Filmy Mania

संग्रामने सांता बनावं -खुशबू तावडे

खुशबू तावडे (झी युवा - आम्ही दोघी) - ख्रिसमस म्हणजे उत्साह आणि आनंद. वर्षाचा शेवट या सणाने खूप आनंदी होतो आणि या सणाची सगळे आतुरतेने वाट देखील बघतात. शूटिंगमध्ये बिझीअसल्यामुळे मी यावर्षी सेलिब्रेट करू शकत नाही आहे. मी आणि संग्राम ख्रिसमसच्या दिवशी चर्च मध्ये जाऊ आणि माझी अशी इच्छा आहे कि संग्रामने माझा सीक्रेट सांता बनावं आणि मला खूप सारेगिफ्ट्स द्यावे.

ख्रिसमससाठी मी खूप उत्सुक…जुई गडकरी

जुई गडकरी (झी युवा - वर्तुळ) - मला ख्रिसमस हा सण खूप आवडतो. या सणाच्या वेळी आजूबाजूचं वातावरण हे खूपच चिअरफूल आणि पॉसिटीव्ह असतं. मी एका कॉन्व्हेंट शाळेची विद्यार्थी होतीत्यामुळे हा सण मी लहानपणापासूनच साजरा करत आली आहे. मी शाळेत असताना आम्ही सर्व मुलं 'जिंगल बेल'च गाणं गायचो, डेकोरेशन करायचो, शाळेच्या मुख्याध्यापकांकडून आम्हाला मेजवानीदेखील मिळायची. यावर्षी मी माझ्या घरी ख्रिसमस ट्री डेकोरेट करणार आहे आणि मी खूप उत्सुक आहे.

मी ख्रिसमस मिडनाईटला मास प्रेयरसाठी चर्चमध्ये जाणार -तितिक्षा तावडे

तितिक्षा तावडे (झी युवा - तू अशी जवळी राहा) माझ्यासाठी ख्रिसमस म्हणजे गोडधोड पदार्थ खाणं आणि थंडीच्या या वातावरणात मित्र मैत्रिणींसोबत पार्टी करणं. मी गोव्यामध्ये हॉटेल मॅनेजमेंट शिकत होती तसंच लहानपणीपासून कॅथलिकशेजाऱ्यांच्या सहवासात मोठी झाल्यामुळे मला या सणाचं नेहमीच अप्रूप वाटतं. हे वर्ष माझ्यासाठी खूप स्पेशल आहे करणं माझ्या सख्ख्या बहिणीचं लग्न झालं आणि माझ्या वाट्याला तू अशी जवळी राहाया मालिकेतील मनवाची नवीन भूमिका देखील आली. त्यामुळे डबल सेलिब्रेशन असणार आहे. मी ख्रिसमस मिडनाईटला मास प्रेयरसाठी चर्चमध्ये जाणार आहे.

‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर अवतरणार ‘सिम्बा’

आपला रोजचा ताणतणाव विसरून आपल्याला हसायला लावणारी, अनेक सेलिब्रिटींच्या उपस्थितीत संपूर्ण महाराष्ट्राचं मनोरंजन करणारी मालिका म्हणजे 'चला हवा येऊ द्या.' अवघ्या काही दिवसातच हा...

येत्या ४ जानेवारीला येणार ‘थापाड्या’

तुम्ही कधी मारली कुणाला थाप? ती समोरच्याला पचली की तुम्ही तोंडावर आपटले? तुमचा एखादा मित्र आहे का थापाड्या? थाप मारताना धमाल मज्जा येते ना?...

Popular