Feature Slider

 रेणुका शहाणे आणि अमेय वाघ’कोण होणार करोडपती’च्या मंचावर…

       जनसामान्यांचा  लोकप्रिय  कार्यक्रम म्हणजे 'कोण होणार करोडपती'. सचिन खेडेकर यांचं सूत्रसंचालन हे या  कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य. या आठवड्यात ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाच्या शनिवारच्या ‘विशेष भागात' रेणुका शहाणे आणि पुण्याचा अमेय वाघ हे हॉट सीटवर येणार आहेत. रेणुका शहाणे आणि अमेय वाघ 'कोण होणार करोडपती'चा खेळ मुक्तांगण मित्रसाठी खेळणार आहेत.  मुक्तांगण मित्र या फाउंडेशनसाठी ते 'कोण होणार करोडपती'चा खेळ खेळणार आहेत. या पर्वातील हा विशेष भाग असणार आहे आणि या भागात रेणुका शहाणे यांच्याशी आणि  अमेय वाघशी गप्पा रंगणार आहेत.                                रेणुका शहाणे आणि अमेय वाघ हे 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर व्यक्त झाले. सचिन खेडेकरांबरोबर त्यांच्या गप्पा रंगल्या. त्यांनी याआधी फार सुंदर अशा कलाकृतींमध्ये एकत्र काम केले आहे. अमेय वाघ आणि सचिन खेडेकर यांचा गाजलेला चित्रपट मुरंबा. मुरंबा चित्रपटाशी निगडित  आठवणी या वेळी त्यांनी व्यक्त केल्या. रेणुका शहाणे आणि सचिन खेडेकर यांनी सैलाब या हिंदी मालिकेत एकत्र काम केले होते. त्याच्या आठवणी आज 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. यामागचं विशेष कारण म्हणजे रेणुका शहाणे आणि सचिन खेडेकर यांना सैलाब मालिकेचे दिग्दर्शक रवी राय हे व्हिडिओ कॉलद्वारे  भेटले. त्या वेळी मालिकेच्या जुन्या आठवणी  मंचावर ताज्या झाल्या.  रेणुका शहाणे आणि अमेय वाघ हे 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर मुक्तांगण मित्र या फाउंडेशनसाठी खेळणार आहेत. मंचावर चर्चा रंगली रेणुका शहाणे आणि अमेय वाघ यांच्या जोडीदारांची. अमेय आणि साजिरी यांची पहिली भेट ते लग्न असा आत्तापर्यंतचा प्रवास त्याने या मंचावर सांगितला. रेणुका शहाणे आणि आशुतोष राणा यांच्या भेटीचा किस्सा त्यांनी  सांगितला.                         आता मुक्तांगण मित्रसाठी खेळताना 'कोण होणार करोडपाती'च्या खेळात रेणुका शहाणे आणि अमेय वाघ  किती रक्कत जिंकतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.,'कोण होणार करोडपती' चा हा भाग - , ८ जुलै, शनिवारी रात्री ९ वाजता, सोनी मराठी वाहिनीवर प्रक्षेपित होणार आहे. -Sharad Lonkar

500 चौ.फुटाच्या घराला करमाफीसाठी आग्रही राहणार -दीपक मानकर

पुणे- अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदावर निवड झाल्यानंतर आज दीपक मानकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून , श्रीमंत दगडूशेठ...

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का:विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे एकनाथ शिंदे यांच्या सेनेत

मुंबई- उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती तसेच ठाकरे गटाच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या...

विद्यापीठांनी परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करावेत – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई:  विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला अडचणी येऊ नयेत म्हणून सर्व अकृषी विद्यापीठांनी परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करावेत, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री...

बारावी विज्ञान शाखेचे विद्यार्थी होणार आयटी प्रोफेशनल,टेक-बी प्रोग्रामसाठी ३८ हजारांहून अधिक नोंदणी

मुंबई : आयटी क्षेत्रात जगभरात अग्रगण्य असणाऱ्या ‘एचसीएल टेक’ कंपनीसोबत महाराष्ट्र समग्र शिक्षा मार्फत सामंजस्य करार करण्यात आला आहे. याअंतर्गत राज्य शासनातर्फे ‘महाराष्ट्र यंग...

Popular