भारतीय बाजारपेठेमध्ये आयपीओ सदरीकरणाला वेग आलेला असून विविध कंपन्यांनी आयपीओसाठी सेबी कडे अर्ज दाखल केले आहेत.
‘ऑग्मंट एंटरप्रायझेस लिमिटेड’
ऑग्मंट एंटरप्रायझेस लिमिटेड ही सोने व चांदी या...
मुंबई, 14 ऑक्टोबर: भारतातील आघाडीचा घरगुती कीटकनाशक ब्रँड गुडनाइटची निर्मिती करणाऱ्या गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (जीसीपीएल) आणि महाराष्ट्र पोलिसांनी राज्यातील बनावट गुडनाइट उत्पादने तयार करणाऱ्यांचा शोध...
या रणनीतिक करारामुळे ‘आरजीआयसीएल’च्या पॉलिसीधारकांना जगभरात२४x७ वैद्यकीय आणि प्रवाससहाय्य सेवा होणार उपलब्ध
मुंबई: भारतातील अग्रगण्य खासगी सर्वसाधारण विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या रिलायन्स जनरल इन्शुरन्स या कंपनीने (आरजीआयसीएल) यूके-स्थित ‘मेफेअर वी केअर लिमिटेड’ या जागतिक आरोग्य लाभ प्रशासक कंपनीशी रणनीतिक भागीदारी केली आहे. या सहकार्याद्वारे ‘मेफेअर’च्या आंतरराष्ट्रीय आरोग्यसेवा प्रशासनातील अनुभवाचा उपयोग करून ‘आरजीआयसीएल’च्या पॉलिसीधारकांना जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात अखंड, सीमारेषारहित आरोग्यसेवा आणि आपत्कालीन सहाय्य मिळणार आहे.
या करारानुसार, ‘मेफेअर वी केअर’ २४x७ बहुभाषिक ‘अलार्म सेंटर’ चालवणार आहे आणि त्यातून परदेशात प्रवास करणाऱ्या किंवा वास्तव्य करणाऱ्या ‘रिलायन्स जनरल’च्या ग्राहकांना सातत्यपूर्ण मदत पुरविली जाणार आहे. हे केंद्र वैद्यकीय तसेच प्रवाससंबंधित सहाय्यासाठी एकाच ठिकाणी संपर्काचा केंद्रबिंदू ठरेल. ‘आरजीआयसीएल’च्या ग्राहककेंद्री आणि जागतिक स्तरावर सुलभ उपायांच्या कटिबद्धतेला यातून अधिक बळकटी मिळेल.
या सेवांच्या व्याप्तीमध्ये पुढील बाबी समाविष्ट आहेत :
· परदेशात पॉलिसीधारकांसाठी कॅशलेस आणि रिइम्बर्समेंट दावे प्रक्रियेस सहाय्य.
· वैद्यकीय सल्लामसलत, अपॉइंटमेंट ठरवणे आणि टेलि-असिस्टन्स सेवा.
· आपत्कालीन वैद्यकीय स्थलांतर आणि पुनरागमन यांबाबतचा समन्वय — गंभीर परिस्थितीत वेळेवर आणि विश्वसनीय...
पुणे, 10 ऑक्टोबर 2025: मुंबई आणि बंगळुरूमध्ये वैविध्यपूर्ण स्थानासह पुणे स्थित आघाडीची रिअल इस्टेट कंपनी कोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेड (BSE: 532924, NSE: KOLTEPATIL) कंपनीने पुण्यातील भूगाव येथे सुमारे 7.5 एकर जमीनीचे संपादन...
मुंबई, 10 ऑक्टोबर 2025: जवळपास चार दशकांचा वारसा असलेल्या अग्रगण्य EPC आणि रिअल्टी कंपन्यांपैकी एक वॅस्कॉन इंजिनीयर्स लिमिटेड (VASCONEQ) ला एमएसईबी होल्डिंग कंपनी लिमिटेड कडून मुंबईतील महालक्ष्मी येथील हाजी अली पार्क, प्लॉट क्रमांक 9, सौदामिनी इमारतीच्या पुनर्विकासासाठी लेटर ऑफ इंटेंट (LOI) प्राप्त झाले आहे.
या प्रकल्पाची किंमत 161.18 कोटी रु(GST आणि विमा वगळून) इतकी आहे आणि काम सुरू झाल्यापासून 36 महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. हा प्रकल्प वॅस्कॉनच्या पुनर्विकास क्षेत्रातील अनुभवात भर घालत असून मुंबईतील रिअल इस्टेट क्षेत्रातील त्यांचे स्थान अधिक मजबूत करत आहे.
या घोषणेबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना वॅस्कॉन इंजिनीयर्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सिद्धार्थ वासुदेवन मूर्ती म्हणाले, “एमएसईबी होल्डिंग कंपनी लिमिटेडने आमच्यावर या महत्त्वपूर्ण पुनर्विकास प्रकल्पाची जबाबदारी सोपवल्याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे. हा प्रकल्प आमच्या ऑर्डर बुकला अधिक बळकट करतो आणि मुंबईसारख्या बाजारपेठेत एवढ्या मोठ्या स्तरावरील प्रकल्प पूर्ण करण्याच्या आमच्या क्षमतेवर ग्राहकांचा आमच्यावर असलेला विश्वास दर्शवतो. आम्ही या प्रकल्पाचे काम ठरवलेल्या गुणवत्तेच्या मानकांनुसार आणि वेळेत पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करू.”मुंबईत वॅस्कॉनने सांताक्रूझ येथील वॅस्कॉन ऑर्किड्स आणि सांताक्रूझ वेस्ट येथील प्रकाश सीएचएस अशा प्रकल्पांद्वारे आपल्या पुनर्विकास-केंद्रित धोरणाला बळकटी दिली आहे. सांताक्रूझ, पवई आणि इतर मायक्रो-मार्केट्समधील सुरु असलेल्या पुनर्विकास प्रकल्पांनी एकत्रितपणे सुमारे 0.4 दशलक्ष चौ.फुट क्षेत्र व्यापलेले आहे. त्यांचे अपेक्षित विक्री मूल्य 1050 कोटी रु. इतके आहे.मुंबईतील सध्याचे आणि नियोजित प्रकल्प आर्थिक वर्ष 27 पर्यंत कंपनीच्या एकूण रिअल इस्टेट पोर्टफोलिओत सुमारे 50 टक्के योगदान देतील अशी अपेक्षा आहे. रिअल इस्टेट पुनर्विकासासोबतच, मुंबई आणि पश्चिम भारतातील EPC संधी देखील सक्रियपणे साधल्या जात आहेत. त्यामध्ये संस्थात्मक आणि पायाभूत प्रकल्पांसाठीच्या टेंडर्समुळे कंपनीच्या दीर्घकालीन ऑर्डर पाइपलाइनमध्ये भर पडत आहे.