Feature Slider

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यात मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा

मुंबई दि 19 : राज्यात अनेक ठिकाणी होत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात राज्यातील मुसळधार...

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांना धमकी देणाऱ्या कीर्तनकारावर कारवाई करा-माजी आमदार मोहन जोशी

पुणे : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना धमकी देणाऱ्या कीर्तनकारावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी...

खडकवासल्यातून 35 हजार क्युसेक्सचा विसर्ग सुरु, मुठा नदी किनारी सावधानतेचा इशारा

खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 29084क्युसेक वाढवून सायंकाळी 7.00 वा.35310 क्यूसेक करण्यात आला आहे. पुणे- आज सकाळपासून दुपार पर्यंत झालेल्या जोरदार...

पुणे महापालिकेच्या कंत्राटी कामगारांना बोनस मिळणार

इगल या सुरक्षारक्षक कंपनी काळ्या यादीत,पुन्हा त्यांना काम देणार नाही पुणे l महापालिकेमध्ये सुमारे साडेदहा हजार कंत्राटी कामगार विविध खात्यांमध्ये अनेक वर्षांपासून काम करीत असून या सर्वांना बोनस ऍक्ट प्रमाणे बोनस मिळावा,पगारी रजा मिळाव्यात,15 ऑगस्ट,26 जानेवारी,1 मे आणि 2 ऑक्टोबर या राष्ट्रीय सणांच्या सुट्ट्या कायद्याप्रमाणे याचा लाभ मिळावा अशा मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होत्या.राष्ट्रीय मजदूर संघाकडून या सर्व कर्मचाऱ्यांना संघटित करून गेली 6 वर्ष वेळो वेळी विविध प्रकारची आंदलने महापालिकेच्या गेटवर करण्यात आलेली होती.परंतु फक्त आश्वासनावरच मनपा अधिकाऱ्यांनी बोळवण करून हे सर्व प्रश्न प्रलंबित ठेवले होते.या सर्व प्रश्नांच्या संदर्भामध्ये मागील आठवड्यामध्ये संघटनेतर्फे कंत्राटी कामगारांचा मोर्चा स्वारगेट येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळ्यापासून ते पुणे महानगरपालिकेच्या गेट पर्यंत काढण्यात आला होता.त्यावेळेला महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांना राष्ट्रीय मजदूर संघटनेकडून निवेदन देऊन बैठक आयोजन करण्याबाबत विनंती करण्यात आली होती.त्याप्रमाणे आज दिनांक 19 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी पावणेअकरा वाजता महापालिकेच्या सभागृहात महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली.या बैठकीसाठी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त दिवटे,कामगार सल्लागार नितीन केंजळे,सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ.मनीषा नाईक,उद्यान विभागाचे अधिकारी अशोक घोरपडे व इतरही विभागाचे अधिकारी उपस्थित होते.या बैठकीसाठी महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाचे सहाय्यक कामगार आयुक्त गजानन शिंदे हे उपस्थित होते.राष्ट्रीय मजूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे,उपाध्यक्ष सिताराम चव्हाण,संघटक विशाल बागुल,प्रतिनिधी बाबा कांबळे,विजय पांडव,अरविंद आगम,संदीप पाटोळे, उज्वल साने,लक्ष्मण मासाळ हे कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.या बैठकीमध्ये आयुक्तांसमोर कंत्राटी कामगारांना कायदा प्रमाणे बोनस देय असून महापालिका मात्र कंत्राटदारांना बोनसचे पैसे देत नसल्यामुळे कंत्राटदार बोनस देत नाही अशा प्रकारची मागणी संघटनेतर्फे मांडण्यात आली.त्यास सहाय्यक कामगार अधिकारी गजानन शिंदे यांनी कंत्राटी कामगारांना कायद्याप्रमाणे बोनस देय असून त्यांना बोनस दिला पाहिजे अशी बाजू मांडली.त्याचबरोबर या सर्व कामगारांना राष्ट्रीय सणांच्या सुट्ट्या यादेखील कायद्याप्रमाणे देय असून त्याचा कायद्याप्रमाणे लाभ या कंत्राटी कामगारांना दिला गेला पाहिजे व वार्षिक रजा ही पगारी राजा कामगारांना दिल्या पाहिजेत अशी कामगारांची बाजू व सरकारची कामगार विभागाची बाजू या बैठकीत मांडली. त्यानुसार आजच्या बैठकीमध्ये खालील प्रमाणे निर्णय झाले.यावर्षीपासून दिवाळीपूर्वीया सर्व कामगारांना पगाराच्या 8.33% म्हणजे जवळजवळ एक पगार दरवर्षी बोनस देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला राष्ट्रीय सणांच्या सुट्ट्या चा लाभ कायद्याप्रमाणे देण्याचा निर्णयही झाला व वार्षिक पगारी रजा देण्याचा निर्णयही या बैठकीत झाला ठेकेदार बदलला तरी कामगार बदलू नये अशी संघटनेच्या भूमिकेला आयुक्तांनी तत्वतः मान्यता दिली व त्यामध्ये होत असलेल्या हेराफेरीलाही पायबंध घालण्यासाठी उपाययोजना करण्यात येईल असे आश्वासन दिले. काही सुरक्षा विभागातील कर्मचाऱ्यांनी सलग पाच महिने काम करूनही पगार दिला गेलेला नव्हता अशा सर्व कर्मचाऱ्यांचे फाईल तपासून त्यांना तात्काळ पगार देण्याबाबतचे आदेश काढण्यात येतील असेही सांगितले.सर्व कर्मचाऱ्यांना महिन्याला पगार स्लिप देण्याबाबत व सर्व कंत्राटी कामगारांना वेळेवर पगार देण्याबाबत योग्य उचित आदेश आयुक्तांनी दिले.इएसआयसी कार्ड ज्या ज्या कामगारांना आवश्यक आहे त्या सर्व कामगारांना देण्याचा निर्णयही या बैठकीत झाला.त्याचबरोबर कंत्राटी कामगारांच्या पगारातून विनाकारण कपात करण्यात येते अशी कोणतीही बेकायदेशीर कपात करण्यात येऊ नयेत अशा सक्त सूचना या बैठकीत आयुक्तांनी दिल्या.कंत्राटी  कामगारांना वेळोवेळी विविध विभागात काम करत असताना सुरक्षा विषय कोणती साधने देण्यात येत नाहीत या गोष्टीकडे कामगार नेते सुनील शिंदे  यांनी लक्ष वेधले असता या सर्व कर्मचाऱ्यांना आवश्यक ते सर्व सुरक्षा साधने देण्याबाबतचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.राष्ट्रीय स्वास्थ अभियान अंतर्गत काम करणारे नर्सेस, डॉक्टर्स,डेटा एन्ट्री ऑपरेटर्स व इतर कर्मचारी यांचे वेतन शासनाकडून येण्यास बऱ्याचदा विलंब होतो अशाप्रसंगी कोणताही विलंब न करता महानगरपालिकेच्या कोषातून या सर्व कर्मचाऱ्यांचे पगार करण्याबाबत आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील असे त्यांनी सांगितले.त्याचबरोबर राष्ट्रीय स्वास्थ अभियान अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने दिलेल्या परिपत्रकाप्रमाणे रजा वेतन अनुषंगित सर्व फायदे देण्याबाबतचे परिपत्रक तात्काळ काढण्यात येईल व त्यांनाही त्याचे फायदे देण्यात येतील त्याचप्रमाणे कंत्राटी कामगारांना वेळवर पगार न देणारे...

मान्सूनच्या पार्श्वभूमीवर सर्व संबधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे, दि. 19: जिल्ह्यात धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे बाधित होणारे पुरग्रस्त भाग तसेच दरडप्रवण भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थालंतर करावे, मान्सूनच्या पार्श्वभूमीवर सर्व संबधित यंत्रणांनी...

Popular