Filmy Mania

रानटी चित्रपटाचा दमदार टिझर आला !

THE MOST POWERFUL MARATHI FILM OF THE DECADE…. अशी टॅगलाईन दिमाखाने मिरवणाऱ्या पुनीत बालन स्टुडिओज निर्मित व समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ या भव्य अॅक्शनपटाचा...

7 देशांतील 21 फीचर फिल्म्स, 8 वेब सिरीज; विविध जागतिक कथानकांच्या पर्वणीसाठी फिल्म बाजार मध्ये सह-निर्मिती बाजार

एनएफडीसी फिल्म बाजारची एशिया टीव्ही फोरम आणि मार्केट (एटीएफ) सोबत भागीदारी 18 व्या एनएफडीसी फिल्म बाजार ने सह-निर्मिती बाजारसाठी सात देशांतील 21 फीचर फिल्म्स आणि...

 ‘बड़े मियां छोटे मियां’ २७ ऑक्टोबर रोजी सोनी मॅक्सवर 

   बॉलिवूडचे पॉवरहाऊस असलेले अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा साहस आणि विनोद यांनी परिपूर्ण असा 'बड़े मियां छोटे मियां' हा चित्रपट प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी सज्ज आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित हा चित्रपट २७ ऑक्टोबर रोजी सोनी मॅक्सवर प्रदर्शित होणार आहे. टेलिव्हिजन प्रिमिअरच्या आधी अक्षय कुमारने टायगर श्रॉफबरोबर काम करण्याचा आपला अनुभव सांगितला. "टायगर हा मला माझ्या धाकट्या भावासारखा आहे", तो म्हणाला. "आम्ही लगेच मित्र झालो आणि आमची मैत्री आश्चर्यकारक आहे. धाडसी साहसदृष्ये सादर करण्यापासून ते व्हॉलीबॉल, लुडो यांसारखे खेळ आणि आराम करण्यापर्यंत आम्ही तासन्‌तास एकत्र घालवले आहेत. तो पूर्णपणे व्यावसायिक आहे आणि मी त्याच्याकडून खूप काही शिकलो आहे.                                                      प्रामाणिकपणे सांगायचे, तर आता मी टायगरबरोबरच्या चित्रीकरणाला मुकणार आहे." 'बड़े मियां छोटे मियां' या अभिजात चित्रपटाचे हे आधुनिक सादरीकरण आहे. यात रोमांचक कथा, आश्चर्यकारक दृश्ये आणि चित्तथरारक साहसदृश्ये आहेत. या चित्रपटात दोन माजी सैनिकांची कथा आहे, जे जगाला धोकादायक संकटातून वाचवण्यासाठी सैन्यात सहभागी होतात. 'बड़े मियां छोटे मियां' हा सर्व वयोगटांतील प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा, साहस, विनोद आणि नाट्य यांचा परिपूर्ण मिलाप आहे. २७ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री ८ वाजता या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर सोनी मॅक्सवर पाहायला विसरू नका.

दाक्षिणात्य अभिनेत्री शान्वी श्रीवास्तव मराठीत

‘रानटी’ चित्रपटात दिसणार मध्यवर्ती भूमिकेत समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ या आगामी मराठी चित्रपटाची  मागील काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटातून  दाक्षिणात्य अभिनेत्री आणि मॉडेल शान्वी श्रीवास्तव...

55व्या इफ्फीसाठी माध्यम प्रतिनिधी नोंदणीला सुरुवात

चित्रपटांचा आनंद सामायिक करण्यासाठी माध्यम प्रतिनिधींचे इफ्फीकडून स्वागतएफटीआयआयद्वारे पहिल्या काही भाग्यवान माध्यम प्रतिनिधींसाठी मोफत चित्रपट प्रशंसा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पुणे- 18 ऑक्टोबर 2024 55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट...

Popular