Filmy Mania
‘सुर्या’ चित्रपटात दिसणार प्रेमाचा त्रिकोण
अॅक्शनपॅक्ड ट्रेलर प्रदर्शित
अॅक्शनपट प्रेक्षकांना नेहमीच भुरळ घालत आले आहेत. धडाकेबाज अॅक्शन सीन नायक नायिकेमधील रोमान्स आणि त्याला खटकेबाज संवादाची फोडणी अशा त्रिसूत्रीवर आधारलेला रोमँटिक आणि अॅक्शनचे परफेक्ट कॉम्बिनेशन असलेला ‘सुर्या’ हा चित्रपट ६ जानेवारीला प्रेक्षकांच्या...
रविकिरणच्या बालनाट्य स्पर्धेत “ध्येय्यधुंद” सर्वोत्कृष्ट
नुकतीच रविकिरण संस्थेची ३६वी बालनाट्य स्पर्धा रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे पार पडली. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेला या वर्षी प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. वेळेअभावी उशिरा आलेल्या काही प्रवेशिका नाईलाजाने नाकाराव्या लागल्या. या स्पर्धेचे उद्घाटन पु. ल. अकादमीचे डायरेक्टर, श्री. संतोष रोकडे यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पारितोषिक वितरण समारंभाला ज्येष्ठ नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री नागेश नामदेव वांद्रे यांनी केले. श्री वांद्रे यांनी आपल्या प्रास्ताविकात यावर्षीची स्पर्धा डॉ. के. एम. एस. शिरोडकर हायस्कुलचे शिक्षक स्मृतिगत ज्योतीराम कदम सर यांच्या नावे घेतल्याचे सांगताना अशा प्रकारची स्पर्धा रविकिरण मंडळाने घ्यावी असे १९८४ साली कदमसरांनीच सुचविल्याचे सांगितले. या स्पर्धेच्या निमित्ताने ज्योतीराम कदम सरांनी लिहिलेल्या बालनाट्यांची पुस्तके मंडळातर्फे प्रत्येक शाळा/संस्था प्रतिनिधींना मोफत वाटण्यात आली. रवींद्र नाट्य मंदिराचे लाईट्मन, गेटकिपर, नेपथ्य व्यवस्थापक यांच्या हस्ते या पुस्तकांच्या संचाचे वाटप करण्यात आले
या स्पर्धेच्या निमित्ताने अशा निवृत्त शिक्षकांच्या कार्याची नोंद घेतली जाते. आपल्या सेवेमध्ये असताना जे शिक्षकांनी बालनाट्याचे लेखन/दिग्दर्शन करून स्पर्धेमध्ये सहभागी होतात त्यांचा यथोचित सन्मान करण्याची रविकिरणची परंपराआहे. या वर्षी नॅशनल एज्युकेशन सोसायटीचे मुख्याध्यापक श्री दीपक कुलकर्णी यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या कारकिर्दीत आगळीवेगळी म्हणजेच विज्ञाननिष्ठ बालनाटिका रविकिरणच्या रंगमंचावरती सादर करण्यात आली होती. सत्काराला उत्तर देताना श्री दीपक कुलकर्णी म्हणाले एवढं मोठं व्यासपीठ मुलांना उपलब्ध करून देणारी संस्था फक्त रविकिरणच. तसंच साडेतीन दशकं हा उपक्रम चालू ठेवणं आणि तितक्याच उत्साहाने तो साजरा करणं हे केवळ कलाकार निर्मिती नसून या मागे एक सुसंस्कारी समाज आणि सुजाण प्रेक्षक निर्माण करण्याचा यज्ञच रविकिरणने सूरु केला असे ते म्हणाले.
या स्पर्धेच्या निमित्ताने उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे विलास भिकाजी येरम यांचा व मंडळाचे सभासद प्रमोद राणे यांची बेस्ट कामगार को. ऑप. सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच संस्थेचे सभासद श्री महेंद्र पवार यांची भारत सरकारच्या भारतीय संस्कृतीक परिषदेच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल मानपत्र-शाल-श्रीफळ देऊन प्रदीप मुळ्ये व स्पर्धेचे प्रायोजक एसबीआय लाईफच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना प्रातिनिधिक म्हणूनबोलताना महेंद्र पवार म्हणाले हे मानपत्र नव्हे तर ऋणपत्र आहे. आजवरच्या कारकिर्दीला केवळ रविकिरण परिवाराचा पाठिंबा असल्यामुळे आम्ही घडू शकलो आहोत.
या स्पर्धेच्या निम्मिताने प्रकाशित होणाऱ्या "स्मृतिपर्ण" या स्मरणिकेचे प्रकाशन प्रमुख पाहुणे श्री प्रदीप मुळ्ये यांच्या हस्ते केले गेले. या स्मरणिकेत ज्येष्ठ नाट्य-समीक्षक श्री कमलाकर नाडकर्णी व मंडळाचे कार्यकारी सदस्य श्री महेंद्र पवार ज्योतीराम कदम सरांच्या बालनाट्य क्षेत्रातील कर्तृत्वाचा आढावा घेणाऱ्या लेखांचा समावेश करण्यात आला आहे.
जेष्ठअभिनेत्री विमल म्हात्रे, डॉ. माधुरी विनायक गवांदे, धनंजय सरदेशपांडे यांनी या स्पर्धेच्या परीक्षणाचे काम पहिले. या कार्यक्रमाला माजीमहापौर किशोरीताई पेडणेकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि मानपत्राचे वाचन अशोक परब, नितीन नगरकर व कु. सोहम पवार यांनी केले. खजिनदार गजानन राणे यांनी सगळ्यांचे आभार मानले.
ललित प्रभाकर प्रथमच दिसणार टेरर अंदाजात
तरुण रक्तात नेहमीच एक चैतन्य सळसळत असतं. काहीतरी करून दाखविण्याची धमक या वयात नसानसांमध्ये भिनलेली असते. आयुष्यातला असा काळ ज्यात प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याची प्रबळ इच्छा असते. चुकीचं घडताना त्याच्याविरुद्ध आवाज उठवण्याची ताकद असते. हाच अंदाज आपल्याला अभिनेता ललित प्रभाकरच्या रूपाने आगामी 'टर्री या मराठी चित्रपटातून पहायला मिळणार आहे.
'टर्री’ हा शब्द पाळणारा, खरी मैत्री जोपासणारा..कोणतीही जबाबदारी स्वीकारणारा पण गरम रक्ताच्या 'टर्री’ मध्ये हळवेपणा आहे. अस्सल ग्रामीण बाज घेऊन रांगड्या अंदाजात 'टर्री’ प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. ललित प्रभाकर प्रथमच अशा ‘टेरर स्वॅग’ मध्ये मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे.
त्याची नजर टर्री, त्याचा जिगर टर्री..!
त्याला नडणाऱ्यांची टर्रर्रर्रकन फाडायला येतोय...टर्री!!!
असा जबरदस्त स्वॅग घेऊन 'टर्री’ चित्रपटाचं बेधडक रांगडं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. येत्या १७ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘ऑन युव्हर स्पॉट आणि फॅन्टासमागोरिया फिल्म्स यांच्या सहयोगाने 'टर्री' चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून प्रतीक चव्हाण, अक्षय आढळराव पाटील या चित्रपटाचे निर्माते आहेत. सहनिर्माते महेश सहानी आणि सुबूर खान आहेत. राष्ट्रीय पारितोषिक विजेते महेश रावसाहेब काळे यांनी चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन केले आहे.
'टर्री' चित्रपटात ललित सोबत गौरी नलावडे दिसणार असून शशांक शेंडे, अनिल नगरकर आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे छायांकन अमोल गोळे यांनी केले असून संकलन प्रवीण जहागीरदार, श्रीराम बडवे यांचे आहे. संगीतकार प्रफुल्ल कार्लेकर-स्वप्नील गोडबोले आहेत. गायक अवधूत गुप्ते, रोहित राऊत, शरयू दाते यांच्या आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबध्द करण्यात आली आहेत. एजाज गुलाब हे या चित्रपटाचे अॅक्शन डिरेक्टर आहेत.
अतिशय सुंदर आशय, विषय चित्रपटामधील उत्तम संवाद, त्याला अॅक्शनची जोड असलेल्या या कलाकृतीचं व्हिजन पसंत पडल्याने 'टर्री' चित्रपटाची निर्मिती केल्याचे निर्माते प्रतीक चव्हाण यांनी सांगितले. तर ग्रामीण भागातील आजची ‘टेरर’होऊ पाहणारी तरुणाई आणि त्यातून कळत नकळत उद्भवणारे धोके, प्रत्येक तरुणाला हवाहवासा वाटणारा प्रसंगी आत्मचिंतन आणि विचारमंथन करण्यास भाग पडणारा अगदी सोप्या भाषेत चित्रपटातून मांडलेला सामाजिक आशय, मनाला भिडल्याने या चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतल्याचे निर्माते अक्षय आढळराव पाटील यांनी सांगितले.
'टर्री' चित्रपटाच्या निमित्ताने आजवर केलेल्या भूमिकांपेक्षा अगदी वेगळी भूमिका करायला मिळाल्याचं ललित आवर्जून सांगतो. वर्षभर या भूमिकेसाठी मी मेहनत घेतली असून चित्रपटातील माझा अंदाज प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असा विश्वास अभिनेता ललित प्रभाकर ने व्यक्त केला.
येत्या १७ फेब्रुवारीला 'टर्री' चित्रपट प्रदर्शित होणार असून चित्रपटाचे वितरण पॅनोरमा स्टुडिओ करणार आहे.
दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा ‘गुरुकुल’ पुरस्काराने सन्मान
‘शिवराय अष्टक’ जगणाऱ्या साकारणाऱ्या कलाकार, तंत्रज्ञ आणि संपूर्ण युनिटबरोबर चित्रीकरण स्थळी ‘गुरुकुल’ पुरस्काराने दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना हा दुर्मिळातील दुर्मिळ योग असल्याचे प्रतिपादन चित्रपटसृष्टीचे पितामह ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी केले. आद्य संगीताचार्य बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांच्या घराण्याचा आशीर्वाद म्हणून विश्वरूप कन्सेप्ट डेव्हलपर्स आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटतर्फे श्री राजदत्त यांच्या हस्ते हा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.
मावळातील कुसगाव येथील पीबीए फिल्मसिटीत शूटिंग दरम्यान हा सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी दिग्पाल लांजेकर यांचे गुरु ज्येष्ठ लोकशाहीर दादा पासलकर, दिग्पाल यांच्या मातोश्री सुनीता लांजेकर , ज्येष्ठ रंगकर्मी सुहास भोळे , अभिनेते चिन्मय मांडलेकर, अजय पूरकर, मिलिंद कांबळे, संकलक भक्ती मायाळू, योगेश फुलफगर आणि युनिटचे तंत्रज्ञ, कलाकार उपस्थित होते. प्रस्तावना व सूत्रसंचालन माध्यमकर्मी गिरीश केमकर यांनी केले तर मानपत्राचे वाचन अमृता धायरकर यांनी केले.
‘शिवराय अष्टका’चे शिवधनुष्य दिग्पाल लांजेकर यांच्या लेखणीतून आणि दिग्दर्शनातून समर्थपणे पेलले आहे. ‘आज नव्वदीत त्यांनी दिलेली भूमिका मोठ्या आनंदाने मी पार पाडत आहे, असे मनोगत राजदत्त यांनी व्यक्त केले. वेगवेगळी आव्हाने, अनेक अडचणीतून मार्ग काढताना माझ्यासह संपूर्ण युनिटलाच या ‘गुरुकुल’ पुरस्काराने मोठी उमेद, ऊर्जा मिळेल असं मनोगत दिग्पाल लांजेकर यांनी याप्रसंगी मांडलं. मुळात कुणीतरी कोणाच्यातरी भावनांचा आदर करत नाही म्हणून वाद निर्माण होतात. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्राचे सर्वोच्च दैवत आहे. आठ ते ऐंशी अशा सर्वच वयोगटातील प्रत्येकाच्या भावना संवेदना शिवचरित्राशी निगडीत आहेत. या भावनांना कुठेही धक्का लागणार नाही याची काळजी घेतल्याने ‘शिवराय अष्टक’ कोणताही वाद न होता पूर्णत्वास गेले आहे. दिग्पालचे यश हे उत्तम सांघिक कार्यात आहे. हे कोणा एकाचे कामच नाही, अशी भावना श्रीमती सुनीता लांजेकर यांनी व्यक्त केली.
लोकमान्य’ मालिकेतील कलाकारांनी साधला शालेय विद्यार्थ्यांशी संवाद
पुणे : झी मराठी या वाहिनीवरील लोकमान्य ही नवी ऐतिहासिक चरित्रगाथा... या मालिकेचा भव्य प्रीमियर सोहळा पुण्यात लोकमान्य टिळकांच्या केसरीवाड्यात पार पडला.
यावेळी क्षितीश...
