पुणे-- सर्वोच्च न्यायालयाने ३७७ कलम रद्द केलं असलं तरी त्यामुळे आमच्या आयुष्यात फार फरक पडलेला नाही. कायद्यातील तरतुदी पेक्षा आम्हाला समाजाने स्वीकारणं जास्त गरजेचे...
बोल्ड अँड ब्युटीफुल सई ताम्हणकर ही अनेक तरुणांच्या दिलाची धडकन आहे. तिच्या अदा, बोल्ड अवतार यावर सगळेच जण फिदा असतात. तिने तिच्या अभिनयासोबत तिच्या आवाजाने देखील सगळ्यांना मदहोश केलं आहे. तिचं का जीव तोळा तोळा हे गाणं अजूनही प्रेक्षकांच्या ओठांवर आहे. पण सगळ्यांची लाडकी सई, चक्क एका पोलिसाला घाबरलेली पाहायला मिळाली. या पोलिसाने तिला चक्क गाणे गाण्यास सांगितले. तिने सुद्धा 'शिट्टी वाजली' हे गाणे आपल्या आवाजात सगळ्यांसमोर सादर केले. ही घटना सईसोबत घडली; अनेक सेलिब्रिटी मंडळींच्या उपस्थितीत 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण २०१९' या सोहळ्यात!
'झी टॉकीज' ही मराठी चित्रपट वाहिनी दरवर्षी 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' हा सोहळा आयोजित करते. यंदाचे वर्ष सुद्धा याला अपवाद नव्हते. सई ताम्हणकरने गायलेले 'शिट्टी वाजली' हे गाणे सुद्धा यंदाच्या सोहळ्यातील मुख्य आकर्षण ठरले आहे. अभिनेता सागर कारंडे याने पोलिसाच्या भूमिकेत स्टेजवर एंट्री घेतली. एवढेच नाही, तर सागरने थेट प्रेक्षकांमध्ये जाऊन त्याने सगळ्या उपस्थित कलाकारांना पोलिसी जरब दाखवली. सईने या पोलिसाचा धाक घेतल्याचं सगळ्यांनाच पाहायला मिळालं. अर्थात, तिने सादर केलेले गाणे हा सगळ्यांच्या मनोरंजनाचा मोठा विषय ठरला आहे.
वयाची साठी ओलांडली, पती आजारी, घरात हालाखीची आर्थिक परिस्थिती अशा संघर्षमय वातावरणात जगावे तरी कसे? असा प्रश्न मनात आहे. परंतु, जगण्याचा संघर्ष कुणालाच चुकला...
झी मराठीवरील 'तुझ्यात जीव रंगला' या लोकप्रिय मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील व्यक्तिरेखांवर संबंध महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात....
पुणे, ता. १ : प्रसिद्ध साहित्यिक दशरथ यादव यांची फाटक कांदबरी जीएसएम फिल्म च्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर येत आहे. ग्रामीण जीवनाचे अस्सल दर्शन घडविणारी...