Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

Industrialist

घटत्या व्याजदरांच्या काळात गुंतवणूकदारांसाठी मनी मार्केट फंड ठरू लागले आकर्षक पर्याय – टाटा एएमसी

पुणे : सध्या व्याजदर घटत चाललेले असताना, मनी मार्केट फंड हे परतावा, सुरक्षितता आणि तरलता यांचा समतोल साधू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक सुयोग्य पर्याय म्हणून पुढे येत आहेत. कमी कालावधीचा उद्देश असणारे, उच्च दर्जाच्या साधनांमध्ये गुंतवणूक करणारे हे फंड, व्याजदर कमी होण्याच्या वातावरणात फायदा मिळविण्याकरीता योग्य ठरतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अलीकडेच आपल्या चलनविषयक धोरणात आक्रमकपणे शिथिलता आणली असून, रेपो दरात एकाच वेळी ५० बेसिस पॉइंट्सनी घट करून तो ५.५ टक्क्यांवर आणला आहे. यासोबतच, चलन सुलभता वाढवण्यासाठी आणि कर्जवाढीस चालना देण्यासाठी रोख राखीव प्रमाणदेखील (सीआरआर) १०० बेसिस पॉइंट्सनी कमी करण्यात आले आहे. त्यामुळे ठेवीवरील व्याजदर कमी होण्याची प्रक्रिया सुरू होत असून, अशा वेळी अल्पकालीन अतिरिक्त निधी ठेवण्यासाठी मनी मार्केट फंड हे पारंपरिक मुदतठेवींऐवजी अधिक आकर्षक पर्याय ठरत आहेत. “आपण आता धोरण सैलावण्याच्या टप्प्यात प्रवेश करत आहोत आणि अशा काळात मनी मार्केट फंड गुंतवणुकीचा पर्याय उत्तम वाटतो. सध्याचा रेपो दर ५.५ टक्के आहे. अशा वेळी या फंडांमध्ये गुंतवणूक करून गुंतवणूकदारांना तरलता टिकवून ठेवत आणि अस्थिरता मर्यादित ठेवत सुमारे ५० ते ७५ बेसिस पॉइंट्स अधिक परतावा मिळू शकतो,” असे ‘टाटा अॅसेट मॅनेजमेंट’चे फिक्स्ड इन्कम विभागाचे उपप्रमुख अमित सोमाणी यांनी सांगितले. इंडिया म्युच्युअल फंड असोसिएशनच्या (अॅम्फी) माहितीनुसार, एप्रिल आणि मे २०२५ या दोन महिन्यांत मनी मार्केट फंड या वर्गात एकूण ४२,७३० कोटी रुपयांचा निधी आला आहे, यावरून गुंतवणूकदारांचा या उत्पादनावरील विश्वास अधोरेखित होतो. गेल्या दोन महिन्यांत टाटा मनी मार्केट फंडात पुणे शहरातून २५०.२४ कोटींची गुंतवणूक झाली. आर्थिक वर्ष २०२४–२५ मध्ये, पुण्यातून या फंडात झालेली गुंतवणूक ८८७ कोटींवरून वाढून १,४९९.३ कोटींवर पोहोचली. फंडाने ३०,००० कोटींच्या मालमत्तेच्या व्यवस्थापनाचा (एयूएम) मोठा टप्पा गाठलेला आहे. मनी मार्केट फंड हे प्रामुख्याने ट्रेझरी बिल्स, कमर्शियल पेपर, आणि सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिटसारख्या अल्पकालीन व उच्च दर्जाच्या कर्जसाधनांमध्ये गुंतवणूक करतात. त्यामुळे स्थिरता आणि परतावा यांचा योग्य समतोल साधला जातो. ‘टाटा मनी मार्केट फंडा’ची कामगिरी ही शिस्तबद्ध कालावधी व्यवस्थापन आणि उच्च पतमानांकन असलेल्या संस्थांमध्ये गुंतवणूक करण्याच्या धोरणावर आधारित आहे. सध्या अल्पकालीन व्याजदर कमी होत चालल्यामुळे, दीर्घकालीन आणि तात्कालिक अशा दोन्ही गुंतवणूक धोरणांमध्ये योग्य ठरणारे हे फंड पर्याय ठरू शकतात. लिक्विड फंड आणि मनी मार्केट फंड हे दोन्ही अल्पकालीन गरजा भागवत असले, तरी ६–९ महिन्यांपर्यंतचा कालावधी असलेल्या मनी मार्केट फंडांमधून थोड्या अधिक परताव्याची अपेक्षा ठेवता येते. विशेषतः अल्प ते मध्यम मुदतीच्या दृष्टीकोनातून गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ते फायद्याचे पडते. या दोन पर्यायांमध्ये निवड करताना गुंतवणूकदाराचा वेळेचा कालावधी आणि जोखमीची तयारी विचारात घ्यावी लागते. मात्र सध्याच्या धोरणात्मक वातावरणात दोन्हीही पर्याय आकर्षक मानले जातात.

महिंद्रातर्फे 11.19 लाख रु. (एक्स-शोरूम) किमतीत बोलेरो MaXX पिक-अप HD 1.9 CNG सादर

मुंबई, 30th जून 2025: भारतातील नंबर 1 पिकअप ब्रँड बोलेरो पिक-अपचे निर्माते महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने आज आपली संपूर्णपणे नविन बोलेरो MaXX पिक-अप HD 1.9 CNG सादर केली असून लहान व्यावसायिक वाहन विभागात...

द्रष्टे उद्योजक जिमी मिस्त्री यांचे ‘डीएलसी गाइड’ आता पुण्यात

शहराच्या पाहुणचार क्षेत्रातील अग्रणी व्यक्तींना मिळणार सन्मानडीएलसी गाइड ही जगातील पहिली स्वतंत्र दर्जांकन प्रणाली असून, तिचे सक्रिय अध्याय न्यूयॉर्क, लंडन, दुबई, मुंबई, बंगळुरू आणि दिल्ली...

गोदरेज कॅपिटलने ‘क्वीनिटी’ सह त्यांची LGBTQIA+ व्यापकता वाढवली

मुंबई: समानता आणि सर्वसमावेशकतेप्रती आपली वचनबद्धता अधिक दृढ करत, गोदरेज इंडस्ट्रीजग्रुपची आर्थिक शाखा गोदरेज कॅपिटलने LGBTQIA+ कर्मचारी आणि सहकाऱ्यांसाठी कर्मचारी साधन गट (ERG)Qnity लाँच...

कोपातर्फे तरुणांसाठी तंत्रज्ञानाची मजा देणारे रोबोलँड

पुणे, जून २३ २०२५ – कोपा मॉल या पुण्यातील प्रीमियर लाइफस्टाइल आणि रिटेल डेस्टिनेशनने पुणेकरांना खासरोबोटिक्स शोमध्ये हजेरी लावण्यासाठी आमंत्रित केले आहे. तंत्रज्ञान, मजामस्ती...

Popular