Industrialist

जगातील TOP10 मधील श्रीमंत ..त्यांच्यावरही आहे पहा केवढे कर्ज ….

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत समाविष्ट असलेले मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांची नावे विदेशी कर्ज घेणाऱ्यांच्या यादीत असल्याचे एका अहवालात म्हटले...

यूपीएलचे वाईनेरो आणि बीओन्से हे द्राक्ष उत्पादकांसाठी अद्वितीय उपाय उत्पादन निर्यातक्षमता आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय सुधारणा

मुंबई, 31 मे 2022: द्राक्ष पिकातील डाऊनी आणि पावडर मिल्ड्यूवर मात करण्याच्या उद्देशाने शाश्वत कृषी उत्पादने आणि सुविधांची जागतिक पुरवठादार कंपनी यूपीएल लिमिटेडने वाईनेरो आणि बीओन्से हे अद्वितीय जैवसुविधा उपाय सादर केले आहेत. ही उत्पादने निर्यातीसाठी पात्र होण्यात प्रमुख अडथळे ठरणाऱ्या द्राक्ष उत्पादकांना भेडसावणाऱ्या कमाल अवशिष्ट भागाची मर्यादा आणि प्रतिकार व्यवस्थापनाच्या महत्त्वाच्या समस्यांचे निराकरण करतात. द्राक्ष निर्यात करणारे उत्पादक कठोर निर्यात नियमांचे पालन करण्यासाठी ५५ दिवसांच्या छाटणीनंतर रसायनांचा वापर करण्यास नाखूष असतात आणि परिणामी जास्तीत जास्त अवशिष्ट पातळी तयार होऊन त्यामुळे निर्यात माल अनेकदा नाकारला जातो. वाईनेरो आणि...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इफकोने उभारलेल्या जगातील पहिल्या नॅनो युरिया प्लांटचे उद्घाटन केले 

कलोल- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इफकोने गुजरातेतील कलोलमध्ये उभारलेल्या, जगातील पहिल्या नॅनो युरिया लिक्विड प्लांटचे उद्घाटन केले.  शेतकऱ्यांना उत्पादनक्षमता आणि उत्पन्न वाढवण्यात मदत करणे हा या प्लांटचा उद्देश आहे. 'आत्मनिर्भर भारत' आणि 'आत्मनिर्भर कृषी' यांच्या दिशेने खूप मोठे पाऊल उचलत, माननीय पंतप्रधानांनी हा अल्ट्रामॉडर्न नॅनो युरिया लिक्विड फर्टिलायझर प्लांट गांधीनगर, गुजरातमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष समारंभात राष्ट्रसेवेत समर्पित केला आहे.केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह, गुजरातचे  मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण, रसायने व खते मंत्री डॉ. मनसुख मांडविया यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी सांगितले की जगातील पहिल्या नॅनोफर्टिलायझर प्लांटचे उद्घाटन करताना त्यांना अतिशय आनंद होत आहे. ते पुढे म्हणाले की, युरियाच्या एका पिशवीइतकी शक्ती आता शेतकऱ्यांना युरियाच्या अर्ध्या लिटर बाटलीमध्ये उपलब्ध होणार आहे, यामुळे वाहतुकीचा खर्च कमी होईल आणि लघु शेतकऱ्यांना याचे खूप जास्त लाभ मिळतील, परिणामी ते अधिकाधिक सक्षम बनतील.  श्री. मोदी असेही म्हणाले की, कलोलमध्ये इफकोच्या या अत्याधुनिक नॅनो-युरिया प्लांटमध्ये दर दिवशी १.५ लाख युरियाच्या बाटल्यांचे उत्पादन होऊ शकते आणि असे अजून आठ प्लांट्स उभारण्याची सरकारची योजना आहे.  यामुळे कृषी क्षेत्रात खऱ्या अर्थाने क्रांती घडून येईल आणि युरिया आयातीवर अवलंबून राहण्याचे प्रमाण कमी होऊन भारतातील शेती आत्मनिर्भर बनेल.  केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी भारताच्या कृषी क्षेत्रात नवी क्रांती घडवून आणेल अशा नॅनो-खताच्या उत्पादनात पुढाकार घेतल्याबद्दल इफकोच्या संपूर्ण टीमचे आणि शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. इफकोने नॅनो खतांच्या उत्पादनासाठी आंवला, फुलपुर, कलोल (विस्तार), बेंगलोर आणि पारादीप, कांडला, देवघर (बिहार) आणि गुवाहाटी युनिट्समध्ये नॅनो युरिया, नॅनो डीएपी आणि नॅनो मायक्रो पोषक तत्त्वांच्या उत्पादनासाठी विविध ठिकाणी अतिरिक्त उत्पादन सुविधा स्थापन केल्या आहेत.  या सर्व युनिट्समध्ये डिझाईन उत्पादन क्षमता दर दिवशी २ लाख बाटल्या असेल तर एकूण गुंतवणूक ३००० कोटी रुपये असणार आहे.  यापैकी ७२० कोटी रुपये आधीच गुंतवण्यात आले असून यामुळे हजारो लोकांसाठी रोजगार निर्माण होईल.  इफकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. यु एस अवस्थी यांनी एका वॉकथ्रू व्हिडिओच्या साहाय्याने प्लांटचे कार्य आणि येथील विविध तंत्रज्ञानांची माहिती दिली.  यावेळी उपस्थित असलेल्या ७००० पेक्षा जास्त शेतकऱ्यांना आणि सहकाऱ्यांना एका फिल्ममध्ये इफको नॅनो युरियाचे वापर दाखवण्यात आले, ज्याची प्रेरणा मातीमध्ये युरियाचा वापर कमी करण्याच्या माननीय पंतप्रधानांच्या दृष्टिकोनातून घेण्यात आली आहे.  ते म्हणाले की, ते शेतीची आधुनिक तंत्रे व पद्धती सादर करणार असल्याने नॅनो युरिया क्रांतीचे वाहन ड्रोन असणार आहे. इफकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. यु एस अवस्थी म्हणाले की,  पिकांची पोषण गुणवत्ता आणि उत्पादकता वाढवण्यात नॅनो युरिया लिक्विड खूप जास्त प्रभावी असल्याचे आढळून आले आहे आणि भूगर्भातील पाणी व पर्यावरणाच्या गुणवत्तेवर याचा खूप मोठा सकारात्मक परिणाम होतो आणि अशाप्रकारे ग्लोबल वॉर्मिंगमध्ये लक्षणीय घट होते. ते म्हणाले की, इफको नॅनो युरिया लिक्विडच्या ३.६० कोटी बाटल्यांचे उत्पादन करण्यात आले आहे, त्यापैकी २.५० कोटी बाटल्या आधीच विकल्या गेल्या आहेत.  इफकोचे अध्यक्ष, श्री दिलीप संघाणी यांनी सांगितले, नॅनो युरिया लिक्विड हे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या 'आत्मनिर्भर भारत ' आणि 'सहकार से समृद्धी' या दृष्टिकोनांना अनुसरून आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आले आहे. इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड अर्थात इफकोने गेल्या वर्षीच्या सुरुवातीला जगातील पहिले इफको नॅनो युरिया (लिक्विड) प्रस्तुत केले होते जे फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डर (एफसीओ, १९८५) मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.  इफको नॅनो युरिया (लिक्विड) हे देशामध्ये गुजरातेत कलोल येथील इफकोच्या नॅनो बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरमध्ये एका प्रोप्रायटरी तंत्रज्ञानामार्फत विकसित करण्यात आले होते.  कलोलमधील पहिल्या इफको नॅनो युरिया (लिक्विड) उत्पादन युनिटसाठी १७५ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून त्याची सध्याची उत्पादन क्षमता दर दिवशी नॅनो युरियाच्या ५०० मिलीच्या १.५ लाख बाटल्या तयार करण्याची आहे.  इफकोचे नॅनो युरिया लिक्विड हे क्रांतिकारी उत्पादन असून पर्यावरणानुकूल, शाश्वत शेतीच्या दिशेने उचललेले पुढचे पाऊल आहे.  

भारतात आधी टेस्लाची कार विक्री, नंतर प्लांट उभारू .. टेस्लाची भारतात एंट्री कशी होणार ? एका कार वर किमान ३१ लाखाचा कर ?

https://twitter.com/madhusudhanv96/status/1530218419538173952 गेल्या महिन्यात केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले होते की जर टेस्लाने भारतात इलेक्ट्रिक वाहने तयार केली तर कंपनीलाही त्याचे फायदे मिळतील....

‘महिंद्रा’तर्फे महाराष्ट्रात नवीन ‘बोलेरो सिटी पिक-अप’ सादर

शहरांतर्गत मालवाहतुकीसाठी पर्याय ·         सर्वोत्कृष्ट श्रेणीतील मायलेज - १७.२ किमी प्रति लिटर; गाडी चालविण्याचा खर्च कमी आणि त्यामुळे बचत जास्त. ·         या श्रेणीतील वाहनांमधील सर्वाधिक पेलोड क्षमता -...

Popular