Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

Feature Slider

नवले ब्रिज दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्गावर तात्काळ पाच उपाययोजना कराव्यात – उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे

पुणे, दि. 1 डिसेंबर- मुंबई–बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नवले ब्रिज परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांची गंभीर दखल घेत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी आज...

महिनाभरात मराठी माणूस पंतप्रधानपदी दिसेल:अमेरिकेचा संदर्भ देत पृथ्वीराज चव्हाणांचे वक्तव्य, म्हणाले – देशात राजकीय भूकंप होईल

निवडणूक आयोगाचा 'पोरखेळ' सुरू आहे-आचारसंहिता उरली आहे का?मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री प्रचार सभांमध्ये उघडपणे प्रलोभने दाखवत आहेत- निवडणूक आयोग हे सरकारच्या हातचे बाहुले बनले आहे. सातारा-"अमेरिकेत...

शास्त्रीय संगीताच्या वास्तूत ’सुगम’चा सन्मान गौरवास्पद : प्रा. प्रकाश भोंडे

गांधर्व महाविद्यालय, पुणे तर्फे प्रा. प्रकाश भोंडे, विदुषी शैला दातार यांचा पंडित विनायकराव पटवर्धन स्मृती संगीत जीवन पुरस्काराने सन्मान पुणे : पुण्यातील गांधर्व महाविद्यालयाच्या पवित्र वास्तूत अनेकदा संगीत मैफली ऐकण्यास आलो आहे. या वास्तूत सुगम संगीत क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तीच्या कार्याचा सन्मान होणे कौतुकास्पद आहे. शास्त्रीय संगीताच्या संस्थेने सुगम संगीताच्या संस्थेचा केलेला हा मोठा गौरव आहे, अशा भावना स्वरानंद प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त प्रा. प्रकाश भोंडे यांनी व्यक्त केल्या. भारतीय संगीत प्रसारक मंडळाचे गांधर्व महाविद्यालय, पुणे आणि गांधर्व महाविद्यालय नॉर्थ अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘परंपरा’ संगीत महोत्सवात आज (दि. ३०) प्रा. प्रकाश भोंडे आणि सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका विदुषी शैला दातार यांचा पंडित विनायकराव पटवर्धन स्मृती संगीत जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. त्या वेळी प्रा. भोंडे बोलत होते. इन्कमटॅक्सचे प्रिंसिपल कमिशनर अभिनय कुंभार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. गांधर्व महाविद्यालय, पुणे येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गांधर्व महाविद्यालयाचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे, उपप्राचार्या परिणिता मराठे, लेखापाल मृदुला दाबके-जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. मानपत्र, शाल, श्रीफळ आणि २१ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. प्रा. भोंडे पुढे म्हणाले, गांधर्व महाविद्यालयाने सर्व संगीत प्रकारांवर प्रेम केले आहे. पुणे हे पुरस्कारांचे घर असले तरी कुठल्या संस्थेने, कोणत्या व्यक्तीचा, संस्थेचा सन्मान केला याला महत्त्व आहे. हा पुरस्कार मी माझ्या संस्थेचे विश्वस्त, सहकारी, कुटुंबिय तसेच रसिकांचा गौरव आहे, असे मानतो. गांधर्व महाविद्यालयासंदर्भातील आठवणींना उजाळा देऊन शैला दातार म्हणाल्या, पंडित विनायकबुवा पटवर्धन या ऋषितुल्य व्यक्तीमत्त्वाच्या नावे मिळालेला पुरस्कार ही माझ्याकरिता आनंदाची गोष्ट असून त्या मागे माझ्या आई-वडिलांची मोठी पुण्याई आहे. अभिनय कुंभार म्हणाले, संगीत, कला, साहित्य, नृत्य यांना वाहिलेल्या गांधर्व महाविद्यालय, पुणेचे कार्य मोठे असून त्यांच्या मार्फत भारतीय कला परंपरेचे जतन, संवर्धन व प्रचार होत आहे. भारतीय संस्कृतीचे शतकानुशतकाचे संचित संस्थेच्या माध्यमातून प्रवाहित करणे हे महान कार्य आहे. पुरस्काराविषयीची भूमिका पंडित प्रमोद मराठे यांनी विशद केली. मानपत्राचे लेखन जयश्री बोकील यांचे होते तर मानपत्राचे वाचन निरजा आपटे यांनी केले.  

समाज हा विश्ववंद्य आणि विश्वगुरू व्हावा हा सेवेचा उद्देश-विनय पत्राळे

स्व-रूपवर्धिनीला यंदाचा संपदा समाजकल्याण पुरस्कार प्रदान ; संपदा सहकारी बँक लि. तर्फे आयोजनपुणे : ईश्वराने मला दिले, ते मी समाजाला दिले नाही तर...

रसिकांनी अनुभवले लतादीदी, कवी ग्रेस यांचे दुर्मिळ स्मरणरंजन!

'दीनायन कलापर्व'तून उलगडले हृदयनाथ मंगेशकरांविषयी 'ह्रद्गत कौतुकोद्गारांचे'; २० वर्षांपूर्वीच्या दुर्मिळ ध्वनिचित्रफीतीचे सादरीकरण पुणे: विश्वविख्यात गायिका असणाऱ्या आपल्या ज्येष्ठ भगिनीकडून, आणि सर्वांत आवडत्या कवीकडून स्वतःविषयीचे भावनोत्कट कौतुकोद्गार ऐकताना...

Popular