Filmy Mania

हॉटेलमध्ये अभिनेत्रीचा विनयभंग, अभिनेत्याला अटक

एका सुपरिचित अभिनेत्याला महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली आहे. विजय राज असे त्याचे नाव असून त्याच्या वर चित्रपटाच्या सेटवर एका महिला कलाकाराचा विनयभंग केल्याचा...

‘आई माझी काळुबाई’ मालिकेत ‘वीणा जगताप’ आर्याच्या भूमिकेत!

सध्या मराठी मालिका विश्वात विशेष चर्चा आहे, ती सोनी मराठीवरच्या ‘आई माझी काळुबाई’ या मालिकेतल्या ‘आर्या’या  व्यक्तिरेखेची. या भूमिकेत आता लोकप्रिय अभिनेत्री वीणा जगताप दिसणार आहे.  सध्या ही मालिका रंजक वळणावर आहे. स्वप्नात दिसणार्‍या गोष्टींचा शोध घेताना, त्या प्रत्यक्षात असल्याचा साक्षात्कार आर्याला झाला आणि या शोधमोहिमेत त्या गोष्टींचा तिच्या भूतकाळाशी काहीतरी सबंध आहे, हे कळेपर्यंत तिच्या भावाचं अपहरण झालं आणि त्याच्या सुटकेसाठी अपहरणकर्त्या तालेवार पाटील कुटुंबाच्या नजरकैदेत ती सून म्हणून अडकली.   खलनायक विराटच्या  कह्यात असलेलं पाटील कुटुंब आणि काळुबाईवरच्या श्रद्धा-भक्तीनी त्यांच्यासमोर उभी ठाकलेली आर्या आणि वेळोवेळी तिला वाचवणारा, पण पाटलांचा वंश असलेला अमोघ; अशा रंजक टप्प्यावर ही मालिका आता आहे. ज्या घरात देवीचं नाव उच्चारायला बंदी आहे, त्या घरात देवीची पूजा होऊ घातली आहे आणि आर्याच्या भूमिकेतली वीणा जगताप  सत्य आणि असत्य यांच्यातल्या  लढाईची मुहूर्तमेढ पाटील घरात  रोवणार आहे. ह्या कथेचा नवा उत्कंठावर्धक टप्पा    महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री, मालिका आणि रिएलिटी शो यांमधून आपला वेगळा ठसा उमटवणारी वीणा जगताप  सादर करणार असल्यानी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. सोमवार ते शनिवार,संध्याकाळी सात वाजता सोनी मराठीवर सादर होणारा, सातार्‍याच्या निसर्गरम्य परिसरात उलगडणारा हा पौराणिक कथेचा संदर्भ असलेला कौटुंबिकपट सर्वार्थानी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला आहे.  वीणाच्या प्रसन्न, ग्लॅमरस प्रवेशानी रंजकतेत भर पडली आहे. 

‘डॅाक्टर डॅाक्टर’ने जुळवला एकत्र येण्याचा योग – प्रथमेश

अनलॅाक सुरू झाल्यापासून प्रेक्षकांना नवनवीन सिनेमे पाहण्याचे वेध लागले आहेत. प्रेक्षकांची हीच आवड ओळखून मराठी सिनेसृष्टीसुद्धा नवनवीन माध्यमांकडे वळली आहे. ३० ऑक्टोबर रोजी 'डॅाक्टर...

दस-याला सई ताम्हणकरचं नव्या क्षेत्रात सीमोल्लंघन, ‘दि सारी स्टोरी’सह सई बनली उद्योजिका !!

अभिनेत्री सई ताम्हणकरने बॉलीवूड, आणि फॅशनविश्व  गाजवल्यावर आता विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर अजून एका विश्वात पाऊल ठेवलं आहे. सई ताम्हणकरने आपलं स्वत:चं ‘दि सारी स्टोरी’ हे...

दस-याच्या मुहूर्तावर सोनाली खरे करतेय 8 वर्षांनी टेलिव्हिजनवर कमबॅक

मनोरंजन- अभिनेत्री सोनाली खरे 2014 मध्ये ‘बे दुणे दहा’ ह्या टिव्ही मालिकेमध्ये दिसली होती. त्यानंतर तिने ‘7, रोशन व्हिला’, ‘हृदयांतर’, सिनेमांमध्ये काम केलं. सोनाली यंदा दस-याच्या मुहूर्तावर टेलिव्हिजन विश्वात परततेय. कलर्स मराठीवरच्या ‘आज काय...

Popular