'तू सौभाग्यवती हो' विवाह सप्ताह - १ जूनपासून संध्या. ७ वा.
सोनी मराठी वाहिनीवरील 'तू सौभाग्यवती हो' मालिकेमध्ये लगीन घाई सुरु झाली आहे. येत्या काही दिवसात ऐश्वर्या आणि सूर्यभान हे लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. करारी सूर्यभान आणि अल्लड ऐश्वर्या यांच्या लग्नाचा थाट तितकाच असणार आहे. हळद, मेहेंदी, लग्नात होणारे इतर रीतिरिवाज हे सगळं प्रेक्षकांना ऐश्वर्या आणि सूर्यभान यांच्या लग्नात पाहायला मिळणार आहे.
पण सूर्यभान ऐश्वर्याला बायकोचा दर्जा देऊ शकेल का? आणि त्याची मुलं तिला आपली आई मानतील का? हे पाहणं प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं असणार आहे.
लॉक ग्रिफिन' ही वसंत वसंत लिमये यांची अत्यंत उत्कण्ठावर्धक रोमांचकारी कादंबरी आता ‘स्टोरीटेल’च्या लोकप्रिय ऑडिओबुक श्रेणीत स्वतः लेखक वसंत वसंत लिमये धीरगंभीर आवाजात प्रदर्शित होत आहे....
मागील काही महिन्यांपासून 'प्लॅनेट मराठी' ओटीटी आपल्या आगामी वेबसिरीज आणि वेबफिल्मची घोषणा करत आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच आता 'प्लॅनेट मराठी'चा नवा...
"साईबाबा श्रद्धा आणि सबुरी" मालिकेवरील 'साईलीला' स्पर्धेला प्रेक्षकांकडून दररोज मिळणारा भरघोस प्रतिसाद, 'सप्तपदी' मालिकेतील अमृता - संजूची अनोखी कथा त्यासोबत संपूर्ण मे महिन्यात दररोज एका सुपरहिट चित्रपटाच्या प्रीमियर...