Feature Slider

लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिरात ‘तिरंगी’ सजावट

स्वातंत्र्यदिन, श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि संत ज्ञानेश्वर महाराज ७५० व्या जयंतीनिमित्त प्रतिकृती व पुष्पसजावटपुणे : श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या वतीने स्वातंत्र्यदिन, श्रीकृष्ण जन्माष्टमी...

स्वातंत्र्यदिनादिवशीच स्वातंत्र्यावर घाला:कुणी काय खावे सरकारने ठरवू नये- राज ठाकरे

मुंबई-मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त मांसविक्री बंदीच्या निर्णयावरून राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. "मांसविक्री बंदीसारखे निर्णय घेण्याचा अधिकार सरकार किंवा महापालिकेला नाही,"...

स्वातंत्र्यदिन ‘सौरग्राम दिन’ म्हणून होणार साजरा

ग्रामसभा, रोड शो, चित्ररथ आदींद्वारे सूर्यघर योजनेची जनजागृती पुणे, दि. १४ ऑगस्ट, २०२५ :- पुणे जिल्ह्यातील १९१९५ हजार वीज ग्राहकांनी ‘पंतप्रधान सूर्यघर-मोफत वीज योजने’चा लाभ घेतला असून, ही योजना प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महावितरणने आता स्वातंत्रदिन ‘सौरग्राम दिन’ म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे. या दिवशी महावितरणचे अभियंते-कर्मचारी प्रत्येक गावात ग्रामसभा व विविध कार्यक्रम घेऊन वीजग्राहकांना या योजनेसाठी प्रोत्साहित करणार आहेत. देशातील प्रत्येक नागरिकाला विजेच्या बाबतीत स्वावलंबी बनविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पंतप्रधान सूर्यघर- मोफत वीज योजना’ सुरु केली आहे. स्वत:च्या घराच्या छतावर वीज तयार करुन तिचा वापर करणे हा त्याच्या मागील उद्देश आहे. या योजनेच्या अनुदानासाठी केंद्राने  ७५ हजार कोटींची तरतूद केली आहे. राज्यात महावितरणने १००० मेगावॅट वीज क्षमतेचा टप्पा ओलांडला आहे. पुणे जिल्ह्यात १९१९५ ग्राहकांनी छतावर सौरप्रकल्प साकारले आहेत. त्याची स्थापित क्षमता ८९ मेगावॅट इतकी आहे. छतावर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविण्यासाठी केंद्र सरकारकडून ग्राहकांना थेट अनुदान मिळते. एक किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पाला तीस हजार रुपये, दोन किलोवॅटला साठ हजार रुपये तर तीन किलोवॅटला ७८ हजार रुपये अनुदान मिळते. गृहनिर्माण संस्थांनाही पाचशे किलोवॅटपर्यंत प्रती किलोवॅट १८ हजार रुपये अनुदान मिळते. छतावर बसविलेल्या सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्पातून पुढे २५ वर्षे वीजनिर्मिती होते. या वीजनिर्मितीमुळे ग्राहकाची घरगुती गरज पूर्ण होते व अतिरिक्त वीज महावितरणला विकता येते. ही योजना घरांघरात पोहोचविण्यासाठी स्वातंत्रदिनी ग्रामसभा, रॅली, रोड शो आयोजित करुन सूर्यघर योजनेचे प्रसिद्धीपत्रके वाटून ग्राहकांना त्याचे महत्व पटवून देण्याचे काम केले जाणार आहे. पुणे शहरातील गृहनिर्माण संस्थामध्येही कार्यक्रम आयोजित करुन सूर्यघर योजनेची माहिती दिली जात असून, अनेक गृहनिर्माण संस्थांमध्ये महावितरणने मोठ्या प्रमाणात मेळावे देखील घेतले असल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले. 

तुम्ही करा नाही तर आम्ही सकाळी ७ वाजताच सुरु करू विसर्जन मिरवणूक

लक्ष्मी रस्त्यावरील विसर्जन मिरवणूक कोणीही अडवून ठेऊ नये. पुणे- पुणे -बडी मंडळे उशिरा मिरवणूक सुरु करतात आणि दिवसभर रस्त्यावर राहतात आणि मग त्यांच्या नंतर...

किश्तवाडमध्ये ढग फुटी, चशोटी गावात धार्मिक यात्रेसाठी जमलेले अनेकजण वाहून गेले; रेस्क्यू ऑपरेशन सुरू

https://twitter.com/radionews_jammu/status/1955908348718551317 जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवार जिल्ह्यातील पद्दार उपविभागात गुरुवारी दुपारी १२:३० वाजता ढगफुटी झाली. त्यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, आतापर्यंत १० जणांचा मृत्यू...

Popular