Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

Industrialist

स्टार हेल्थ’च्या संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी राजीव खेर यांची नियुक्ती

चेन्नई,  – स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (स्टार हेल्थ इन्शुरन्स) या भारतातील सर्वांत मोठ्या व्यक्तिग्राही आरोग्यविमा कंपनीच्या संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी राजीव खेर यांची नियुक्ती झाली आहे. खेर हे या कंपनीत सध्या स्वतंत्र संचालक म्हणून काम करीत आहेत. त्यांची नियुक्ती २९ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत निश्चित करण्यात आली. भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरण (ईर्डा) या संस्थेची मंजुरी मिळाल्यानंतर खेर यांच्या नियुक्तीला अधिकृतता प्राप्त होईल.राजीव खेर यांना आंतरराष्ट्रीय व्यापार, औद्योगिक विकास, शाश्वत धोरणे आणि नियामक प्रशासन या क्षेत्रांत चार दशकांहून अधिक काळाचा अनुभव आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी असलेले खेर हे केंद्रात वाणिज्य सचिव होते. त्यांनी पर्यावरण आणि वाणिज्य मंत्रालयांमध्ये अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या हेत. तसेच स्पर्धा अपीलीय न्यायाधिकरणाचे सदस्य म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे. २०१५ ते २०२० या काळात भारताचे विदेश व्यापार धोरण घडवण्यात, आंतरराष्ट्रीय व्यापार वाटाघाटींचे नेतृत्व करण्यात आणि जागतिक स्तराशी सुसंगत नियामक चौकट निर्माण करण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. धोरणात्मक सल्लागार म्हणून त्यांची ख्याती सरकार, आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि धोरण अभ्यास संस्थांमध्येही आहे. या नियुक्तीबाबत प्रतिक्रिया देताना राजीव खेर म्हणाले, “भारताच्या सामाजिक व आर्थिक स्थैर्यासाठी आरोग्यविमा अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. या टप्प्यावर ही जबाबदारी स्वीकारणे ही माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. ‘स्टार हेल्थ’ने ग्राहक-केंद्रिततेसह नवकल्पनांचा अवलंब करत एक विश्वासार्ह ब्रँड म्हणून स्थान निर्माण केले आहे. संचालक मंडळ आणि व्यवस्थापनासोबत जवळून काम करताना मी चांगल्या प्रशासकीय पद्धती बळकट करण्यावर, दीर्घकालीन मूल्यनिर्मितीवर आणि आरोग्य तसेच विमा क्षेत्रातील बदलत्या परिस्थितीत कंपनीला योग्य दिशेने नेण्यावर भर देईन. समावेशक विकास, नैतिक नेतृत्व आणि संस्थात्मक उत्कृष्टता यावर आमचा ठाम विश्वास राहील.” या संदर्भात ‘स्टार हेल्थ’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रॉय म्हणाले, “या महत्त्वपूर्ण टप्प्यावर राजीव खेर यांचे नेतृत्व लाभणे हे आमच्यासाठी मोठे भाग्य आहे. त्यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, धोरण क्षेत्रातील सखोल जाण आणि सार्वजनिक हिताविषयीची समज स्टार हेल्थच्या पुढील विकासप्रवासात मोलाची ठरेल. विविध क्षेत्रांतील त्यांच्या अनुभवामुळे स्टार हेल्थ अधिक सक्षम, ध्येयधोरणांनी प्रेरित आणि भविष्यातील आव्हानांना तोंड देणारी संस्था बनण्याच्या दिशेने पुढे जाईल. सर्वांसाठी सहज उपलब्ध आणि विश्वासार्ह आरोग्यविमा सेवा देण्याच्या आमच्या संकल्पात त्यांच्या मार्गदर्शनामुळे नक्कीच अधिक बळ येईल.”

२ हजार कोटीची गुंतवणूक: गोदरेजसिटी,पनवेल येथे चित्रपट, दूरदर्शन आणि मीडिया कॅम्पस उभारणार

गोदरेज फंड मॅनेजमेंट आणि शासनातर्फे WAVES मध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी  2,000 कोटी रु. च्या प्रस्तावित गुंतवणुकीसह अंदाजे 2500 रोजगारनिर्मितीची क्षमता साधारण 10 एकर...

आदित्य बिर्ला कॅपिटल डिजिटलने ABCD मोबाइलॲपवर सुरू केली डिजिटल गोल्ड एसआयपी

~ ग्राहक केवळ ₹50 पासून डिजिटल गोल्ड एसआयपीमध्ये गुंतवणूक करू शकतात ~मुंबई, : भारतातील आघाडीची वित्तीय सेवा कंपनी आदित्य बिर्ला कॅपिटलची डिजिटल-प्रथम D2C शाखा असलेल्या आदित्य बिर्ला कॅपिटल डिजिटल लिमिटेड (“ABCDL”) ने आज डिजिटल गोल्ड एसआयपी सुरू करण्याची घोषणा केली. ही एक प्रणालीबद्ध गुंतवणूक योजना आहे, ज्याद्वारे वापरकर्ते केवळ ₹50 पासून साप्ताहिक एसआयपी आणि ₹100 पासून मासिक एसआयपीद्वारे डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करू शकतात. ही सुविधा ABCD मोबाइल ॲपवर उपलब्ध आहे. डिजिटल गोल्ड एसआयपी ही भारतात प्रचलित असलेल्या गुंतवणुकीच्या पद्धतीला पारंपरिक मूल्य असलेल्या संपत्तीच्या वर्गासोबत एकत्र आणते. नियमित आणि स्वयंचलित गुंतवणुकीची सुविधा देत, ही योजना गुंतवणूकदारांना वेळोवेळी बाजारातील चढ-उतारांवर मात करण्यासाठी कंपाउंडिंगच्या शक्तीचा आधार देते. ही योजना 24 कॅरेट भौतिक सोन्याने समर्थित आहे, जे सुरक्षित आणि विमा संरक्षित कोठारांमध्ये साठवलेले असते. या कोठारांचे व्यवस्थापन MMTC-PAMP (स्विस बुलियन ब्रँड PAMP आणि भारत सरकारच्या मालकीची मिनरल्स अँड मेटल्स ट्रेडिंग कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यातील संयुक्त उपक्रम) द्वारे केले जाते. ABCD ॲपमधील डिजिटल गोल्ड अंतर्गत गिफ्टिंग आणि एसआयपी या दोन्ही सुविधा एकत्रित करून ग्राहकांना सुव्यवस्थित गुंतवणूक मॉडेलद्वारे सोने नियोजनपूर्वक खरेदी, बचत व गिफ्ट करण्याची सुलभता मिळते, तीही साठवणूक, सुरक्षेचा किंवा मेकिंग चार्जेसचा त्रास न करता. श्री. पंकज गाडगीळ, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, आदित्य बिर्ला हाउसिंग फायनान्स लिमिटेड, तसेच प्रमुख – डिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि पेमेंट्स स्ट्रॅटेजी, आदित्य बिर्ला कॅपिटल यांनी सांगितले, “संपत्ती विविधीकरणासाठी सोने हा एक महत्त्वाचा संपत्ती वर्ग आहे, जो परंपरा आणि विश्वासाशी घट्टपणे जोडलेला आहे. जरी भौतिक सोन्याची पारंपरिक मोहिनी आजही कायम आहे, तरी नव्या पिढीतील गुंतवणूकदार अधिक परवडणाऱ्या, सुलभ आणि विश्वासार्ह पर्यायांची मागणी करत आहेत. आमचे डिजिटल गोल्ड एसआयपी हे सोन्यात गुंतवणुकीसाठी एक सहज आणि प्रणालीबद्ध उपाय आहे, जो गुंतवणूकदारांना आत्मविश्वासाने आणि सोप्या पद्धतीने संपत्ती निर्माण करण्यास मदत करतो. सोन्याची मागणी वाढत असताना आणि विविधीकरणाला प्राधान्य दिले जात असताना, डिजिटल गोल्ड एसआयपी हा एक स्मार्ट व झंझटमुक्त गुंतवणूक पर्याय म्हणून पुढे येईल, असा आम्हाला विश्वास आहे.” डिजिटल गोल्ड व्यतिरिक्त, ABCD ॲपमध्ये डिजिटल सिल्वर देखील उपलब्ध आहे, जे 24 कॅरेट भौतिक चांदीने समर्थित असून, सुरक्षित कोठारांमध्ये साठवले जाते. वापरकर्त्यांना हवे तेव्हा खरेदी, साठवणूक किंवा रिडीम करण्यासाठी लवचिक पर्याय उपलब्ध आहेत. ईव्ही, सौरऊर्जा आणि तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांमध्ये चांदीच्या वाढत्या वापरामुळे, डिजिटल सिल्वर हे एक स्मार्ट आणि भविष्यातील गुंतवणुकीसाठी तयार असलेले, विविधीकरणासाठी उपयुक्त असे आकर्षक पर्याय बनले आहे.

एअर इंडियाचा दोन प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मान

विमानप्रवासातील सेवा आणि मनोरंजनात्मक सोयींची दखल गुरुग्राम, २ मे २०२५ – जागतिक विमानसेवा कंपनी म्हणून प्रसिद्ध असलेल्या एअर इंडियाला नुकतेच दोन नामांकित पुरस्काराने गौरविण्यात आले.ट्रॅव्हलप्लस एअरलाइन...

ऐंशी शहरांमध्ये मोफत‘प्री-नीट मेगा मॉकटेस्ट’ घेऊन विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न

पुणे  १ मे २०२५ : नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) येत्या दि. ४ मे रोजी होणाऱ्या नीट-यूजी २०२५ परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी मोशन एज्युकेशन या संस्थेने एक भव्य मॉक टेस्ट आयोजित केली. ही सिम्युलेशन परीक्षा केवळ कोटा येथेच नव्हे तर एकाच वेळी देशभरातील ८० शहरांमध्ये पार पडली. ‘नीट’ची तयारी करणाऱ्या ८,००० विद्यार्थ्यांनी यामध्ये भाग घेतला. कोटामध्ये ही मॉक टेस्ट दुपारी २ ते ५ या वेळेत घेण्यात आली. नीट परीक्षेच्या प्रत्यक्षातील वेळापत्रकाशी ती जुळणारी होती. ‘मोशन एज्युकेशन’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन विजय यांनी वैयक्तिकरित्या परीक्षा केंद्रांना भेट देत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. त्यांनी सांगितले, “नीट-यूजी २०२५’च्या नवीन परीक्षापद्धतीप्रमाणे आणि अपेक्षित काठिण्यानुसार ही मॉक टेस्ट आमच्या वरिष्ठ प्राध्यापकांनी अत्यंत काटेकोरपणे तयार केली आहे.” संस्थेचे संयुक्त संचालक आणि नीट विभागप्रमुख अमित वर्मा यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देत सांगितले, “नवीन टॉपिक्स सुरू करण्यापेक्षा दिलेल्या वेळेत पेपर सोडवण्याचा सराव करा. तीन तासांत १८० प्रश्न सोडवण्याची क्षमता विकसित करा आणि प्रत्येक चाचणीनंतर आपल्या चुकांचे सखोल विश्लेषण करा. संकल्पना समजण्यातील अडचणी, दुर्लक्ष, लिखाणातील चुका किंवा वेळेचे व्यवस्थापन अशा ज्या कारणांनी चुका होत आहेत, त्या ओळखा आणि त्या सुधारण्यासाठी प्रयत्न करा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेवटच्या तयारीच्या काळात तणावमुक्त रहा आणि आरोग्याला प्राधान्य द्या.” शुभ्रा सिंग ही या मॉक टेस्टमध्ये सहभागी झालेली विद्यार्थिनी म्हणाली, “ही मेगा मॉक टेस्ट खऱ्या नीट परीक्षेचे वातावरण निर्माण करीत होती. आमची तयारी किती झाली आहे, हे समजण्यास या टेस्टमुळे मदत झाली आणि वेळेचे नियोजन सुधारायला संधी मिळाली.” राजीव कुमार हा विद्यार्थी म्हणाला, “अशी वास्तव परीक्षेसारखी चाचणी देणे म्हणजे खरी परीक्षा कशी असते, हे समजून घेणे आणि त्या तणावाचा सामना कसा करावा हे शिकणे. ही एक अत्यंत उपयुक्त तयारी ठरली.”

Popular