पुणे-४ उत्साही भारतीय पर्यटक अनिल दामले, अनंत काकतकर, हुनेद चुनावाला व कौस्तुभ शेजवलकर हे केपटाउन ते कैरो या अद्वितीय रोमांचक प्रवासाला निघाले आहेत. ‘दामले सफारीज‘ तर्फे या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिका, बोटस्वाना, झाम्बिया, टांझानिया, केनिया, इथिओपिया, सुदान व इजिप्त अशा ८ देशांतून १२,८०० कि मी चा हा प्रवास ३५ दिवसांत पूर्ण केला जाणार आहे. हा सगळा प्रवास पजेरो या गाडीमधून केला जात असून Cape Agulhas पासून सुरु झालेला हा प्रवास, दक्षिण आफ्रिका ते इजिप्त मधील Alexandria पर्यंत चालणार आहे. विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर या एका अनोख्या सीमोल्लंघन प्रवासाला इंडियन कौंसिल जनरल पुनीत कुंडल यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. इंडियन मिशन चे सदस्य सुद्धा त्यावेळी उपस्थित होते. अशाप्रकारचा प्रवास प्रथमच भारतीयांकडून केला जात आहे.
केपटाउन ते कैरो या अद्वितीय रोमांचक प्रवासाला प्रारंभ
Date:


