Filmy Mania

इटलीच्या जीफोनी महोत्सवात ‘येरे येरे पावसा’

सध्या पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला असताना, ‘येरे येरे पावसा’ हा आगामी मराठी चित्रपटही विविध परदेशी चित्रपट महोत्सवात चांगला गाजतोय. इटलीच्या ५१व्या ‘जीफोनी’ चित्रपट महोत्सवासाठी ‘येरे...

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी सिनेमा झळकण्यासाठी पुढाकार घेणार – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

मुंबई, दि. 19 : कान्स चित्रपट महोत्सवाबरोबरच गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गेल्या काही वर्षांपासून सर्वोत्तम मराठी सिनेमे सांस्कृतिक कार्य विभागाकडून पाठविण्यात येत आहे. येत्या...

‘सोयरीक’ जुळणार….

‘सोयरीक’  जुळणं ही प्रत्येकाच्याच आयुष्यातील महत्त्वाची घटना. आणि ती कधी? कुठे? आणि कशी जुळेल? या सुद्धा नशीबाच्या आणि योगायोगाच्या गोष्टी असतात. विजय शिंदे, शशांक शेंडे आणि...

‘कोण होणार करोडपती’मध्ये कर्मवीर म्हणून खेळणार नाना पाटेकर!

'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या  कार्यक्रमातून सामान्य माणसाला आपल्या ज्ञानाच्या जोरावर करोडपती होण्याची संधी मिळते  आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून 'कोण होणार करोडपती'ला चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन सचिन खेडेकर करत आहेत. हॉटसीटवर आलेल्या प्रत्येकाशी आपुलकीने बोलून त्यांना मानसिक पाठबळ देत आहेत. असा दावा करत'कोण होणार करोडपती'मध्ये आठवड्यातून एक दिवस 'कर्मवीर विशेष' भाग असतो. पहिल्याच आठवड्यात शनिवारी, १७ जुलैच्या  भागात पद्मश्री अभिनेते 'नाना पाटेकर' कर्मवीर म्हणून येणार आहेत.अशी माहिती सोनी मराठी च्या वतीने मायमराठीला कळविण्यात आली आहे. सोनी मराठी ने पुढे असेही म्हटले आहे कि,'नाना पाटेकर यांनी मंचावर अनेक आठवणींना उजाळा दिला. कधीही न पाहिलेले नाना प्रेक्षकांना या भागात पाहायला मिळणार आहेत. फार कमी लोकांना माहीत असेल, पण नाना पाटेकर यांनी सैनिकी शिक्षण घेतले असून त्यांनी कारगील युद्धात भागदेखील घेतला होता.  त्यांनी आपले कारगील युद्धातील काही अनुभवही सांगितले. नानांच्या वडिलांबद्दल नाना कधी फार व्यक्त होत नाहीत, पण खेडेकरांनी त्या मुद्द्याला हात घालून नानांना बोलते केले. आपल्या वडिलांबद्दल बोलताना नाना भावुक झाले. अनेक किस्से, कविता, बालपणीच्या आठवणी, शेतावरच्या गप्पा असे नानांचे अनेक पैलू या मंचावर उलगडले. कर्मवीरच्या भागामध्ये स्पर्धक येऊन सामाजातील गरजू घटकांसाठी खेळतात व जिंकलेली रक्कम त्यांना मदत म्हणून देऊ करतात. आता नाना नेमकं कोणासाठी खेळणार हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे. नुकत्याच आलेल्या प्रोमो मध्ये नाना सचिन खेडेकरांना आपली पण त्यांच्यासारखा सूट घालायची इच्छा बोलून दाखवताना दिसले. पहिल्या  कर्मवीर भागात नाना पाटेकर आले आहेत  तर या पर्वात पुढे आणखी कोणते कर्मवीर पाहायला मिळतील याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. घरबसल्या लखपती होण्याची संधी सोनी मराठी वाहिनी आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन आली आहे. कोण होणार करोडपती' टीव्हीवर पाहता-पाहता प्रेक्षक खेळू शकतात 'कोण होणार करोडपती प्ले अलॉंग'! आणि जिंकू शकतात एक लाख ...

कालिदास दिनानिमित्त ‘स्टोरीटेल मराठी ऑडिओबुक’मध्ये ‘मी…कालिदास’

आषाढस्य प्रथम दिवसे... म्हणजे आषाढ महिन्याचा पहिला दिवस हा कालिदास दिवस म्हणून साजरा केला जातो याचे कारण कवि कालिदासाने मेघदूत हे अजरामर काव्य लिहिले....

Popular