स्मार्ट-होम उपकरणांचा अवलंब करताना मानवी वर्तन समजून घेण्याचे उद्दिष्ट ‘LiveSafe,LiveFreely’ या अभ्यासाचे आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळुरू आणि भोपाळ या पाच शहरांमध्ये 2,000 व्यक्तींचे सर्वेक्षण करून हा अभ्यास करण्यात आला आहे. 

जावा येझदी मोटारसायकल्स चा फेब्रुवारीत जयपूर आणि लखनऊ येथे मेगा सर्व्हिस कॅम्प

·         तीन दिवसीय सेवा शिबिराचे उद्दिष्ट दोन्ही शहरांमधील 2019-2020 जावा ग्राहकांना सेवा देणे हे असेल. ·         ग्राहकांना मदत करण्यासाठी, प्रमुख मूळ उपकरणे निर्माते देखील शिबिरात उपस्थित राहतील ·         पुढील...

टीव्हीएस मोबिलिटी आणि मित्सुबिशी यांची भागीदारी भारतामध्ये पुरवणार इंटिग्रेटेड व्हेईकल मोबिलिटी सोल्युशन्स

टीव्हीएस व्हेईकल मोबिलिटी सोल्युशनमध्ये मित्सुबिशी सुरुवातीला ३०० कोटी रुपये गुंतवेल नव्या वाहनांची विक्री, व्हेईकल-ऍज-अ-सर्व्हिस बिझनेस मॉडेल्स, ऑपरेटिंग सोल्युशन्स इत्यादी टीव्हीएस व्हेईकल मोबिलिटी सोल्युशन पुरवेल. चेन्नई, १९...

महिंद्रातर्फे बोलेरो MaXX पिक-अप रेंजच्या नवीन प्रकाराचे अनावरण : एसी सह उंचावला ड्रायव्हिंगचा अनुभव

मुंबई, १९ फेब्रुवारी २०२४: भारतातील स्मॉल कमर्शियल व्हेइकल्स (SCVs) (छोटी व्यावसायिक वाहने) च्या बाजारपेठेतील अग्रणी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड (M&M) ने बोलेरो MaXX पिक-अप रेंजचा नवीन प्रकार सादर करत...

स्पाइस मनीच्या अधिकारी नेटवर्कमध्ये महाराष्ट्रात १०० टक्के वाढ

स्पाइस मनी महाराष्ट्रातील उद्योजकांना सक्षम करत पर्यायाने रोजगाराच्या संधी वाढवणार  पुणे – स्पाइस मनी (डिजीस्पाइस टेक्नॉलॉजीची उपकंपनी) ही भारतातील ग्रामीण फिनटेक क्षेत्रातील पायोनियर आणि नागरिकांच्या बँकिंग...

Popular