‘लाईट्स, कॅमेरा, ऍक्शन’ म्हणण्यासाठी राज्य सरकारने मनोरंजनसृष्टीला ग्रीन सिग्नल दिला आहे... पण अर्थात सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेल्या नियमांच्या चौकटीत राहूनच चित्रीकरणाला परवानवगी मिळाली आहे. सेटवर निवडक लोकांची...
आनंदी हे जग सारे' या मालिकेने काही वर्षांचा लीप अवकाश घेतला असून सगळ्यांची लाडकी आनंदी आता प्रेक्षकांना मोठी झालेली दिसणार आहे. एवढंच नाही तर मोठी आनंदी स्वतःच्या पायावर उभी आहे आणि आयुष्यात राजकुमाराची वाट बघतेय. तिच्या स्वप्नातला हा राजकुमार म्हणजे दुसरातिसरा कोणी नसून छोट्या पडद्यवरचा चॉकलेट बॉय यशोमान आपटे आहे. आधी काही मालिकेतून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या यशोमानची ही दुसरी मालिका आहे. आनंदीची व्यक्तिरेखा रूपल नंद ही अभिनेत्री करते आहे. या मालिकेच्या निमित्ताने यशोमान आणि रुपल ही फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
या मालिकेच्या नवीन प्रोमोला सुद्धा प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. आनंदीचे बाबा म्हणेजच आस्ताद करत असेलली आनंदीची काळजी आणि स्वप्नाळू आणि स्वछंदी आनंदी या प्रोमोमध्ये पाहायला मिळाली आणि आनंदीच्या स्वप्नांचा राजकुमाराची म्हणेजच यशोमानची एंट्री सुद्धा मालिकेत होणार आहे.
mymarathi.net पुणे- मराठी सिने नाट्यसृष्टीतील कलावंतांच्या समस्या आर्थिक विवंचना आहे तिथेच आहेत ,पूर्वापार त्या तशाच आहेत ,खरेतर या समस्या सोडवायला पुढाकार घेऊन असे कोणी पुढे...
आई माझी काळुबाई' ही मालिका लवकरच सोनी मराठी वाहिनीवर सुरू होत आहे. नुकताच त्याचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला. प्रोमो मधून ही गोष्ट आर्या नावाच्या मुलीची, तिच्या भक्तीची आणि काळूबाईच्या शक्तीची आहे हे कळतंय. आर्या म्हणजेच 'प्राजक्ता गायकवाड' हा नवा चेहरा सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. या आधी प्राजक्ता गायकवाड हिला ऐतिहासिक भूमिकेमधून प्रेक्षकांनी पाहिलं आहे पण एका कॉलेज मधल्या तरुणीची भूमिका पहिल्यांदाच ती करत आहे. या भूमिकेसाठी तिने थोडे वजन कमी केलं आहे इतकंच नाही तर स्वतःची स्टाईल आणि लूक सुद्धा प्राजक्ताने या भूमिकेसाठी बदलेल आहे.
'आई माझी काळुबाई' या मालिकेच्या प्रोमोने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. प्राजक्ताला एका नवीन भूमिकेत पाहण्यासाठी तिचा चाहतावर्ग देखील उत्सुक आहे. प्राजक्ता पहिल्यांदाच आपल्या वयाची भूमिका साकारत आहे. आर्याचं एक पाऊल कशाप्रकारे तिचं आयुष्य बदलेल, तिच्या मदतीला काळुबाई कशी येईल हे सर्व पाहणं खूप मनोरंजक असणार आहे. 'गोष्ट आर्याच्या भक्तीची, काळुबाईच्या शक्तीची' पाहा 'आई माझी काळुबाई' लवकरच आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.
कोरोनाचे संकट हळूहळू दूर होत असताना सिनेक्षेत्रही रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत आहे. भारतातील अग्रगण्य सिनेनिर्मिती संस्थांपैकी एक असलेल्या 'कार्निवल मोशन पिक्चर्स' या संस्थेनेही आपला आगामी...