Filmy Mania

“परंपरा” च्या निमित्ताने आयुष्य आणि परंपरा यातील संघर्ष रुपेरी पडद्यावर झळकणार

अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा चित्रपट  २६ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला समाजाने जबरदस्तीने लादलेल्या परंपरेचा एका कुटुंबावर होणारा परिणाम या आशयसूत्रावर बेतलेला "परंपरा" हा चित्रपट २६ एप्रिल रोजी...

“ये काली काली आंखेच्या सिक्वेलसह हे इंडस्ट्रीतील माझे सर्वात मोठे वर्ष असेल!” ताहिर राज भसीन. 

नेटफ्लिक्सच्या हिट सीरीज ये काली काली आंखे मध्ये मुख्य भूमिकेसाठी ओळखला जाणारा अभिनेता ताहिर राज भसीन या वर्षी त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे. यानिमित्ताने त्यांनी...

निवेदिता आणि यशोधन यांच्या लग्नसोहळ्यात मोठा ट्विस्ट.

सोनी मराठी एक नवी मालिका, 'निवेदिता, माझी ताई!' प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आली. ही गोष्ट एका अशा नात्याची आहे जी घराघरांत घडते.. एक असं नातं ज्यामुळे प्रत्येक घराला घरपण लाभतं... एक असं निरपेक्ष नातं, जे एकमेकांवर जीव ओवाळून टाकतं... ते नातं म्हणजे... बहीण आणि भाऊ यांचं अतूट नातं. बहीण आणि भाऊ यांच्या अनोख्या प्रेमावर आधारित अशी गोष्ट म्हणजे ही संपूर्ण मालिका आहे. असीम आणि निवेदिता यांची ही प्रेमळ गोष्ट प्रेक्षकांना विशेष आवडते आहे. पण मालिकेत एक रंजक वळण आलं आहे. ते म्हणजे निवेदिताचं लग्न. निवेदिताचं लग्न झाल्यावर ती असीमपासून दुरावली जाणार का, असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. पण निवेदिताचं लग्न मकरंदसोबत ठरलं आहे. मकरंदला निवेदितासोबत लग्न करायचं आहे, पण तो सायको असल्याचं यशोधनला समजतं. यशोधन पुरावे जमा करतो आणि निवेदिता आणि मकरंद यांच्या लग्नात येऊन मकरंदचं पितळ उघडं पाडतो..              ऐन लग्नात धमाल ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. निवेदिताचं लग्न कसं‌ पार पडणार, हे प्रेक्षकांना पाहायला मिळेल. मकरंदसोबतचं लग्न मोडून मकरंदचा प्लॅन हाणून पाडण्यात यशोधनला यश मिळेल का? त्याचं निवेदितावर असलेलं प्रेम यातून त्याला व्यक्त करता येईल का, हे आपल्याला पाहायला मिळेल. मकरंदने रचलेला प्लॅन अखेर निवेदिता आणि त्याच्या लग्नाच्या दिवसापर्यंत येऊन ठेपला आहे. पण त्याचं या आधीचं लग्न आणि त्याने आखलेला प्लॅन यांबाबत निवेदिता आणि तिच्या घरचे अजूनही अनभिज्ञ आहेत. यशोधन सगळे पुरावे जमा करून मकरंदचा प्लॅन भर लग्नात सगळ्यांसमोर उघड करेल, पण यामुळे निवेदिता आणि मकरंद यांचं लग्न मोडण्यात त्याला यश मिळेल का? यापुढे मोठा प्रश्न उभा राहणार आहे तो म्हणजे निवेदिताच्या लग्नाचा. यशोधन सगळ्यांसमोर आपलं प्रेम व्यक्त करून निवेदितासोबत लग्नाला उभा राहणार असून निवेदिता आणि यशोधन यांचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडणार आहे. पण या सगळ्यांत असीमची जबाबदारी कोण घेणार, हा प्रश्न उभा राहणार आहे. यशोधन असीमची जबाबदारी नक्की घेईल, असा निवेदिताचा समाज आहे.

सनी तिच्या होमग्रोन व्हेंचरद्वारे महिलांना कसे सक्षम करते याची अनोखी गोष्ट 

 सनी लिओनीने अभिनेत्री तर आहे पण तिने अनेक गोष्टी पुढे जाऊन भारतातील एक महिला उद्योजक म्हणून स्वतःची ओळख संपादन केली आहे. तिने ज्या व्यवसायांमध्ये...

तमन्ना भाटिया हिच्या हॅपी डेज आणि पैया झाले पुन्हा रिलीज

 अभिनेत्री तमन्ना भाटियाने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या हृदयावर अमिट छाप सोडली आहे आणि यावेळी तिने तिचा सर्वात लोकप्रिय तेलुगू चित्रपट 'हॅपी डेज' आणि तमिळ चित्रपट...

Popular