Feature Slider

आवाज चांदण्याचे‌’मधून अनुभवली गीतांची सुरेल सफर

कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणेतर्फे कोजागिरीनिमित्त विशेष कार्यक्रम पुणे : मने उजळून टाकणाऱ्या, जगण्याशी, आठवणींशी जोडल्या गेलेल्या गीतांची सुरेल सफर रसिकांना अनुभवायला मिळाली.निमित्त होते, कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणेतर्फे कोजागिरीनिमित्त आयोजित ‌‘आवाज चांदण्याचे‌’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे. कवी कुसुमाग्रज, सुप्रसिद्ध कवयत्री शांता शेळके, गझलकार सुरेश भट आदींनी चंद्र आणि चांदण्यांवर रचलेली गीते तसेच हिंदी चित्रपट सृष्टीतील सुवर्णकाळ समजल्या जाणाऱ्या विविध गीतांचा नजराणा रसिकांनी अनुभवला. पुण्याई सभागृह, पौड रोड येथे गुरुवारी (दि. 9) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीस राणी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणेच्या अध्यक्षा मुक्ता चांदोरकर, उपाध्यक्ष गिरीश शेवडे, कोषाध्यक्ष गणेश गुर्जर यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविकात मुक्ता चांदोरकर यांनी कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणेच्या कार्याची माहिती देऊन सामाजिक बांधिलकीच्या जपणुकीतून शिक्षण आणि आरोग्यविषयक राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांविषयी अवगत केले. ‌‘चांदण्यात फिरताना‌’, ‌‘ही वाट दूर जाते‌’, ‌‘केव्हा तरी पहाटे‌’, ‌‘नवीन आज चंद्रमा‌’, ‌‘मलमली तारुण्य माझे‌’, ‌‘हे सुरांनो चंद्र व्हा‌’, ‌‘बुगडी माझी सांडली ग‌’, ‌‘शुक्रतारा मंद वारा‌’ आदी मराठी लोकप्रिय गीतांसह ‌‘पियो तोसे नैना लागे रे‌’, ‌‘मैने तेरे लिए ही सात रंग के‌’, ‌‘मधुबन मे राधिका‌’ आदी सुप्रसिद्ध हिंदी गीते श्रुती देवस्थळी व संजीव मेहेंदळे यांनी सादर करून रसिकांना जादुई सुरांची सफर घडविली. रसिकांनीही अनेक गाण्यांना वन्स मोअरची मागणी करत टाळ्यांच्या गजरात तसेच गायकांच्या सुरात सूर मिसळत साथ केली. कलाकारांना प्रसन्न बाम (संवादिनी), अमित कुंटे (तबला), अभय इंगळे (ऑक्टापॅड) यांनी समर्पक साथसंगत केली तर या श्रुतीमधुर गीतांचे शब्दसमृद्ध निवेदन स्नेहल दामले यांनी केले. संस्थेच्या विश्वस्त डॉ. राजश्री महाजनी यांनी ‌‘रे हिंद बांधवा थांब या स्थळी‌’ हे राणी लक्ष्मीबाई यांच्यावरील गौरवगीत सादर केले. आभार गणेश गुर्जर यांनी मानले. कलाकारांचा सत्कार मुक्ता चांदोरकर, हरीभाऊ मुणगेकर, गणेश गुर्जर, विकास उमराणीकर, गिरीश शेवडे, निर्भय हर्डिकर यांनी केला. पूरग्रस्तांसाठी सव्वा तीन लाखांची मदत जाहीर.. महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीने ग्रस्त बांधवांना कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणे आणि सभासदांतर्फे सव्वा तीन लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात येणार असल्याची घोषणा कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणेच्या अध्यक्षा मुक्ता चांदोरकर यांनी केली. ही मदत जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.

घायवळला पासपोर्ट मविआ नेत्याचीच होणार चौकशी _CM फडणवीस

पुणे-येथील माजी आमदार रवी धंगेकर यांच्या वक्तव्यांमुळे कुख्यात गुंड निलेश घायवळ आणि त्याचा भाऊ सचिन घायवळ प्रकरण राज्यात गाजत असताना धंगेकर यांच्याबाबत मी...

30 दिवसात मोजणी होणार, राज्यात खासगी भूमापक येणार, चंद्रशेखर बावनकुळेंची ऐतिहासिक घोषणा

पुणे- राज्यात मोठ्या प्रमाणावर खरेदी खत होतात. पोट हिस्से होतात. गुंठेवारी कायद्यानं घरं कायदेशीर होतात. फ्लॅट बनत आहेत, मोठं मोठे लेआऊट पडत आहेत....

जिल्हा परिषद शाळा जालिंदरनगर आणि वाबळेवाडीच्या शैक्षणिक पॅटर्नची राज्यात अंमलबजावणी करणार-शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे.

जिल्हा परिषद प्राथमिक जालिंदरनगर येथे 'सृजन' (न्यु एज टेक्नॉलॉजी स्किल सेंटर) चे उद्घाटन राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय वारे यांचा सन्मान पुणे, दि.११ : जिल्हा...

१९२ फटका स्टॉलपैकी १२५ स्टॉलच गेले ..तर ६७ स्टॉल्सला शून्य प्रतिसाद

पुणे : दिवाळी सणाच्या निमित्ताने महापालिकेने शहरातील १३ वेगवेगळ्या ठिकाणी १९२ फटाक्यांच्या स्टॉलसाठी ऑनलाइन लिलाव केले. शनिवार पेठ रिव्हरसाईड, कोंढवा खुर्द (अग्निशमन केंद्र),...

Popular