Feature Slider

पशुपक्षी यांचा जीव वाचविण्यासाठी सर्वांचे योगदान महत्त्वाचे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई, दि. 30 : निसर्गचक्रात पृथ्वीवरील सर्व सजीवांची काळजी घेतली तरच मानवी जीवन सुखी होवू शकते, यासाठी  पशुपक्षी यांचा जीव वाचविण्यासाठी सर्वांचे योगदान महत्वाचे असल्याचे प्रतिपादन राज्यपाल...

शिवसेना युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी घेतले श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन 

श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग तर्फे स्वागत व सन्मान पुणे :  शिवसेना युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी सायंकाळी सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेत आरती केली. यावेळी मंदिरातील श्री महासरस्वती आणि श्री महाकाली देवीचे दर्शन घेण्यासोबतच ट्रस्टतर्फे राबविण्यात येणा-या विविध उपक्रमांची माहितीही जाणून घेतली. श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित नवरात्र उत्सवात आदित्य ठाकरे यांचे स्वागत व सन्मान श्री महालक्ष्मी देवीची प्रतिमा व महावस्त्र देऊन करण्यात आला. यावेळी मंदिराचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, हेमंत अर्नाळकर, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल, प्रविण चोरबेले आदी उपस्थित होते. आदित्य ठाकरे म्हणाले, कोविडनंतर गणपती बाप्पाचे दर्शन घेण्याकरिता देखील मी पुण्यात आली होतो. त्याचप्रमाणे आज नवरात्रीमध्ये देवीचे दर्शन घेण्याकरिता आलो आहे. सगळीकडे प्रसन्न वातावरण आहे, लोक सगळीकडे फिरत आहेत. त्यामुळे चांगले वातावरण आहे. देवीसमोर मी नेहमी हात जोडून नमस्कार करतो आणि आशिर्वाद घेतो. त्याप्रमाणे आजही आशिर्वाद घेत आहे. प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल म्हणाल्या, उत्सवांतर्गत श्री सुक्त अभिषेक, श्री विष्णु सहस्त्रनाम पाठ, महालक्ष्मी महायाग, महाआरती असे धार्मिक कार्यक्रम दररोज सुरु आहेत. याशिवाय कन्यापूजन, भोंडला, नारी तू नारायणी सन्मान सोहळा, शालेय विद्यार्थी संगीत स्पर्धा, विविध कलाकारांतर्फे गरबा नृत्य असे कार्यक्रम देखील होणार आहेत. ट्रस्टच्या वेबसाईट, फेसबुक पेजच्या माध्यमातून देखील जगभरातील देवी भक्त उत्सवाचा आनंद घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

ढगांच्या गडगडाटांसहित जोरदार हजेरी ;महापालिकेच्या कामाचा पुन्हा पुन्हा पंचनामा ;रस्त्यांना नद्यांचे स्वरूप

पुणे- सकाळ पासून पडलेले उन , आणि वाढलेला उष्मा यामुळे आज सायंकाळी 'तो' बरसेल याची जाणीव अनेकांना झाली होतीच आणि तो आला...

पेपरफ्रायने महाराष्ट्रात पुण्यामध्ये नवा स्टुडिओ सुरु केला

पेपरफ्राय पश्चिम भारतामध्ये अनेक वेगवेगळ्या चॅनेल्समध्ये आपले स्थान मजबूत करत आहे पुणे- सप्टेंबर 30,२०२२: ई-कॉमर्समार्फत फर्निचर आणि इतर घरगुती वस्तूंची विक्री करणारी कंपनी पेपरफ्रायने महाराष्ट्रातील पुण्यामध्ये...

गडकरींकडून चांदणी चौकाची हवाई पाहणी

पुणे दि.३०-केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज दुपारी एनडीए चौक (चांदणी चौक) येथील उड्डाणपूल कामाची आणि पुणे-सातारा महामार्गाची हवाई पाहणी...

Popular