मुंबई : आज, दिनांक 14 ऑक्टोबर 2025, मंगळवार रोजी वसई-विरार जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले जिल्हास्तरीय निवासी प्रशिक्षण शिबिर अतिशय उत्साहात संपन्न...
मुंबईसह नागपूर, औरंगाबाद खंडपीठाकरिता आवश्यक मनुष्यबळ
मुंबई-मुंबई उच्च न्यायालय, नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठाकरिता नव्याने २ हजार २२८ पदांची निर्मिती करण्यास करण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता...
कोणत्याही यशस्वी डॉक्टरची ओळख केवळ त्याच्या कौशल्यातून होत नाही तर त्याच्या रूग्णांच्या कथा आणि व्यथांमधून होत असते. कुठल्या तरी आजारापायी जेव्हा एखाद्या रूग्णाचा जीव...
पुणे : मराठी साहित्याच्या क्षेत्रात दिवाळी अंकांचे योगदान मोठे आहे. सर्जनशील लेखक तयार करणारी प्रयोगशाळा म्हणून दिवाळी अंकांचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले. समाजजीवनातून वैचारिकता हरवत चाललेल्या काळात दिवाळी अंकांमध्ये आजही वैचारिक मोकळेपण दिसून येते असेही त्यांनी गौरवाने नमूद केले.
उत्कर्ष प्रकाशनच्या उत्कर्ष या पहिल्या दिवाळी अंकाचे प्रकाशन आज (दि. 13) प्रा. जोशी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ संपादक विजय कुवळेकर, ज्येष्ठ साहित्यिका मंगला गोडबोले, प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ, प्रसिद्ध चित्रकार रवी मुकुल, कवी, लेखक स्वप्नील पोरे, उत्कर्ष प्रकाशनचे सु. वा. जोशी, दिवाळी अंकाच्या संपादिका निलीमा जोशी-वाडेकर मंचावर होते. सावरकर सभागृह, कर्वे रोड येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दिवाळी अंकांनी लेखनातील अनेक प्रवाह स्वीकारले. कालांतराने त्या-त्या प्रवाहांचे दिवाळी अंक प्रसिद्ध होऊ लागले, असे सांगून प्रा. मिलिंद जोशी पुढे म्हणाले, दिवाळी अंकांनी संपादक, लेखक, चित्रकार यांच्यासाठी जसे पोषक वातावरण निर्माण केले त्याच प्रमाणे त्यांना प्रतिष्ठाही मिळवून दिली. जागतिकीकरणानंतर झालेल्या स्थित्यंतरामुळे दिवाळी अंकांनी इतर ज्ञानशाखांचाही विचार केला. त्याच-त्याच लेखकांमुळे काही दिवाळी अंकांमध्ये साचलेपण दिसून येते आहे, याचा विचार व्हायला हवा. भविष्याचा विचार करता लेखक अंतर्मुख होणे तर दिवाळी अंकांच्या संपादकांनी बहिर्मुख होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
विजय कुवळेकर यांनी सु. वा. जोशी यांच्या कार्याचा सुरुवातीस गौरव केला. अंतरिक प्रेरणेने त्यांच्यातील उर्जा पुढील पिढीकडे संक्रमित झाली आहे. मराठी वाचकांसाठी उत्कर्ष दिवाळी अंकामुळे नवे दालन खुले झाले आहे. ते पुढे म्हणाले, दिवाळी अंकांचे संपादक जमिनीवर राहिले तर त्याला अंकासाठी खूप विषय मिळतात. याचे प्रतिबिंब उत्कर्षच्या दिवाळी अंकात दिसून येते. जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारा असा हा अंक असल्याचे ते म्हणाले.
मंगला गोडबोले म्हणाल्या, दिवाळी हा सामूहिक आनंदाचा सण असून दिवाळी अंक हा सामूहिक प्रतिभेचा, उद्गाराचा, आनंदाचा भाग आहे. साहित्य, संस्कृतीची ओल दिवाळी अंकांमुळेच टिकून राहिली आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
सुधीर गाडगीळ, रवी मुकुल, स्वप्नील पोरे यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक आणि मान्यवरांचे स्वागत सु. वा. जोशी, निलीमा जोशी-वाडेकर यांनी तर सूत्रसंचालन शाम भुर्के यांनी केले.
पुणे : यॉडलिंगचा बादशहा आणि बहुगुणी कलाकार किशोर कुमार यांच्या ३८व्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या अनेक गीतांची जादू पुन्हा एकदा रसिकांना अनुभवायला मिळाली.
निमित्त होते पूना गेस्ट हाऊस स्नेह मंच आयोजित सुप्रसिद्ध गायक किशोर कुमार यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांना वाहिलेल्या सांगीतिक स्वरांजलीचे. अगर तुम ना होते या कार्यक्रमाचे आयोजन आज (दि. १३) पूना गेस्ट हाऊस येथे करण्यात आले होते. या कायर्क्रमात अजय राव व ॲड. रुचिरा गुरव यांनी किशोर कुमार यांची सदाबहार गीते सादर केली. अनेक दशके आपल्या सुरांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या किशोर कुमार यांनी हिंदी चित्रपट सृष्टीवर आपल्या सुरांची मोहिनी पसरवली होती.
अगर तुम ना होते, रिमझिम गिरे सावन, हाल कैसा है जनाब का, ओ हंसिनी, नखरेवाली, जिंदगी के सफर में, कोरा कागज था ये मन मेरा, पन्नाकी तमन्ना, ओ मेरे दिल के चैन, आपकी आखों मे यांसह अनेक सुप्रसिद्ध गीते या प्रसंगी सादर करण्यात आली. हृदयाला स्पर्श करणारे शब्द, आणि जादूई आवाज याने रसिकांना मोहित केले. अनेक गाण्यांना वन्स मोअर देत तर अनेकदा गायकांच्या सुरात सूर मिसळत, टाळ्या आणि शिट्ट्यांनी दाद देत हा अनोखा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. रत्ना दहीवेलकर यांनी कार्यक्रमाचे खुमासदार शैलीत निवेदन केले.
कर्नल वसंत बल्लेवार, शरयू जोशी, व्हाईस ऑफ किशोर कुमार म्हणून ओळखले जाणारे गायक विजय केळकर व अनिल घाटगे, मेलडी मेकर्सचे अशोककुमार सराफ यांच्यासह पिंपरी-चिंचवड नाट्य परिषद शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, मंदार जोशी, डॉ. प्रसाद पिंपळखरे, प्रा. सविता केळकर, आनंद सराफ अशा अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावत कलाकारांना प्रोत्साहित केले.
कलाकरांचे स्वागत पूना गेस्ट हाऊसचे संचालक डॉ. किशोर सरपोतदार यांनी केले. तर संयोजन अजित कुमठेकर यांचे होते.