Filmy Mania

अनुकंपातत्व सारख्या महत्वाच्या विषयावर आधारित वडील आणि मुलीचा अनोखा प्रवास

गेले काही दिवस बाबांच्या ज्या राजकन्येविषयी सर्वत्र चर्चा चालली होती ती राजकन्या आता प्रेक्षकांच्या भेटीसआली आहे. साधी, मध्यमवर्गीय, मनमिळावू अशी राजकन्येच्या रुपातून ‘अवनी जयराम भोसले’ छोट्या पद्यावरआपल्याला दिसली आणि अगदी पहिल्याच एपिसोड पासूनच  तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत .सोनी मराठीवरील ‘एक होती राजकन्या’ या नवीन मालिकेचा पहिला एपिसोड नुकताच प्रदर्शित झाला आहे .   अभिनेते किशोरकदम आणि अभिनेत्री किरण ढाणे यांच्या अभिनयाने सुरुवात झालेल्या या मालिकेच्या पहिल्या एपिसोडमध्येच  एकंदरीत वडील आणि मुलीच्या गोड  नात्याची गुंफण पाहायला मिळत आहे  नेहमी डॉक्टर बनून समाजसेवा करण्याचं स्वप्नं पाहणा-या अवनीचा कॉन्स्टेबल म्हणून प्रवासाला सुरुवात झालीआहे.आणि ती नुकतीच अनुकंपातत्वावर पोलीस  खात्यात भरती झाली आहे .  अनुकंपा तत्व म्हणजे शासकीयसेवेत असताना दिवंगत किंवा अकाली सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांच्या नातेवाईकांची त्यांच्या ठिकाणी कामकरण्यासाठी नियुक्ती केली जाते. बाबांचं छत्र हरवल्यामुळे त्यांच्या जागी अनुकंपा तत्वावर आपल्या अवनीचीनियुक्ती झाली आहे. बाबांचं छत्र हरवल्यानंतर खंबीर बनून अवनी सर्व जबाबदा-या योग्य रितीने पार पाडण्याच्याप्रयत्नात आहे. बाबांची शिकवण आणि त्यांच्या कर्तबगारीमुळे त्यांच्यातील गुण हे  अवनीमध्ये देखील आपसूकआले आहेत.  अवनीचा मदतीला धावून जाण्याचा स्वभाव आणि  रोखठोकपणे आपली मतं मांडण्याचा स्वभावप्रेक्षकांनी नक्की अनुभवला असेल. अश्या ह्या बाबांच्या लाडक्या राजकन्येचा एक अनोखा  प्रवास नक्की पहा. तिच्या प्रवासात सहभागी होण्यासाठी पाहत राहा ‘एक होती राजकन्या’ सोमवार ते शनिवार सायंकाळी ७:३०वाजता फक्त सोनी मराठीवर.

साहो चित्रपटासाठी प्रभास ने घटवले आपले वजन। 

बाहुबलीच्या प्रचंड यशा नंतर अभिनेता प्रभास आता आपल्या आगामी सिनेमा साहो सोबत चाहत्यांचे मनोरंजन करण्यास तयार आहे। "साहो" च्या निर्मात्यांनी नुकत्याच 'शेड्स ऑफ साहो' ची...

साताऱ्याची माधुरी पवार महाराष्ट्राची पहिली अप्सरा

तीन महिन्यांच्या प्रवासानंतर १४ अप्सरामधून केवळ टॉप पाच अप्सरा या कार्यक्रमात टिकल्या आणि त्यांनी त्यांच्या नृत्याने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले. मालवणची लाडूबाई ऋतुजा राणे...

सहकलाकारांनी दिलं शितलीला सरप्राईज

झी मराठीवरील 'लागीरं झालं जी' लोकप्रिय मालिका आणि त्यातील पात्रं शीतल आणि अजिंक्य प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. शीतल म्हणजेच अभिनेत्री शिवानी बावकर हिचा...

डिजीटल डिटॉक्सवरून परतलेल्या सई ताम्हणकरचे ‘क्लासी’ फोटोशूट

अभिनेत्री सई ताम्हणकरने फेब्रुवारी महिन्यात सोशल मीडियावरून ती डिजीटल डिटॉक्सवर जात असल्याचे जाहिर केले. एक महिना डिजीटल डिटॉक्सवर गेलेल्या सईने ह्या दरम्यान पाँडेचरीला जाऊन...

Popular