मुंबई, दि. ३ मे २०२३ : महावितरणचे संचालक (वाणिज्य) म्हणून श्री. योगेश गडकरी यांची सरळसेवा भरतीद्वारे निवड झाली आहे. आज त्यांनी संचालक (वाणिज्य) या पदाचा पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी श्री. योगेश गडकरी हे कार्यकारी संचालक (देयके व महसूल) म्हणून कार्यरत होते.
नागपूर येथील मूळचे रहिवासी असलेले श्री. योगेश गडकरी यांनी अमरावती येथून अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी.ई. (कॉम्पूटर इंजिनिअरिंग) केले आहे. एप्रिल १९९४ मध्ये तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात कनिष्ठ अभियंता म्हणून वर्धा येथे रुजू झाले. त्यांनी मुंबई मुख्यालयात विविध पदावर काम केले आहे. त्यांची पदोन्नती्द्वारे कार्यकारी संचालक (देयके व महसूल) या पदावर नियुक्ती करण्यात आली.
श्री. गडकरी यांचा वीज क्षेत्रातील अतिशय अभ्यासू अधिकारी म्हणून लौकीक आहे. तसेच त्यांनी महावितरणच्या केंद्रीय बिलींग प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणले असून त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारी कमी झाल्या असून महावितरणच्या महसुलात वाढ झाली आहेत.
पुणे दि. ३: राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ. पी. पी. वावा यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात आयोजित बैठकीत सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत विविध विभागांकडील कार्यवाहीचा आढावा...
एमआयटी डब्ल्यूपीयूत दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म स्कूलचे उद्घाटन
पुणे, दि.३ मे: “ अभिनय शिकविला जाऊ शकत नाही तर तो आतून यावा लागतो. पुस्तकांपेक्षा रोज भेटणार्या...
पुणे, 3 मे 2023
पुण्यातील खडकी येथील लष्करी रुग्णालयात, पाठीच्या कण्याला झालेल्या दुखापतींवर उपचार करणारे सर्वात मोठे केंद्र आहे. पाठीच्या कण्याला दुखापत झालेल्या पॅराप्लेजिक आणि टेट्राप्लेजिक सैनिकांना सेवा देणारे...
मुंबई, 3 मे 2023
प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन उद्योग यांना जागतिक दर्जा गाठता यावा यासाठी, सरकारला त्यांचा प्रोत्साहक आणि पाठिराखा व्हायला आवडेल. भारतातील प्रसार माध्यमे आणि मनोरंजन...