Filmy Mania

प्लॅनेट मराठी’चे ‘प्लॅनेट गोयं’ सुपर ॲप गोवेकरांसाठी सज्ज;मनोरंजनासोबतच गोव्याची इत्यंभूत माहिती उपलब्ध

पहिला मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मचा बहुमान मिळवल्यानंतर 'प्लॅनेट मराठी ओटीटी' आता आपल्या प्रेक्षकांसाठी काही तरी झक्कास घेऊन येत आहे. नेहमीच प्रेक्षकांना सर्जनशील आशय देत आलेले...

अमृता फडणवीस यांच्या हिंदी चित्रपटातील गाण्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

मुंबई  – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या एक बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जातात. अमृता फडणवीस यांनी बँकिंग क्षेत्रात देखील आपला...

अवधूत गांधी साकारणार संत नामदेव. 

 सोनी मराठी वाहिनीवरील 'ज्ञानेश्वर माउली' या मालिकेने प्रेक्षकांना संतांची परंपरा उलगडवत भक्तिरसात तल्लीन केले आहे. माउली आणि त्यांची भावंडं यांचे चमत्कार, रेड्यामुखी वेद, सार्थ श्रीज्ञानेश्वरी, विश्वरूप दर्शन, पसायदान हे सारं काही प्रेक्षकांना विशेष भावलं.  प्रेक्षक हरिभक्तीच्या या अलौकिक प्रवासाचे साक्षीदार झाले आहेत. मालिकेतल्या प्रत्येक व्यक्तिरेखेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आहे. पण आता मालिकेत विविध संतांची मांदियाळी अनुभवायला मिळत असताना यात आणखी एका  संताचा प्रवेश होणार आहे.     संतांच्या या प्रवासाची सुरुवात संत कान्होपात्रा यांच्या येण्याने झाली. संत चोखामेळा यांची कथाही प्रेक्षकांना पाहायला मिळाली आणि प्रेक्षकांना ती भावली आहे. आता मालिकेत संत नामदेव यांचा प्रवेश होणार आहे. माउली आणि नामदेव यांची भेट कशा प्रकारे होणार, हे पाहणं रंजक ठरणार आहे. संत नामदेव यांची भूमिका सलाम पुणे पुरस्काराचे मानकरी असलेले  अवधूत गांधी साकारणार आहेत. अवधूत गांधी हे वारकरी संप्रदायातलं नावाजलेलं व्यक्तिमत्त्व. ते ज्ञानेश्वर माउली मालिकेचा  सुरुवातीपासूनच भाग आहेत. याविषयी  त्यांचा अभ्यास फार महत्त्वाचा  आहे. त्यांच्या या  वेशाची/पेहेरावाची प्रेक्षकांमध्ये  चर्चा होईल, यात शंकाच नाही. त्यांच्या या आध्यात्मिक भूमिकेसाठी त्यांनी विशेष मेहनत घेतली आहे. संत नामदेव आणि ज्ञानेश्वर माउली यांची भेट कशी होते, हे पाहणे प्रेक्षकांसाठी  उत्कंठा वाढवणारे असेल.

‘तू फक्त हो म्हण’ चित्रपट १४ ऑक्टोबरला चित्रपटगृहात

प्रेम हे आयुष्याच्या वाटेवरचे वळण असते. त्यात काही जण यशस्वी होतात तर काहींना अपयश येते. प्रेमविवाह  केल्यानंतर आजही कित्येक प्रेमवीरांना निंदनीय वागणुकीचा अनुभव येतो. आता...

अविश्वसनीय सत्यकथेवर आधारलेल्या रेवती, सत्यजीत दुबे आणि मृण्मयी गोडबोले अभिनीत ‘ऐ जिंदगी’चा ट्रेलर रिलीज!

अनिर्बन बोस दिग्दर्शित 'ऐ जिंदगी'चा मेडीकल ड्रामा १४ ऑक्टोबर रोजी जागतिक पातळीवर रिलीज होणार!! उदयोन्मुख आणि उत्साहवर्धक प्रतिभेच्या पाठिशी उभे राहणारं ‘प्लॅटून वन फिल्म्स’ प्रॉडक्शन हाऊस हे प्रादेशिक चित्रपट...

Popular