पुणे, 29 मे, 2025 – जागतिक दूध दिनाच्या निमित्ताने, गोदरेज जर्सीने “बॉटम्स अप... इंडिया सेज चिअर्स टू मिल्क!” या अहवालाद्वारे भारतीय ग्राहकांच्या बदलत्या पसंतींचा गौरव केला आहे. या निष्कर्षांनुसार, दर तीनपैकी एक भारतीय व्यक्ती पेय म्हणून दूधाचे सेवन करते तर पुणेस्थित 39 टक्के ग्राहक पेय म्हणून दुधाला प्राधान्य देतात.
जोडीला, 39% ग्राहक फ्लेवर्ड दूध पिणे पसंत करतात किंवा घरी दूधात फ्लेवर मिसळून मग ते दूध पितात. पालकही आता फ्लेवर्ड दूध हे पोषणमूल्यपूर्ण, सोयीचे आणि आनंददायक पेय म्हणून आपल्या मुलांना देऊ लागले आहेत. दिवसभरात 37% पालक तर 41% खेळाच्या वेळेत फ्लेवर्ड दूध हे एक रिफ्रेशिंग पर्याय म्हणून मुलांना देतात.
या निष्कर्षांवर भाष्य करताना गोदरेज जर्सीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूपेंद्र सुरी म्हणाले, “गोदरेज जर्सीमध्ये आम्ही ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत. चव, ताजेपणा आणि पोषण यांचा समतोल राखून, ब्रँड नवीन पिढीसाठी दूध म्हणजे काय याची व्याख्या नव्याने करत आहे. गोदरेज जर्सी बदाम दूध हे केवळ चवीलाच आनंद देणारे नसून एक आरोग्यदायी, संपूर्ण पोषण देणारा पर्याय आहे. फक्त वर्ल्ड मिल्क डेपुरताच मर्यादित नाही तर हे दूध दररोज पिण्यासाठी योग्य पेय आहे.”
“भारत जसजशी अधिक सजग आणि जाणिवपूर्वक वापर करणारी संस्कृती स्वीकारतो आहे, तसतशी दुधाबाबतची धारणा बदलते आहे. आता केवळ परंपरेपुरते मर्यादित न राहता आधुनिक जीवनशैलीशी सुसंगत अशा नाविन्यपूर्णतेपर्यंत हे पोहोचले आहे. गोदरेज जर्सी या बदलाचे नेतृत्व करत असून, परंपरेला नव्या कल्पनांशी जोडून दूध हे दररोजच्या पोषणाचा एक महत्त्वाचा भाग बनवत आहे,” असेही ते म्हणाले.
“बॉटम्स अप.. इंडिया सेज चीयर्स टू मिल्क” या शीर्षकाखाली झालेल्या सर्वेक्षणात दिल्ली, मुंबई, हैदराबाद, पुणे आणि चेन्नई यांसारख्या प्रमुख शहरांमधून माहिती गोळा करण्यात आली. त्यात दुग्धजन्य पदार्थांना असलेली पसंती आणि गुणवत्तेची अपेक्षा यावर लक्ष केंद्रित केले गेले.
या निष्कर्षांमधून असे स्पष्ट होते की, दुग्धक्षेत्राने ग्राहकांच्या बदलत्या गरजांशी सुसंगत राहण्यासाठी नाविन्यपूर्णता आणि गुणवत्तेचा मिलाफ साधत भविष्यातील वाढीस चालना दिली पाहिजे.
या सर्वेक्षणाची रचना आणि अंमलबजावणी YouGov मार्फत केली गेली. गोदरेज ग्रुपच्या गोदरेज अॅग्रोव्हेट लिमिटेड (GAVL) या वैविध्यपूर्ण अन्न व कृषिव्यवसाय क्षेत्रातील उद्योगसमूहाची उपकंपनी असलेल्या क्रीमलाइन डेअरी प्रॉडक्ट्स लिमिटेड मार्फत या उत्पादनांची गोदरेज जर्सी या ब्रँड नावाने विक्री केली जाते.
गुरुग्राम,: ज्युनिपर ग्रीन एनर्जीने अंकुश मलिक यांची मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा केली आहे.
वीज क्षेत्रात 15 वर्षांपेक्षा अधिक अनुभव असलेले अंकुश मलिक...
ही धोरणात्मक भागीदारी भारतातील घरांमध्ये स्वच्छ आणि आरोग्यदायी जीवनशैलीसाठी प्रेरणा देणाऱ्या ब्रँडच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे
आरोग्य आणि स्वच्छता उद्योगातील भारतातील आघाडीची कंपनी युरेका फोर्बज्...