मुंबई- -मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी मतदारयाद्यांशी संबंधित 4 याचिका फेटाळून लावल्या. या याचिकांद्वारे मतदारयाद्यांच्या मसुद्यावर आक्षेप घेण्यासाठी कमी कालावधी मिळाल्याचा आरोप घेण्यात आला होता....
मुंबई-राज्यात मतदार याद्यांमधील कथित घोळावरून मोठे रणकंदन माजले आहे. विरोधकांनी या प्रकरणी मतदारयाद्या स्वच्छ करून निवडणुका घेण्याचा सूर आळवला आहे. त्यात आता राज्याचे मंत्री...
मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने मंगळवारी राष्ट्रीय आरोग्य अभियानातील 10 वर्षे पूर्ण होणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमित पदावर समायोजन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला....
नवी दिल्ली-स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता असतानाच, राजधानी नवी दिल्लीत एक मोठा राजकीय संघर्ष उफाळून आला आहे. मतदार याद्यांमधील गोंधळाविरोधात तक्रार दाखल...
पुणे, 03 नोव्हेंबर, 2025: गेल्या अनेक दशकांपासून कला हे मानवी भावना आणि सौंदर्यदृष्टी व्यक्त करण्याचे प्रभावी माध्यम बनले आहे. चित्रकारांनी प्रकाशाचा खेळ, कलात्मक दृष्टीकोन आणि सावल्यांचे चित्रण करुन जगाचे अदृश्य सौंदर्य उलगडले. पुणे येथे मेंदू आणि पाठीच्या कण्यावरील गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसाठी ओळखले जाणारे प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. जयदेव पंचवाघ यांच्यासाठी कलेची ही संकल्पना थेट मानवी मेंदूपर्यंत विस्तारली गेली. शस्त्रक्रियेदरम्यान, कवटीच्या आत, मेंदूच्या खोलवरच्या रचनेत आणि खाचांमध्ये दिसणारा प्रकाश आणि सावल्यांचा खेळ पाहून त्यांना प्रेरणा मिळाली. या प्रेरणेतून त्यांनी एक अद्वितीय आणि जबरदस्त चित्रसंग्रह तयार केला. या संग्रहात मेंदूत दडलेली अद्वितीय गुंतागुंत आणि सौंदर्य अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आली आहे.
‘‘मला गेल्या कित्येक वर्षांपासून निसर्ग प्रकाश चित्रकला येते. या काळातच माझ्या रोजच्या शस्त्रक्रियांच्या कामातील प्रकाशाने मी आकर्षित होत गेलो. या निसर्ग प्रकाश चित्रकलेच्या माध्यमातून स्कल बेस ट्युमर (Skull base tumours), मायक्रोव्हॅस्क्युलर डिकम्प्रेशन (Microvascular decompression), एन्युरिजम्स, इंट्राव्हेंट्रिक्युलर ट्युमर (Aneurysms and intraventricular tumour) यांसारख्या अवघड कामाच्या प्रवासाला अनोखी आणि समृद्ध दिशा मिळाली आहे.’’, असे डॉ. पंचवाघ यांनी सांगितले. त्यांच्या या मनोगतातून कला आणि अतिशय गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांचे काम यांतील प्रदीर्घ अनुभव झळकतो.
पुण्यातील डेक्कन जिमखाना येथील सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील सल्लागार न्यूरोसर्जन डॉ. जयदेव पंचवाघ यांनी पाच वर्षांपूर्वी आपल्या...