Industrialist

पाळीव प्राणी देखभाल उत्पादनांची ऑनलाइन विक्री 95% वाढली

~ पाळीव प्राण्यांसाठी पोषणतत्त्वांनी समृद्ध अन्न, कॉस्मेटिक्स आणि हायजीनसाठी उत्पादनांची वाढती आवड ऑर्डर व्हॉल्युमला चालना देत आहे ~ ~ कॅट आणि डॉग ब्रॉथ, चिकन स्टिक्स, बेकन स्ट्रिप्स, डेशेडिंग कंडिशनर्स, सिरम, डीप क्लीनिंग शॅम्पूज आणि ट्रिमर्स यांसारख्या उत्पादनांची मागणी वाढली आहे ~ ~ मेट्रोपॉलिटन आणि टियर-1 शहरांमध्ये ऑर्डर व्हॉल्युममध्ये 120% पेक्षा जास्त वार्षिक वाढ आहे ~ ~ टियर-II आणि टियर-III शहरांमधील पाळीव प्राणी पालकांनी क्रमशः 75% आणि 60% वार्षिक ऑर्डर व्हॉल्युम वाढीस मदत केली आहे ~ ~ ब्रँड वेबसाइट्सवर प्रीपेड ऑर्डर्समध्ये 300% पेक्षा जास्त वाढ; कॅश-ऑन-डिलिव्हरी ऑर्डर्स ऑनलाइन मार्केटप्लेसवर 200% वाढल्या आहेत ~ नवी दिल्ली: पाळीव प्राणी पालनाच्या वाढत्या ट्रेंडमुळे पाळीव प्राणी देखभाल उत्पादनांची भारतीय ग्राहकांमध्ये लोकप्रियता वाढत आहे. भारताने या वर्षीचा नॅशनल पेट्स डे साजरा केला, त्याच वेळी युनिकॉमर्सने 2025 आर्थिक वर्षातील पाळीव प्राणी देखभाल उत्पादनांचे खरेदी ट्रेंड्स जाहीर केले आहेत. युनिकॉमर्सच्या प्लॅटफॉर्मवरील प्रक्रियेत आलेल्या व्यवहारांनुसार, 2025 आर्थिक वर्षात पाळीव प्राणी देखभाल उत्पादनांची ऑनलाइन ऑर्डर व्हॉल्युम 2024 आर्थिक वर्षाच्या तुलनेत 95% वाढला आहे, जो या वेगाने वाढणाऱ्या क्षेत्राला अधोरेखित करतो. पाळीव प्राणी देखभाल उत्पादनांमध्ये पाळीव प्राण्यांचे अन्न, ज्यात नियमित अन्न आणि विशेष आहार उत्पादनं, प्रतिबंधात्मक देखभाल उत्पादने आणि औषधे, पाळीव प्राणी कपडे आणि अॅक्सेसरिज, खेळणी आणि ग्रुमिंग उपकरणे यांचा समावेश होतो. नव्या युगातील डिजिटल-फर्स्ट ब्रँड्समुळे ऑनलाइन पाळीव प्राणी देखभाल बाजारात जबरदस्त वाढ झाली आहे. कुत्रे, मांजरी, मासे आणि पक्ष्यांसाठी प्रीमियम आणि वैयक्तिक गरजेनुसार तयार केलेली उत्पादने बाजारात आली असून, त्यामुळे हा वाढता ट्रेंड दिसून येतो. युनिकॉमर्सच्या विश्लेषणात असे आढळून आले आहे की, अलीकडेच ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर विविध नैसर्गिक आणि सेंद्रिय पाळीव प्राणी अन्न, तसेच प्रोबायोटिक्स, ओमेगा फॅटी अॅसिड्स आणि अँटीऑक्सिडंट्ससारख्या सप्लिमेंट्स असलेले थेरप्युटिक अन्न यांसारखी उत्पादने लोकप्रिय ठरत आहेत. यातून हे स्पष्ट होते की, पाळीव प्राणी मालक त्यांच्या प्राण्यांच्या आरोग्याला आणि प्राणीप्रेमाला अधिक प्राधान्य देत आहेत, ज्यामुळे उच्च-गुणवत्तेच्या आणि विशेषीकृत पाळीव प्राणी उत्पादनांची मागणी वाढत आहे. युनिकॉमर्स भारतातील काही आघाडीच्या पाळीव प्राणी देखभाल ब्रँड्सना तांत्रिक पाठबळ पुरवत आहे, ज्यामध्ये Zigly, Just Dogs, Petwale, Pet Snugs, Pawpourii, Petedge आणि Pawpular Pets यांचा समावेश आहे. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पाळीव प्राणी ब्रँड्स त्यांच्या अधिकृत वेबसाइट्सवर अधिक विस्तृत उत्पादनांची श्रेणी आणि वैयक्तिकृत खरेदीचा अनुभव ग्राहकांना देत आहेत. या उत्पादनांमध्ये कस्टमाइज्ड पाळीव प्राणी कपडे, पट्टे आणि कॉलर, नेम टॅग्स, खास बेडिंग आणि चटया यांचा समावेश होतो. अनेक ब्रँड्स सबस्क्रिप्शन-आधारित सेवाही देतात, ज्यामध्ये नियमितपणे वैयक्तिक आहार योजना, औषधांची घरपोच डिलिव्हरी आणि इतर पशुवैद्यकीय सेवा समाविष्ट असतात. या विश्लेषणात असे आढळून आले आहे की, पाळीव प्राणी पालक आता ऑनलाइन मार्केटप्लेसपेक्षा थेट ब्रँड वेबसाइट्सवरून खरेदी करण्याकडे अधिक कल दर्शवत आहेत. एक अन्य निरीक्षण असे दर्शवते की, आर्थिक...

सनश्योर एनर्जीकडून सुझलॉनला 100.8 मेगावॅटचा पवन ऊर्जा ऑर्डर मिळाली

अक्षय्यऊर्जा वापराला चालना देण्यासाठी आयपीपींसोबत भागीदारी पुणे: सुझलॉन स्वतंत्र ऊर्जा उत्पादक (IPPs) द्वारे मोठ्या कंपन्यांमध्ये अक्षय्य ऊर्जेचा वापर वाढवत आहे. याच माध्यमातून भारताच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमणाला...

तनाएराचे ‘समर सॉन्ग्स’ निसर्गाचे रंग आणि ताल यांच्यापासून प्रेरित होऊन उन्हाळ्यात देखील  ताजेतवाने ठेवणारे, आनंद देणारे कलेक्शन सादर

साड्या, कुर्ते, कुर्ता सेट्स, सुंदर टॉप्स आणि फ्लोई ड्रेसेसचे सुंदर कलेक्शन तुमच्या समर वॉर्डरोबमध्ये असेल तर उन्हाळा देखील होईल सुसह्य  पुणे-16 एप्रिल, २०२५: मोठे दिवस, गरम हवा अशा वातावरणात तुम्हाला तजेला आणि आनंद देईल असे नवे 'समर सॉन्ग्स' कलेक्शन तनाएराने आणले आहे. सूर्यप्रकाशाने लख्ख उजळलेले दिवस, हलक्या हवेच्या झुळुका आणि निसर्गातील ताल यांचे सार 'समर सॉन्ग्स' मध्ये सामावले आहे. शानदार आणि तरीही आरामदायी कपडे ज्यांना आवडतात अशा महिलांसाठी डिझाईन करण्यात आलेल्या या कलेक्शनमध्ये आरामदायी कॉटन, नाजूक सिल्क, सिल्क कॉटन, हवेशीर ऑर्गन्झा आणि कोटा असे विविध प्रकार आहेत, भारतातील सर्वोत्तम टेक्स्टाईल्सची, प्रत्येक काळात पसंद केली जाणारी कारीगरी यामध्ये पाहायला मिळेल. ग्रीष्माच्या कवितेने प्रेरित होऊन तयार करण्यात आलेले हे कलेक्शन ऋतूच्या बदलत्या रंगांचा आनंद साजरा करते. उन्हामुळे शुष्क झाल्यामुळे सोनेरी छटा आलेल्या पानांपासून समुद्रकिनारी चमकणाऱ्या कोरल गार्डन्सपर्यंत या कलेक्शनमधील प्रत्येक पीस ऋतूच्या तजेलदार, चमकदार, मनमोहक पॅलेट्स दर्शवतो. मऊशार पेस्टल्स, हिरवाई आणि चमकदार कोरल्स या कलेक्शनमधील नाजूक प्रिंट्स, हाताने रंगवलेले डिटेल्स आणि नव्या-जुन्या प्रत्येक काळात पसंद केल्या जाणाऱ्या विणकाम परंपरांमधून जिवंत साकार झाल्या आहेत. दररोजच्या कपड्यांपासून विलक्षण सुंदर आणि शानदार कपड्यांपर्यंतचा बदल तुमच्या वॉर्डरोबमध्ये अगदी सहजपणे घडवून आणण्याचे काम हे कलेक्शन सराईतपणे करते. हवेशीर, आरामदायी कापडापासून तयार करण्यात आलेल्या, नव्या-जुन्या सर्व काळात पसंद केल्या जातील अशा, आधुनिक गरजांना अनुरूप बहुउपयोगी, विचारपूर्वक डिझाईन करण्यात आलेल्या, साड्या आणि रेडी-टू-वेयर कपडे या कलेक्शनचा मुख्य भाग आहे. साड्यांच्या रेन्जमध्ये राजस्थानच्या संगानेरी ब्लॉक प्रिंट्स, बंगालच्या मलमल आणि जामदानी या विणकामांनी सजवलेल्या प्युअर कॉटन साड्या आहेत, दररोज वापरता येतील आणि तरीही अतिशय सुंदर व शानदार दिसतील अशा या साड्या वापरायला अगदी सहज आहेत. कोटा साड्यांची तजेलदार शान, हाताने रंगवलेल्या मुर्शिदाबाद सिल्कस् आणि सिल्क कॉटन व ऑर्गन्झा साड्या, त्यावरील प्रिंट्स, एम्ब्रॉयडरी, हाताने केलेल्या रंगकामाची शान यामुळे या साड्या ऑफिसमध्ये घालता येतील आणि कॅज्युअल समारंभांमध्ये देखील तितक्याच उठून दिसतील. तनाएराच्या हेड ऑफ डिझाईन श्रीमती अनिंदिता सरदार म्हणाल्या, "ग्रीष्म ऋतू म्हणजे सहज, तरल आणि भरपूर ऊर्जेचा काळ, समर सॉन्ग्स कलेक्शनमध्ये आम्ही अशा साड्या आणि कपडे डिझाईन केले आहेत जे या सगळ्याचे सार दर्शवतात. हे कलेक्शन म्हणजे हवेशीर फॅब्रिक्स आणि तरल सिल्हटस् हालचालींमध्ये सहजता सुनिश्चित करतात, ग्रीष्मातील मोठे दिवस, त्यांच्या वेगाशी हे कलेक्शन सुसंगत आहे. अतिशय विचारपूर्वक क्युरेट केलेले हे कलेक्शन सादर करून तनाएराने सर्व एथनिक कपड्यांसाठी अल्टिमेट डेस्टिनेशन हे आपले स्थान मजबूत करणे आणि त्याची नवी व्याख्या सादर करणे सुरु ठेवले आहे." या कलेक्शनच्या किमती १४९० रुपयांपासून पुढे आहेत, वर्कवेयर, दररोज वापरण्याचे कपडे, वीकएंडच्या खास समारंभांसाठीचे कपडे यामध्ये आहेत. प्रत्येक साडी आणि कपडा विचारपूर्वक डिझाईन करण्यात आला आहे, वापरण्यातील सहजता आणि सौंदर्य यांची सांगड या कलेक्शनमध्ये घालण्यात आली आहे. www.Taneira.com वर किंवा तुमच्या जवळच्या तनाएरा स्टोरमध्ये समर सॉन्ग्स कलेक्शन उपलब्ध आहे. 

मर्सिडीज- बेंझ इंडियातर्फे ऐतिहासिक विक्रमी टप्पा पार, २,००,००० व्या ‘मेड इन इंडिया’ कारचे रोल-आउट

पुणे- “मर्सिडीज- बेंझकडून लक्षणीय टप्पा पार, २,००,००० व्या ‘मेड इन इंडिया’ मर्सिडीज बेंझ कारचे उत्पादन, भविष्यात भारत उत्पादनाचे प्रमुख केंद्र बनण्याचे निदर्शक. भारतीय प्लँट्सने उत्पादनाची उच्च आणि वेगवान पातळी...

350+ अब्जांहून अधिक पावले चालल्यानेआदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्सच्या हेल्थ रिटर्न्स™ मॉडेलअंतर्गत1 लाखांहून अधिक पॉलिसीधारकांना बक्षिसे

मुंबई : भारतातील आघाडीची वैविध्यपूर्ण वित्तीय सेवा कंपनी आदित्य बिर्ला कॅपिटलची आरोग्य विमा शाखा आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, (“ABHICL”), ने जागतिक आरोग्य दिनानिमित्त...

Popular