Feature Slider

अभियंत्याने व्यापक, सर्वसमावेशक व बहुशाखीय दृष्टीकोन अंगीकारायला हवा-डॉ. रघुनाथ माशेलकर

पुणे विद्यार्थी गृहाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात 'ईव्ही' टेस्टिंग लॅब व रोबोटिक्स-ऑटोमेशन लॅबचे उद्घाटन पुणे : "आजच्या युगात अभियांत्रिकी अनेक शाखांबरोबर जोडले गेले आहे. त्यामुळे अभियंत्यांनी व्यापक, सर्वसमावेशक आणि बहुशाखीय दृष्टीकोन अंगिकारायला हवा. आपल्या कामाचा जगाला, देशाला आणि समाजाला कसा फायदा होईल, तसेच किमान साधन सामुग्रीमध्ये कमाल उत्पादन कसे देता येईल यावर अभियंत्यांनी लक्ष केंद्रीत करावे ," असा कानमंत्र ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी दिला. पुणे विद्यार्थी गृहाच्या अभियांत्रिकी, तंत्रज्ञान व व्यवस्थापन महाविद्यालयामध्ये इलेक्ट्रिक व्हेईकल टेस्टिंग आणि रोबोटिक्स-ऑटोमेशन लॅबचे उद्घाटन डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते नुकतेच झाले. प्रसंगी वैशाली माशेलकर, पुणे विद्यार्थी गृहाचे कार्याध्यक्ष सुनील रेडेकर, कार्यवाह प्रा. राजेंद्र कांबळे, उपकार्याध्यक्ष सुभाष जिर्गे, खजिनदार आनंद कुलकर्णी, कुलसचिव अमोल जोशी, संचालक प्रा. राजेंद्र कडुसकर, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. मनोज तारांबळे आदी उपस्थित होते. एआयसीटीई-मॉडरोब योजनेच्या मदतीने, तसेच संस्थेच्या वतीने बावीस लाख रुपयांच्या खर्चातून ही प्रयोगशाळा विकसित केली आहे. ईव्ही तंत्रज्ञानातील सध्याचा ट्रेंड पाहता, विद्यार्थीभिमुख शिक्षणासाठी अत्याधुनिक सुविधांची पूर्तता करण्यासाठी ही लॅब उपयुक्त ठरेल. अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम आणि उद्योगाच्या गरजा यांच्यातील अंतर भरून काढण्यासाठी, अभियांत्रिकी महाविद्यालय पुणेच्या (सीओईपी) सहकार्याने रोबोटिक्स आणि ऑटोमेशन प्रयोगशाळा विकसित केली आहे, हे आनंददायी चित्र आहे, असे डॉ. माशेलकर यांनी नमूद केले. तत्पूर्वी, डॉ. रघुनाथ व वैशाली माशेलकर यांनी संस्थेच्या सदाशिव पेठेतील मुख्यालयाला भेट कुलगुरू कै. विष्णू गंगाधर ऊर्फ दादासाहेब केतकर यांच्या ७२ व्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली. आश्रम वसतिगृहातील विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. डॉ. माशेलकर यांनी त्यांच्या बालपणी प्रतिकुल परिस्थितीमध्ये कशाप्रकारे अभ्यास केला याची माहिती देताना आयुष्यातील पहिला गुरु म्हणून स्वतःच्या आईचा उल्लेख केला. -------------------------- उद्योगांचा सहयोग महत्वाचा प्रयोगशाळांच्या उभारणीत नामांकित कंपन्यांनी भरीव आर्थिक व तांत्रिक मदत केली आहे. त्यात प्रामुख्याने डसॉल्ट सिस्टीम, थिसेनक्रुप, एसएपीएल, एस.सिग्मा, नयन मेकॅट्रॉनिक्स, लेजर अ‍ॅटोमेशन आणि हॉरिझॉन अ‍ॅटोमेशन यांचा सहभाग आहे. औद्योगिक गरजा लक्षात घेऊन अत्याधुनिक, विद्यार्थी केंद्रित मॉड्यूलर अभ्यासक्रम, संशोधन व प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेतले जाणार आहेत. समाजोपयोगी, शेतीसाठी रोबोट प्रणाली, सांडपाणी निचरा अनुप्रयोग, संगणक दृष्टी प्रणालीसह इतर कामांसाठी रोबो वापरण्याचे प्रयोजन आहे. - सुनील रेडेकर, कार्याध्यक्ष, पुणे विद्यार्थी गृह

स्वमग्न (ऑटिस्टिक) बालकांच्या शिक्षणासाठी समाजाने पुढे यावे :डॉ दिनेश डोके

पुणे :'इनोसंट टाईम्स स्कुल 'आणि ' अर्ली इंटरव्हेंन्शन सेंटर फॉर चिल्ड्रन विथ स्पेशल नीडस् '  च्या नवीन शैक्षणिक सुविधा केंद्राचे उदघाटन राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागाचे अतिरिक्त...

अध्यापनाला आधुनिकतेची, संशोधनाची जोड द्यावी-डॉ. मनोहर चासकर 

ट्रिनिटी महाविद्यालयात फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅमपुणे : "एकविसावे शतक हे विज्ञान-तंत्रज्ञानाचे आहे. शिक्षकांनी अध्यापनाला आधुनिकता, तंत्रज्ञान आणि संशोधनाची जोड दिली, तर अध्यापन आणखी प्रभावी होईल....

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत

पुणे, दि. 8- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा- 2022 आज राज्यातील 37 जिल्हा केंद्रांवर सुरळीत पार पडली. पुण्यातील...

रात्रीचे आठ… अन् मंत्रालयात आलेल्या सामान्य माणसाला भेटण्याची मुख्यमंत्र्यांची तळमळ!

मुंबई, दि. ८: मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर अभ्यागतांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सामान्य नागरिकाला आस असते ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

Popular